मित्रांनो, विकसित भारताच्या उभारणीसाठी आपल्या भारत देशातील सर्व तरुणांना एकत्रित आणणे या उद्देशाने Viksit Bharat @ 2047: तरुणाईचा आवाज या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देवसेना केलेले आहे. आपल्या स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी भारताचे युवाशक्तीवर मोदी यांचा प्रचंड विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदी म्हटले की विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी माझा भारतातील युवाशक्ती वर मोठ्या प्रमाणावर विश्वास आहे. त्यांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आव्हान देखील केले होते.
विकसित भारत संकल्प यात्रा:
आपल्या भारत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी 17 डिसेंबर 2023 रोजी वाराणसी येथे विकसित भारत संकल्प यात्रेबाबत महत्त्वाचे वक्तव्य केलं होतं. विकसित भारत संकल्प यात्रा हे एक मोठे स्वप्न आहे, एक मोठा संकल्प आहे आणि हा संकल्प आपण स्वतःच्या प्रयत्नाने पूर्ण केला पाहिजे असे नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
नरेंद्र मोदी यांचा लोकसत्ता मतदारसंघ असलेल्या वाराणसी च्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. सोमवार रोजी ते सेवापूर्तीस बरकी ग्रामसभेत विकसित भारत संकल्प यात्रा या कार्यक्रमात सहभागी झाले.
हे देखील वाचा: गुजरात मध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या घोषणा- टाटा, मारुती आणि रिलायन्स समूहाकडून
विकसित भारत संकल्प यात्रा(Viksit Bharat @2047):
विकसित भारत संकल्प यात्रा हा एक सरकारी उपक्रम आहे. आयुष्मान भारत, उज्वला योजना, पीएम स्वनिधी योजना, पीएम सुरक्षा विमा इत्यादी प्रमुख केंद्रीय योजनांबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्या योजनांच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
Viksit Bharat संकल्प यात्रेचे उद्दिष्टे काय?
- विविध योजनांसाठी पात्र असलेला परंतु आतापर्यंत लाभ घेतलेला नसलेल्या अशा वंचित लोकांपर्यंत पोहोचणे.
- योजनांच्या माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे.
- सरकारी योजनांच्या लाभार्थ्याशी वैयक्तिक संवाद करून त्यांचे अनुभव जाणून घेणे.
- यात्रेदरम्यान जमा झालेल्या माहितीच्या आधारे संभाव्य लाभार्थ्याची नोंदणी करणे.
- ही विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्टे होती.
हे देखील वाचा: रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी अशा पद्धतीने करू शकता