विहीर अनुदान योजना महाराष्ट्र|4 लाखांचे अनुदान मिळवण्यासाठी असा करा अर्ज

विहीर अनुदान योजना:  नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण एक नवीन योजना घेऊन आलो आहेत ती म्हणजे विहीर अनुदान योजना 2023.  महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांचा तसेच शेतकऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करतच असते. विहीर अनुदान योजना ही देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेली अशीच एक योजना आहे. या योजनेबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. या योजनेला विहीर योजना असे देखील म्हटले.

Join Whatsapp Channel

 आपल्या राज्यातील बहुतांश शेतकरी पैशाच्या अभावी शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी शासनाकडून चार लाखांचे अनुदान देण्यात येते. याचा फायदा असा की शेतकऱ्यांना पिण्यासाठी तसेच शेतामध्ये पीक घेण्यासाठी पाणी उपलब्ध होते. या योजनेमुळे शेत पिकासाठी विहिरी मधून पाण्याची उपलब्धता केली जाऊ शकते.

विहीर अनुदान योजना महाराष्ट्र

 मागील काही  काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचा  निर्धार केलेला आहे. भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून 3,87,500  एवढ्या विहीर खोदणे शक्य आहे.  मनरेगा अंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास त्याच्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा व्यवस्थित वापर केल्यास मोठ्या संख्येने कुटुंबे लखपती होणार आणि याचा परिणाम असा होईल की राज्यात दारिद्रता कमी होईल. या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने या विहीर अनुदान योजनेची सुरुवात केली.

 तर मित्रांनो या लेखात आपण विहीर अनुदान योजनेची संपूर्ण माहिती घेणार. त्यासाठी  तुम्ही हा लेख पूर्ण वाचा आणि या योजनेचा लाभ घ्या. जर तुमच्या परिसरात आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी असेल आणि त्याला या योजनेची माहिती नसेल तर प्लीज या योजनेची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचवा.

हे देखील वाचा: इथे क्लिक करून विहीर अनुदान योजनेची यादी बघा

मागेल त्याला विहीर अनुदान योजनेचे वैशिष्ट्ये:

  • महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  •  राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने आणि त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा या दृष्टीने त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
  •  महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेती क्षेत्रासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करण्याच्या हेतूने हे एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
  •  विहीर अनुदान योजनेला मागेल त्याला विहीर अनुदान योजना या नावाने ओळखले जाते.
  •  या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांना अर्ज करताना कुठल्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही.
  •  या योजनेसाठी अर्जदार घरबसल्या अर्ज मोबाईल वरून करू शकतो.
  •  मागेल त्याला विहीर अनुदान योजनेचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना घेता यावा यासाठी महाराष्ट्र सरकारने गावात मंजूर करण्यात येणाऱ्या विहिरींची संख्यांची अट रद्द केलेले असून आता जास्तीत जास्त लोकांना मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत लाभ मिळवता येणार आहे.
  •  राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोकने या उद्देशाने तसेच त्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही विहीर अनुदान योजना एक महत्त्वाची योजना ठरली आहे.
  •  या योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल त्यामुळे या योजनेतत कोणताही घोटाळा होण्याची शक्यता नसेल.
  •  या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
  • चला तर मित्रांनो आता आपण बघूया विहीर अनुदान योजनेचे लाभार्थी कोण ठरणार आहे आणि ते कसे निवडले जाणार आहे.

हे देखील वाचा: मागील त्याला शेततळे योजनेअंतर्गत शेततळे बांधण्यासाठी लाभार्थ्यांना लागू असणाऱ्या अटी कोणत्या?

 विहीर अनुदान योजनेचे लाभार्थी:

  •  राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी जे स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ आहेत असे शेतकरी
  •  अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती
  •  अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्ती
  •  इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्ती किंवा शेतकरी
  •  महिला कर्ता असलेल्या कुटुंबातील महिला
  •  इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
  •  जॉब कार्डधारक व्यक्ती
  •  जमिनी सुधारक सुधारण्याचे लाभार्थी
  •  निरधी सूचित जमाती
  •  दारिद्र रेषेखालील लाभार्थी
  •  अनुसूचित जाती व अन्य परंपरांकत वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 खालील लाभार्थी
  •  सीमांत शेतकरी म्हणजेच ज्यांच्याकडे अडीच एकरपर्यंत जमीन आहे असे शेतकरी
  •  अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी
  •  शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेले कुटुंब

हे देखील वाचा: जमिनीचा नकाशा ऑनलाईन कशा पद्धतीने पहायचा?

 Vihir Anudan योजनेचे लाभ:

  •  या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक दृष्ट्या विकास होईल.
  •  मागील त्याला विहीर अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी चार लाखांचे आर्थिक अनुदान देण्यात येईल.
  •  राज्यातील शेतकरी विहीर खोदण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  •  राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
  •  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल आणि त्यामुळे आत्महत्या रोखण्यास मदत होईल.
  •  राज्यातील शेतकरी शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच इतर नागरिक शेती व्यवसायाकडे आकर्षित होतील.
  •  शेतकरी स्वावलंबी बनतील.
  •  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून चार लाखांच्या अनुदान उपलब्ध करून दिले जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना वीर खोदण्यासाठी कोणत्याही इतर मार्गाने व्याज दराने पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासणार नाही.

विहीर अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीची प्रक्रिया:

  • मागील त्याला विहीर योजनेअंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया ही ग्रामसेवक यांच्यामार्फत करण्यात येईल.
  •  ग्रामसभा/ ग्रामपंचायतच्या मान्यतेनंतर एक महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील.
  •  प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत तांत्रिक मान्यता देण्याची जबाबदारी तांत्रिक सहाय्यकाचे राहील.

हे देखील वाचा: पहा काय आहे दोन दुधाळ गाय/म्हैस वाटप योजनेचा शासन निर्णय

 मागेल त्याला विहीर अनुदान योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान:

या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.

विहीर अनुदान योजनेच्या अटी:

  •  फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच विहीर अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल.
  •   अर्जदार शेतकऱ्याकडे शेती योग्य भूमी असणे  गरजेचे आहे.
  •  शेतात आधीच विहीर असता कामा नये.
  •  अर्जदार व्यक्ती हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
  •  अर्जदार शेतकऱ्याचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक केलेले असणे आवश्यक आहे.
  •  अर्जदाराने यापूर्वी विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे किंवा भात कचरा सोबत तयार होणारी बॉडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.
  •  लाभ धारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
  •  लाभार्थी शेतकऱ्याची जमीन विहिरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे( या संदर्भात शाखा अभियंता/ उपअभियंता यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी यांच्यासोबत जागेचे पाहणे करून त्यांचा अहवाल घेण्यात येईल)
  •  शेतात ज्या ठिकाणी विहीर खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणापासून 500 मीटर पर्यंत विहीर नसावी.
  •  दोन विहिरींमधील किमान अंतर 150 मीटर असणे ही अट रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमातीतील आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंब यान करता लागू करण्यात येणार नाही.
  •  अर्जदार व्यक्तीच्या 7/12 वर यापूर्वीची  विहिरीची नोंद नसावी.
  • लाभार्थ्याकडे ऑनलाईन एकूण जमिनीचा दाखला असावा.
  •  लाभार्थी एकापेक्षा जास्त असेल तर अशावेळी संयुक्तपणे ते विहीर अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात मात्र त्यासाठी एकूण सलग जमिनीचे क्षेत्र 0.40  हेक्टर पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
  •  या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
  •  जर अर्जदार व्यक्तीच्या जमिनीचे सहहिस्सेदार असतील तर अशा परिस्थितीत अर्जदाराला अर्जासोबत त्या हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा: महाराष्ट्र 7/12 उतारा ऑनलाईन पद्धतीने कसा बघायचा?

 मागेल त्याला विहीर अनुदान योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:

  •  आधार कार्ड
  •  रेशन कार्ड
  •  रहिवासी दाखला
  •  मोबाईल नंबर
  •  ईमेल आयडी
  •  रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड
  •  उत्पन्नाचा दाखला
  •  बँक खाते क्रमांक आणि पासबुक प्रत
  •  जमिनीची कागदपत्रे 7/12  व 8  अ
  •  पासपोर्ट साईज फोटो
  •  सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40  हेक्टर पेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा
  •  सामुदायिक विहीर असल्यास समोर आणि पाणी वापरण्याबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करार पत्र

 चला तर मित्रांनो आता आपण बघूया या विहीर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजे चार लाखांच्या अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा.

हे देखील वाचा: बँक खाते आधार कार्डशी लिंक कसे करायचे?

विहीर अनुदान योजनेसाठी असा करा अर्ज:

  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जावं लागेल व ग्रामसेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जाऊन विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत आवश्यक असणारी म्हणजेच वर दिलेली कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल.
  •  अर्ज पेटी दर सोमवारी उघडण्यात येऊन त्यातील अर्ज ऑनलाईन भरण्याचे कार्य ग्रामपंचायतचे असेल. हे कार्य ग्रामपंचायत स्वतःचे डाटा एन्ट्री ऑपरेटर किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्या मदतीने करेल. याप्रमाणे मनरेगाच्या सर्व मागण्या ऑनलाइन भरल्या जातील ही जबाबदारी त्या ग्रामपंचायतीसाठी जबाबदार असलेले तांत्रिक सहाय्यकाची राहील वेळप्रसंगी तांत्रिक सहाय्यक सुद्धा ऑनलाईन साठी डाटा एन्ट्री करावी  लागली तर करते.
  •  आणि अशाप्रकारे तुमची विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
  • जर तुम्हाला विहीर अनुदान योजनेअंतर्गत करावयाचा अर्ज हवा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक  करून अर्ज डाऊनलोड करा.

विहीर अनुदान योजनेचा अर्ज डाऊनलोड करा

Vihir anudan yojana, Vihir yojana 2022 online application, New vihir yojana, mrgs vihir yojana, विहीर अनुदान योजना, नवीन विहीर अनुदान योजना 2023, सिंचन विहीर योजना 2023

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!