swadhar yojana | काय आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना? अधिक माहिती जाणून घ्या

मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे हे आपण आजच्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. swadhar yojana आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरात मॅट्रिक नंतरचे शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देते. या उद्देशाने ही स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे.

swadhar yojana

Table of Contents

swadhar yojana

मित्रांनो दिवसेंदिवस व्यवसायिक आणि बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या वाढत चालली आहे. सोबतच तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात राज्यात शासकीय वस्तीगृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावं लागत असते. याचा परिणाम असा होतो की पुढील शिक्षणास मर्यादा येत असते.

अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना मॅट्रिक नंतरचे शिक्षण घेता यावे म्हणून जेवण, राहण्याची सोय व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट वितरित करण्यात येते. या उद्देशाने ही बाबासाहेब आंबेडकर swadhar yojana सरकारने सुरू केलेली आहे.

हे देखील वाचा: स्वाधार योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

swadhar scholarship yojana

या योजनेसाठी विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, पदवी, तसेच पदविका परीक्षेमध्ये ६० टक्के पेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे. त्यासोबत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50% असणार आहे. बहुतांश कुटुंबे दारिद्र रेषेखालील असल्यामुळे ते वस्तीगृहाव्यतिरिक्त बाहेर राहण्याची सोय करू शकत नाही. हे खूप खर्चिक पण असतं. म्हणून या योजनेचा लाभ आता अशा परिवारांना घेता येणार आहे.

Join Whatsapp Channel
स्वाधार योजना शासन निर्णय
स्वाधार योजना अर्ज

हे देखील वाचा: स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा? (swadhar yojana online apply)

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!