Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत आजच्या लेखांमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल जाणून घेणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 महाराष्ट्र नव्याने सुरू झालेले आहे. Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana 2023 च्या बजेटमध्ये महाराष्ट्र सरकारकडून चालू करण्यात आली आहे. चला तर मित्रांनो डिटेल मध्ये जाणून घेऊया काय आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2024
Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना 1 रुपयात पिक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे. अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी 6 हजारांच्या निधीत आणखी 6 हजाराची भर टाकण्याचा निर्णय झालेला आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाच्या शेवटी बारा हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा फायदा जवळजवळ 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना होणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 6 हजार 900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची फडणवीस यांनी सांगितलेला आहे.
नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये ,सरकारने महासन्माननी दिला दिला हिरवा कंदील
नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची अतिरिक्त मदत दिली जाणार आहे. केंद्राकडून शेतकऱ्यांना जी मदत मिळते त्या मदतीच्या व्यतिरिक्त ही मदत असणार आहे. केंद्र सरकार यापूर्वीच शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची सन्मान निधी देत असते.
हे देखील वाचा: Lumpi Virus: पशुपालकांची चिंता वाढली
महाराष्ट्र शासनाने मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या. या योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना वर्षभरात दोन हजार रुपयांची मदत करणार आहे. शिवाय शेतकऱ्यांना एक रुपयांचा पिक विम्याचा लाभ मिळवून देण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना भेटवस्तू देतानाच या दोन्ही योजनांना मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिलेली आहे.
नमो शेतकरी महासंघांनी ती योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची अतिरिक्त मदत दिली जाईल. केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीच्या व्यतिरिक्त ही मदत असणार आहे. या दोन्ही मदती मिळून शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 3 हप्त्यांमध्ये मिळणार पैसे
या योजनेअंतर्गत राज्य सरकार शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये पैसे देणार आहे म्हणजेच 2-2 हजार कर आकारल्यानंतर ही रक्कम तिप्पट शेतकऱ्यांना पाठवली जाईल. या योजनेसाठी शासनाकडून सहा हजार नऊशे कोटी रुपये खर्च होणार असून या योजनेचा राज्यातील सुमारे 1.15 कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शिवाय एक रुपयांमध्ये पिकाचा विमा देखील काढता येणार आहे.
नमो शेतकरी योजनेचा मे च्या अखेरीस लाभ
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दर चार महिन्यातून एकदा 2 हजार रुपये असे वर्षात तीन टप्प्यात 6 हजार रुपये मिळणार आहेत. आणि 2023 च्या मे अखेरीस पहिला आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. हा आता जमा होण्यासाठी तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं असणं बंधनकारक आहे
हे देखील वाचा: येथे क्लिक करून आधार कार्ड बँक खात्याशी कसे जोडायचे ते पहा
- केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे या योजनेचे देखील काही निकष आहेत. प्राप्तिकर दाते, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- दुसरीकडे एक फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावे शेत जमीन आहे तेच या योजनेसाठी पात्र असतील.
- तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे बंधनकारक आहे.
- आपल्या राज्यात जळजळ 12 लाख शेतकरी अशी आहेत ज्यांचे बँक खाते अजूनही आधार कार्ड आणि मोबाईल नंबर ची लिंक नाही.
- या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी ही अट बंधनकारक आहे अथवा पैसे मिळू शकणार नाही.
- पी एम किसान योजनेतील लाभार्थीच ‘ नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेसाठी पात्र असतील. ज्या शेतकरी लाभार्थ्यांनी त्यांच्या आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न केलेली नाही त्यांनी तात्काळ करून घ्यावे.
- मेच्या अखेरीस तथा जुलाई मध्ये या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. – सुनील चव्हाण, आयुक्त, कृषी
हे देखील वाचा: शेत रस्त्यासाठी कायदेशीर मागणी अर्ज कसा करायचा?
या योजनेसाठी बंधनकारक आहेत खालील बाबी:
- 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीच्या जमीनधारक शेतकरी पात्र
- सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी करावी लागेल
- बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक
- लाभार्थीने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी
किती रुपयांचा सन्माननिधी शेतकऱ्यांना मिळणार?
- प्रति शेतकरी प्रति वर्ष सहा हजार रुपये राज्य सरकार देणार
- केंद्र सरकारचे 6 हजार आणि राज्य सरकारकडून 6 हजार असे मिळून 12000 अतिरिक्त रुपये मदत म्हणून प्रतिवर्षी शेतकऱ्यांना मिळणार
- 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार
- सहा हजार नऊशे कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार
हे देखील वाचा: शेळी मेंढी पालन योजनेला नवीन मंजुरी, पहा काय आहे या योजनेचे स्वरूप अटी आणि शर्ती
Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड
- बँक खाते क्रमांक
- मोबाईल नंबर
- पत्त्याचा दाखला
- जमिनीचे कागदपत्रे 7/12 उतारा
- पासपोर्ट साईज फोटो
Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही 2023 च्या बजेटमध्ये घोषित केलेली योजना आहे. या योजनेचे अर्ज लवकरात लवकर चालू होणार आहेत. त्यानंतर अर्ज भरण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट ची लिंक तुम्हाला लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे. तोपर्यंत तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहा आणि तुम्हाला लवकरच फॉर्म भरण्याची ऑफिशियल वेबसाईट आणि फॉर्म भरण्याच्या स्टेप्स सांगू.
Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana maharashtra 2023, pm modi shetkari yojana, pm kisan shetkari sanman yojana, shetkari sanman nidhi