बांधकाम कामगार योजना फायदे कोणते? | भारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजना कोण कोणत्या|असा घ्या फायदा 

बांधकाम कामगार योजना: नमस्कार मित्रांनो, या ब्लॉगवर आपण विविध योजनांची माहिती घेत असतो. त्याचप्रमाणे आपण आज बांधकाम कामगारांसाठीच्या असणाऱ्या काही योजनांबद्दल माहिती घेऊया. मित्रांनो, आपले सरकार जसं शेतकऱ्यांच्या दृष्टीने योजना राबवत असतात त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांच्या दृष्टीने देखील योजना राबवतात. बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार हे सर्वात मोठ्या असंघटित वर्गात येतात. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केल्यानंतर त्या कामगाराला विविध योजनांचा लाभ दिला जातो. त्यामुळेच बांधकाम कामगाराला विविध फायदे मिळवण्यास देखील मदत होते.

Bandhkam Kamgar Yojana Benefits

चला तर मित्रांनो आता आपण  जाणून घेऊया की बांधकाम कामगार योजना नंतर गत विविध कामगारांना कोण कोणता फायदा होऊ शकतो? कोण कोणता फायदा घेण्यासाठी ते  पात्र ठरू शकतात?  बांधकाम कामगार योजना भारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर्फे राबविण्यात येतात. चला तर आपण जाणून घेऊया काय आहे हे भारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ.

Join Whatsapp Channel

भारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ

कामगारांच्या रोजगार आणि सेवाशर्तीचे नियमन करण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे सुरक्षा, आरोग्य, आणि त्यांचे कल्याण यांच्या उपायोजना करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने ” इमारत व इतर बांधकाम कामगार कायदा 1996” ची तरतूद केलेली आहे.

 या कायद्याअंतर्गत नंतर राज्य सरकारने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार 2007 देखील मंजूर केले. या कायद्याअंतर्गत महाराष्ट्र सरकारने देखील  हाअधिनियम पारित केला. 

या मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध योजनांमधून इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.

 बांधकाम कामगार योजना फायदे कोणते?

  • कल्याणकारी महामंडळ करून बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविला जातात. आणि या योजनेचे विविध फायदे बांधकाम कामगारांना आणि त्यांच्या परिवाराला होतात.  त्यांना होणारे फायदे आपण येथे पाहूया.
  • विविध बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील कामगारांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केल्यानंतर कामगारांची संख्या माहिती केली जाईल, त्यामुळे त्यांच्यासाठी विविध योजनांची सुरुवात करण्यास मदत होईल. सोबतच फायद्याचे वितरण करण्यास देखील सोपे जाईल.
  •  या योजनांचा कामगारांना आणि त्याच्या परिवाराला एक फायदा म्हणजे कुटुंबाचे जीवनमान सुधारेल.
  •  त्या कामगारांसोबत त्याच्या परिवाराचा देखील सामाजिक सोबतच आर्थिक विकास देखील होईल.
  •  या योजनेअंतर्गत राज्यातील कामगारांचे मनोबळ वाढेल आणि त्यांना काम करण्यामध्ये प्रोत्साहन मिळेल.
  •  या योजनांमधून कामगारांना सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक लाभ देखील होईल.
  •  कामगार सशक्त आणि आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल. 
  •  नोंदणी केलेल्या कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिकृतीसाठी 30000 रुपये आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाईल. तसेच बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाह साठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाईल.
  • कामगारांना दोन वेळचे जेवण मोफत दिले जाते. अटल पेन्शन योजनेचा लाभ सुद्धा दिला जातो.
  •  प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ देखील मिळतो.
  • घरकुल योजनेचा लाभ,  तसेच बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ देखील दिला जातो.

हे देखील वाचा: अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत घर बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य

बांधकाम कामगारांच्या  मुलांसाठी आणि परिवारासाठी  होणारे फायदे:

  •  बांधकाम कामगार व त्यांच्या मुलांसाठी Essential kit वाटप देखील केले जाते. कामगारा पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या मुलांना  दरवर्षी पंचवीसशे रुपयांच्या आर्थिक सहाय्य स्कॉलरशिप म्हणून दिली जाते.
  •  तसेच आठवी ते दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या मुलांना पाच हजार रुपये दरवर्षी आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.
  •  जर दहावी आणि बारावी मध्ये कमीत कमी 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाले तर त्या मुलांना दहा हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य दिले जात असते.
  •  सोबतच दहावी आणि बारावीच्या शिक्षणासाठी दरवर्षी दहा हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य दिले जाते.
  • बांधकाम कामगाराच्या मुलांना आणि पत्नीला पदवी अभ्यासक्रमासाठी 20000 रुपयांचे दरवर्षी आर्थिक सहाय्य दिले जाते.
  •  त्यानंतर कामगाराच्या मुलांना व पत्नीला वैद्यकीय पदवी करता दरवर्षी एक लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळते.
  •  मुलांना किंवा पत्नीला जर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण घ्यायचे असेल तर दरवर्षी साठ हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य मिळत असते.
  •  कामगारांच्या मुलांना शासनमान्य पदविकेसाठी दरवर्षी वीस हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य मिळत असते. तसेच पदव्युत्तर पदविकेसाठी दरवर्षी 25 हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य मिळते.
  •  सोबतच बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिकृती केली जाते.
  • कामगारांच्या मुलांना पुढील शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती चा लाभ दिला जातो:  आयआयटी, इंग्रजीची ट्युशन फी, परदेशातील उच्च शिक्षण, पीएचडी.
  • त्यांच्या शिक्षणासाठी टॅबलेट आणि लॅपटॉप चे वितरण देखील केले जाते.
  •  कामगाराच्या मुलांची वर्गामध्ये 75 टक्के हजेरी असेल तर आर्थिक सहाय्य मिळते.
  •  नैसर्गिक प्रसूतीसाठी पंधरा हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य, शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी वीस हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
  •  गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाखाची आर्थिक सहाय्य लाभार्थी कामगार आणि त्याच्या कुटुंबाला दिले जाते.
  •  एक मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत ठेव म्हणून बंद केले जातात. 
  •  काही कारणास्तव कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्य.

हे देखील वाचा:महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजना

बांधकाम कामगार योजना इतर फायदे

  •  महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ.
  •  मोफत आरोग्य तपासणी
  •  व्यसनमुक्ती करता निधी
  •  कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास पाच  लाखाचे आर्थिक सहाय्य
  •  कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास वारसास दोन लाखाची आर्थिक सहाय्य.
  •  अटल बांधकाम कामगार आवास शहरी आणि ग्रामीण अंतर्गत दोन लाखांची आर्थिक सहाय्य दिले जाते.
  • 50 ते 60 वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी दहा हजार रुपयांचे सहाय्य.
  •  कामगाराच्या मृत्यूनंतर विधवा पत्नीस  किंवा  स्त्री कामगाराचा विदुरुपतीस पाच वर्षाकरिता 24 हजाराची आर्थिक सहाय्य दिले जाते.
  • घर बांधण्यासाठी घेतलेल्या सहा लाखाच्या कर्जाच्या व्याजाची रक्कम किंवा दोन लाखाची आर्थिक सहाय्य.
  •  बोनस दिला जातो.
  • नोंदणीकृत कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधणीसाठी अर्थसहाय्य.
  •  कामावर जायला सायकल वाटप केली जाते.
  • बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजेच सेफ्टी किट चा देखील वाटप केला जातो.

हे देखील वाचा: नोंदीत बांधकाम कामगारांसाठी मध्यान भोजन योजना अंतर्गत अर्ज पद्धती

अशाप्रकारे आपण बांधकाम कामगारांना विविध योजनांमधून मिळणारे फायदे पाहिले. काही फायदे त्याला डायरेक्ट मिळतात तर काही त्याच्या परिवाराला म्हणजेच मुलांना आणि पत्नीला मिळतात. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर या योजनेचा फायदा नक्कीच घ्या. तुमच्या आजूबाजूला कुणी बांधकाम कामगार असेल तर त्यांना देखील या योजना बद्दल माहिती सांगा

बांधकाम कामगारांसाठी च्या विविध योजनांबद्दल माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा

बांधकाम कामगार पेटी योजनाबांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजनामहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनाअटल बांधकाम कामगार आवास योजना

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!