नवीन विहीर योजना यादी(Vihir Anudan yadi maharashtra): नमस्कार मित्रांनो आज च्या लेखामध्ये आपण विहीर अनुदान योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी सिंचन विहीर ही हवी असल्याने लागणारा खर्च खूप मोठा असतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून विहिरीसाठी अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान तब्बल चार लाख रुपये एवढे असणार आहे. आता आपण जाणून घेऊया या योजनेअंतर्गत 2022 23 या वर्षात कोणत्या लाभार्थ्यांना विहीर मिळाली आहे किंवा तुमच्या गावात कोणत्या शेतकऱ्याला विहीर मिळून पैसे जमा झालेले आहेत. आता तुम्ही या गाव सर्व गावांची यादी तुमच्या मोबाईल वरून पाहू शकतात. आणि या लेखांमध्ये आपण बघूया की शेतकऱ्यांना सिंचन विहीर योजना लाभार्थी यादी ऑनलाईन पद्धतीने कशी बघायची.
Vihir Anudan yadi maharashtra:
मित्रांनो, महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांचा तसेच शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. त्यासाठी विविध योजना देखील सुरू करत असते. अशीच एक योजना आहे विहीर अनुदान योजना. मागेल त्याला विहीर अनुदान योजना आणि पंचायत समिती विहीर योजना असे देखील या योजनेला म्हटले जाते. आपल्या राज्यातील बहुतेक शेतकरी पैशांच्या अभावी शेतात विहीर ठरू शकत नाहीत, त्यामुळे पावसाळा गेल्यानंतर त्यांना जी पाण्याची गरज भासते तर ती पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे या योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये विहीर आणण्यासाठी शासनाकडून चार लाखांच्या अनुदान देण्यात येत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना पाणी पिण्यासाठी आणि शेतीतील पिकाच्या वाढीसाठी उपलब्ध होऊ शकेल.
मित्रांनो, आपल्या राज्यातील बहुतांश शेतकरी शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शेतीकडे पाठ फिरवत आहेत. आणि नोकरी व्यवसायाकडे जात आहेत. आपला देश कृषिप्रधान देश आहे, त्यामुळे शेती पिकासाठी विहिरींमधून पाण्याची उपलब्धता करून देणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणाने शेतकरी शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ असतात, याच गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने विहीर अनुदान योजना सुरू केलेली आहे.
हे देखील वाचा: बँक खाते आधार कार्डशी लिंक कसे करायचे?
विहीर अनुदान
- महाराष्ट्र सरकारच्या पंचायत समिती कृषी विभाग योजना 2023 अंतर्गत विहीर अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती.
- राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक दृष्ट्या जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात केलेली आहे.
- ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पद्धती अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे,
- जेणेकरून सामान्य शेतकरी अर्ज करताना कुठल्या समस्येला सामोरा जाणार नाही.
- तुम्ही तुमच्या घरी बसून मोबाईल द्वारे सुद्धा ही अर्ज प्रक्रिया करू शकतात.
- समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेतकरी, अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती, अनुसूचित जमातीतील व्यक्ती,
- भटक्या व विमुक्त जातीतील व्यक्ती, मागासवर्गातील शेतकरी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी,
- जॉब कार्ड धारक व्यक्ती, जमीन सुधारक सुधारण्याचे लाभार्थी, तसेच दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी असे व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
विहीर अनुदान योजना लाभार्थी यादी:
Vihir Anudan yadi maharashtra मध्ये तुम्ही बघू शकता की तुमच्या गावात कोणाला सिंचन विहिरी मिळालेल्या आहे का किंवा तुमचे नाव आलेला आहे का? हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता आणि यादीही डाऊनलोड करू शकतात. आता बघूया की ही यादी कशी डाउनलोड करायची.
हे देखील वाचा: हे क्लिक करून पहा शासन निर्णय, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व पात्रता
विहीर अनुदान योजना लाभार्थी यादी कशी बघायची?
- लाभार्थी यादी बघण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मनरेगाच्या संकेतस्थळावर जावं लागेल https://nrega.nic.in/ .
- या पेजवर आल्यावर तुम्हाला ग्रामपंचायत या पर्यायावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला रिपोर्ट जनरेटर वर क्लिक करावे लागेल.
- पुढे राज्य महाराष्ट्र निवडा. सोबत वर्ष, जिल्हा, तालुका, गाव निवडायचा आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला संपूर्ण रिपोर्ट दिसेल.
- पुढे तुम्हाला वर्क स्टेटस(work status) पर्याय दिसेल तो सिलेक्ट करा त्यानंतर तुम्ही 2022-23 वर्ष निवडा.
Vihir anudan yojana, Vihir yojana 2022 online application, New vihir yojana List, mrgs vihir yojana, विहीर अनुदान योजना, नवीन विहीर अनुदान योजना 2023, सिंचन विहीर योजना 2023