Sukanya Samruddhi Yojana Details: नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही तुमच्यासाठी आजच्या लेखांमधून नवीन माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण सर्वात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. जर तुमच्याकडे एसबीआय बँकेचे खाते असेल तर फक्त 250 रुपये जमा करून तुम्ही 15 लाख रुपयांचा लाभ मिळवू शकतात. तर जाणून घेऊया कोणती आहे ही एसबीआयची नवीन योजना.
जर तुम्ही एका मुलीचे पालक असतील तरच तुम्ही या एसबीआयच्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कारण ही योजना बचतीची योजना आहे आणि त्यातून तुमच्या मुलींचे भविष्य सुरक्षित होऊ शकते.. स्टेट बँक ऑफ इंडियाची ही नवीन योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना होय. या योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त 250 रुपये जमा करून तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकतात. तर जाणून घेऊया काय आहे ही सुकन्या समृद्धी योजना.
सुकन्या समृद्धी योजना(Sukanya Samruddhi Yojana):
सुकन्या समृद्धी योजना ही एक खात्रीशीर उत्पन्न देणारी योजना आहे. सोबत तुम्हाला पंधरा लाख रुपये मिळणार आहेत. विशेषता ही योजना मुलींसाठी आहे जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित करता येईल. या सुविधा शासनाकडून दिल्या जाणार आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्यात नेमके किती रुपये व्याज मिळेल?
- तर सरकारकडून सुकन्या समृद्धी योजना वर 7.6% व्याज दर मिळत आहे.
हे देखील वाचा: लेक लाडकी योजना महाराष्ट्र|मुलींना मिळणार 75 हजार रुपये: असा करा अर्ज
सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ कसा घ्यावा?
या योजनेत कमीत कमी किती गुंतवणूक करायचे आहे?
- तर या योजनेत तुम्हाला कमीत कमी 250 रुपये हप्ता तुम्ही सुरुवात करू शकतात.
- तुम्हाला एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करावे लागतात.
या योजनेचा परीपक्वता म्हणजे पूर्ण होण्याचा कालावधी किती असतो?
- तर या योजनेचा जास्तीत जास्त कालावधी पंधरा वर्षासाठी असू शकतो.
- जर तुम्ही हप्ते वेळेवर जमा केले नाहीत तर तुम्हाला 50 रुपये दंड देखील भरावा लागतो.
- ही रक्कम मुलीच्या जन्मापासूनच्या पहिल्या 14 वर्षासाठी खात्यात जमा केली जाते आणि 21 वर्षात परिपक्व होते.
हे देखील वाचा: या आहेत माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अटी आणि शर्ती?
Sukanya Samruddhi Yojana Details:
मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीसाठी पंधरा लाखांचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 250 रुपयांचा हप्ता भरावा लागतो. जर तुम्ही मुलीचा जन्म झाल्यावर या योजनेत गुंतवणूक चालू केलेली असेल तर मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर तुम्ही पैसे या योजनेतून काढू शकतात. आता मुलीचे वय अठरा वर्षानंतर लग्न झाले तर पैसा काढता येईल किंवा न झाल्यास वयाच्या अठराव्या वर्षानंतर तुम्ही मुलीचे शिक्षणासाठी 50% रक्कम काढू शकतात.
तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि या योजनेसाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- पालकाचे ओळखपत्र
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- वडिलांचे ड्रायव्हिंग लायसन्स
- राहण्याचा पत्ता
- रेशन कार्ड
- विज बिल
- पाणी बिल
हे देखील वाचा: एका हेक्टर मध्ये 76 क्विंटल गव्हाचे उत्पादन देणार वाण! उत्पन्न वाढवण्यास उपयुक्त
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत गुंतवणुकीचे फायदे कोणते?
मित्रांनो, तुम्हीही जर मुलीचे वडील असाल तर या योजनेचा लाभ तुम्ही देखील घेतला पाहिजे. आता आपण पाहूया सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला त्याचा काय फायदा होईल.
उच्च व्याजदर: Sukanya Samruddhi Yojana ही इतर योजनेच्या तुलनेत एक चांगलं व्याजदर देणारी योजना आहे.या योजनेअंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात पहिल्या तीनही नुसार 7.6 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल.
तुमच्या सोयीनुसार गुंतवणूक: सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत गुंतवणूकदार एका वर्षात कमीत कमी 250 रुपये जमा करू शकतो, त्याचप्रमाणे वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकतो. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार या योजनेतून गुंतवणूक करू शकतात.
कर सवलत: आयकर कायद्याच्या कलम 80cनुसार सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक केल्यास कर सवलतीचा लाभ मिळू शकतो.
सुलभ हस्तांतरण: या योजनेअंतर्गत खाते चालवणारे पालक अत्यंत सुलभ पद्धतीने देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात खाते हस्तांतरित करू शकतात.
चक्रवाढीचा लाभ: सुकन्या समृद्धी योजना ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला वार्षिक चक्रवाढ दराचा लाभ होतो. तुम्ही जर या योजनेअंतर्गत गुंतवणूक केली असेल तर तुम्हालाही दीर्घ कालावधीतही उत्कृष्ट परताव्याचा लाभ नक्कीच मिळेल.