Post Office Gram Suraksha Scheme | दररोज जमा करा 50 रुपये आणि मिळवा 35 लाख रुपये | डिटेल मध्ये जाणून घ्या

Post Office Gram Suraksha Scheme: नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे आज तुमच्यासाठी नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. Rural Security Plan ही योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या योजनेचे नाव आहे पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना. 

Post Office Gram Suraksha Scheme

पोस्ट ऑफिस द्वारे वेगवेगळ्या योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो. मित्रांनो तुम्ही जर पोस्ट ऑफिस मध्ये पैसे गुंतवत असाल तर तो विना जोखीम असतो. म्हणजे  पैसे डुबण्याचे टेन्शन तिथे नसतं. म्हणूनच आपल्या देशात बरेच लोक पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवत असतात. तुम्हीही या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा मिळवू शकतात.

Join Whatsapp Channel

पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांपैकी अशीच आहे एक Post Office Gram Suraksha Scheme. या योजनेमध्ये पैसा गुंतवणूक करून तुम्ही एक चांगला नफा मिळवू शकतात. मित्रांनो आपण येथे या योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया जसे की काय आहे ही ग्राम सुरक्षा योजना, या योजनेचे वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे काय, व्याजदर काय असणार, आणि तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतात.

हे देखील वाचा: फायदा करायचाय? पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मिळणार 1.85 लाख रुपये व्याज

Post Office Gram Suraksha Scheme

  • मित्रांनो पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांपैकी आहे एक पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना.
  • या योजनेमध्ये तुम्ही पैसा गुंतवणूक करून एक चांगला नफा मिळवू शकतात.
  • या योजनेअंतर्गत तुम्ही दररोज फक्त 50 रुपयांची बचत करून 35 लाख रुपयांचा फायदा मिळू शकतात. 
  • योजना भारतातील सर्व पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध आहे.
  • ही योजना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या 8200 शाखांमध्ये तसेच भारतातील प्रत्येक शहरातील पोस्ट ऑफिस मध्ये चालवली जात आहे.
  • या ठिकाणाहून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • ही ग्रामसुरक्षा योजना ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजनेचा एक भाग आहे. ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना 1995 मध्ये देशातील ग्रामीण भागातील लोकांसाठी सुरू करण्यात आलेली होती.
  • १९ ते ९५ वर्षे वयोगटातील व्यक्तींना ग्रामसुरक्षा योजना अंतर्गत गुंतवणूक करण्याची परवानगी आहे.
  • या योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
  • या योजना अंतर्गत जो प्रीमियम म्हणजे हप्ता भरायचा असतो तो तुम्ही चार प्रकारे भरू शकतात.
  • ते म्हणजे मासिक( दर महिन्याला), त्रेमासिक(दर तीन महिन्यानंतर), सहामाही(दर सहा महिन्यानंतर) आणि वार्षिक म्हणजेच वर्षातून एकदा असा तुम्ही होऊ शकतात.

हे देखील वाचा: ऑफलाइन/ऑनलाईन पद्धतीने लिंक करा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी

चला तर मित्रांनो ही योजना आपण एखादं प्रीमियम राशी घेऊन समजून घेऊया.

जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत प्रत्येक महिन्याला 1515 रुपये म्हणजेच दररोजचे पन्नास रुपये गुंतवले तर त्याला 35 लाख रुपये  पर्यंतच परतावा(रिटर्न) मिळू शकतो. या योजनेअंतर्गत तुम्ही वयाच्या 19व्या वर्षी गुंतवणूक केली तर वयाच्या 55 व्या  वर्षापर्यंत तुम्हाला 1511 रुपये एवढा हप्ता भरावा लागेल. तसेच जर तुम्ही वयाच्या 58 व्या वर्षी ही योजना घेतली तर तुम्हाला दर महिना 1463 रुपये आणि वयाच्या साठव्या वर्षापर्यंत तुम्हाला दर महिना 1411 रुपये द्यावे लागतील.

 जर तुमचा प्रीमियम म्हणजेच हप्ता भरण्यास चुकला तर तो तीस दिवसांच्या आत जमा करू शकतात. व्यवस्थित पाहिलं तर गुंतवणूकदाराला 55 व्या वर्षी गुंतवणुकीवर 31.60 लाख रुपये, आणि 58 व्या वर्षी गुंतवणूक केल्यावर 33.40 लाख रुपये आणि 60 व्या वर्षी गुंतवणूक केल्यावर 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल.

हे देखील वाचा: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 3 हप्त्यांमध्ये मिळणार पैसे

हे देखील वाचा: पोस्ट ऑफिसची पैसे दुप्पट करणारी स्कीम: 5 लाख रुपये जमा करून मिळवा 10 लाख रुपये

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेची वैशिष्ट्ये कोणती?

मित्रांनो पैसा गुंतवणूक करण्याच्या आधी आपण  जोखीमचा देखील विचार करतो. विना जोखीम पैसे गुंतवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या योजना खूपच  चांगल्या आहेत. तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करावी जिथे तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न नफा मिळेल. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये जोखीम कमी असते आणि रिटर्न जास्त असते. Rural Security Plan पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे:

  • 19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  •  या योजनेअंतर्गत कमीत कमी गुंतवणूक रक्कम 10 हजार रुपये आहे.
  • या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त गुंतवणूक रक्कम दहा लाख रुपये आहेत.
  •  प्रीमियम मासिक( दर महिन्याला),   त्रेमासिक(दर तीन महिन्यानंतर), सहामाही(दर सहा महिन्यानंतर) आणि वार्षिक या आधारावर भरला जातो.
  •  या योजनेत जीवन विमाचा लाभही उपलब्ध आहे.
  •  ही पॉलिसी तीन वर्षानंतर सरेंडर केली जाऊ शकते.
  •  या योजनेअंतर्गत तुम्ही कर्ज घेऊ शकतात परंतु पॉलिसी खरेदी केल्यानंतर 4  वर्षे पूर्ण झाल्यावरच ही सुविधा तुम्ही घेऊ शकतात.
  •  प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळतो.
  •  ग्राहकांना बोनसची सुविधाही उपलब्ध आहे. 1 हजार रुपयांमध्ये 65 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

हे देखील वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत आता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार 51,000 रुपयांची स्कॉलरशिप

Post office gram suraksha yojana, post office gram suraksha scheme, post office gram suraksha scheme calculator, gram suraksha yojana post office calculator, suraksha scheme, gram suraksha yojana post office, post office yojana, पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!