Solar Power Generator: लाईट गेल्यावर सर्वात मोठी समस्या येते ती पंखा आणि लाईट बंद होण्याची. तर, आजकाल वाढत्या इंटरटनेटच्या वापरामुळे Wi-Fi बंद होण्याची समस्या देखील मोठीच आहे. अशात प्रत्येक घरात Power Back Up असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही Solar Power Generator चा विचार करू शकता. सध्या मार्केटमध्ये अनेक सोलर पावर जनरेटर उपलब्ध आहे, ज्यात एकदा पैसे गुंतवल्यानंतर लाईट जाण्याचे टेन्शनच संपते. तसेच वीज बिलही येत नाही. काही भन्नाट सोलर जनरेटरचे पर्याय पाहूया जे वीज बिल कमी करण्यात तुमची मदत करतील.
मित्रांनो पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि आपल्याला माहीतच आहे की पावसाळ्यामध्ये जास्त करून शहरापेक्षा गावामध्ये लाईट जाण्याचा प्रॉब्लेम खूप असतो. बहुतेक वेळा दोन ते तीन दिवस सुद्धा लाईट येत नाही. अशा वेळेस लाईट विना खूप समस्या निर्माण होतात. आता सौर ऊर्जा जनरेटर चा वापर करून तुम्ही या समस्या दूर करू शकतात. सोलर जनरेटर द्वारे रात्रभर, टीव्ही, फ्रिज, कुलर मोबाईल फोन चार्जिंग आपण चालवू शकतो. चला तर मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेऊया की काय आहे हे सौर ऊर्जा जनरेटर, याचा तुम्हाला नेमका कसा फायदा होईल, आणि काय आहे या सौर ऊर्जा जनरेटर ची किंमत?
हे देखील वाचा: येथे क्लिक करून बघा एलपीजी गॅस सिलेंडरवर मिळतोय 50 लाख रुपयांचा लाभ कोणाला आणि कसा?
Solar Power Generator
या सोलार पावर जनरेटरने आपण लाईट विना होणारा त्रास दूर करू शकतो. आपण मोबाईल चार्जिंग करू शकतो. रात्रभर टीव्ही, कुलर, फ्रिज अशा वस्तू चालवू शकतो. सोलार पावर जनरेटर ची किंमत 19 हजार रुपयांपर्यंत आहे. आपण हे ॲमेझॉन वरून खरेदी करू शकतात.
आता आपण या सौर ऊर्जा जनरेटर बद्दल अधिक माहिती पाहूया.
सौर ऊर्जा जनरेटर
या सोलार पावर जनरेटर चे खास वैशिष्ट्य म्हणजे हे पोर्टेबल सोलर पावर जनरेटर आहे. या जनरेटर मध्ये एकूण 150 वॅट आउटपुट मिळते. याचे वजन 1.89 किलोग्रॅम एवढे आहे. 2 DC Ports यामध्ये अवेलेबल आहे.
शिवाय 3 USB पोर्ट सुद्धा आहे. या सौर ऊर्जा जनरेटर मध्ये एलईडी फ्लॅश लाईट आहे आणि लिथियम बॅटरी सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे हे सोलर पावर जनरेटर आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
हे देखील वाचा: Suryanutan Solar Stove सूर्य नूतन सोलर स्टोव्ह ची किंमत किती आहे?
Solar Power Generator for Home
- हे सौर ऊर्जा जनरेटर 150 वॅट्स आहे आणि 3.7 volt या ठिकाणी आहे.
- या पोर्टेबल सोलार पॉवर जनरेटर ला आपण कुठेही ट्रॅव्हल करून घेऊन जाऊ शकतो.
- या सोलर पावर जनरेटर सोबत एक कार चार्जर, एक सिगरेट लाईटर चार्जर देण्यात आलेला आहे.
- एकदा पूर्ण चार्ज झाल्यास त्यावर फोन, टॅबलेट, लॅपटॉप, मिनी फॅन, टीव्ही इत्यादी सहज चालवता येतात.
- तसेच, फोन १५ वेळा चार्ज केला जाऊ शकतो. ही क्षमता फोनच्या बॅटरीवरही अवलंबून असते.
- मित्रांनो सध्या मार्केटमध्ये अनेक solar power generator उपलब्ध आहे, ज्यामध्ये एकदा पैसे गुंतवल्यानंतर लाईट जाण्याचे टेन्शनच संपून जाते.
- आता तुम्ही असे सोलार पावर जनरेटर घरी आणून वीज गेल्यानंतरचे होणारे प्रॉब्लेम थांबवू शकतात.
- त्यासोबतच वीज जमा करण्याचे टेन्शन नाही. असे mini solar generator तुम्हाला विज बिल कमी करण्यात तुमची मदत करतील.
- आजकाल इंटरनेटचा वापर वाढलेला आहे, त्यामुळे आता इंटरनेटच्या वापरामुळे wi-fi बंद होण्याची समस्या देखील मोठी आहे.
- अशा वेळेस तुमच्या घरीच जर पावर बॅकअप असेल तर अत्यंत चांगली गोष्ट आहे.
- मित्रांनो, तुम्ही लगेच खरेदी करा हा सोलार पावर जनरेटर आणि वीज नसल्यामुळे होणाऱ्या समस्यांना आळा घाला.
solar power generator, portable solar generator, solar power generator for home, portable solar power generator, mini solar generator