Shram Vidya Shaikshanik Karj Yojana|Education Loan|श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना|आता शेतकऱ्यांच्या मुला मुलींनाही मिळणार पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज|मुख्यमंत्री शिंदे यांची नवीन योजनेची घोषणा

आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना मिळू शकते पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज!

Shram Vidya Shaikshanik Karj Yojana: नमस्कार मित्रांनो, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजनेची घोषणा करण्यात आली आहे.  या योजनेअंतर्गत मुला-मुलींना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे. तसेच 10 लाखापर्यंत 2 टक्के आणि 10 ते 15 लाखापर्यंत 4 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी दिनांक 17 रोजी राज्य बॅंकेच्या मुंबई येथील मुख्यालयात कर्ज योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन झाले. याच प्रसंगी शिंदे यांनी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेने सामाजिक भावनेच्या दृष्टिकोनातून जाहीर केलेल्या या योजनेचे कौतुक केले. 

Shram Vidya Shaikshanik Karj Yojana
  • महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
  • शेतकरी कुटुंबातील मुलांनी त्यांचे शिक्षण या योजनेद्वारे पूर्ण करावे असे आव्हान देखील मुख्यमंत्री साहेबांकडून करण्यात आले.
  • चला तर मित्रांनो आता बघूया काय आहे यासंबंधीत योजना.
  • तर मित्रांनो श्रमविद्यात शैक्षणिक कर्ज योजना ही कर्जासाठी तारण किंवा प्रक्रिया शुल्क नसलेली योजना आहे.
  • 5 लाखांपर्यंत कर्जासाठी जामीनदाराची आवश्यकता नसेल. 

हे देखील वाचा: खुशखबर! आता गर्भवती महिलांना बाळंतविडा किट योजना अंतर्गत मिळणार 1 हजार दिवसासाठी बालसंगोपन साहित्य

Maharashtra State Co-Operative Bank Education Loan Scheme

  • महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या या श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी कोणतेही तारण किंवा प्रक्रिया शुल्क नाही.
  • 5 लाखापर्यंत कर्जासाठी जामीनदाराची आवश्यकता सुद्धा नाही.
  • अंतिम परीक्षा 75 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये आणि 90 टक्के गुण मिळवणारा विद्यार्थ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. 
  • सन 2023 पर्यंतच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. 12वी नंतर कोणत्याही शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील.
  • कर्ज परतफेडीचा कालावधी दहा वर्षे इतका असणार आहे.
  • कर्ज परतफेड ही तुम्हाला नोकरी लागल्यानंतर होईल.
  • पाच ते दहा लाख पर्यंतच्या कर्जासाठी तारणाची गरज नाही पण एक जामीनदार आवश्यक आहे.

हे देखील वाचा: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या तीन योजना

10 लाख ते 15 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी तारण आणि 2 जामीनदारांची आवश्यकता असते. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकार 5 लाखांपर्यंतच्या कर्जावर 0 टक्के, 5 लाख ते 10 लाखांपर्यंतच्या कर्जावर 2 टक्के आणि 10 लाख ते 15 लाखांपर्यंतच्या कर्जावर 4 टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज योजना राबवणार आहे.

Join Whatsapp Channel

Shram Vidya Shaikshanik Karj Yojana

  • ही “श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना” महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँकेची योजना असून ही योजना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठी पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणारी योजना आहे.
  • या योजनेची अधिक माहिती हवी असल्यास तुम्हाला महाराष्ट्र राज्य बँकेच्या वेबसाईटवर मिळेल.
  • ग्रामीण भागातील शेतकरी मुला-मुलींना बारावीनंतर शिक्षण घेण्यासाठी ही एक खास योजना आहे.
  • हा लेख अशा मुला-मुलींपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना या योजनेचा फायदा घेता येईल.

हे देखील वाचा: सूक्ष्म आणि लघु उद्योगांना मिळणार 5 कोटीपर्यंत विनाकारण  कर्ज

 Shram Vidya Shaikshanik Karj Yojana: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणारी योजना:

शेतकऱ्यांच्या मुला- मुलींच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या  श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला आणि मुलींना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी पाच लाखांपर्यंत बिनव्याजी तसेच पाच ते दहा लाखांपर्यंत दोन टक्के आणि दहा ते पंधरा लाखांपर्यंत चार टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मित्रांनो तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता अथवा तुमच्या आजूबाजूला  या योजनेस पात्र असू शकणाऱ्या मुला मुलींना या योजनेची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. मित्रांनो बारावीनंतर कोणत्याही शाखेचे शिक्षण तुम्हाला घ्यायचे असेल तरी तुम्ही या योजनेस पात्र ठेवतील. तसेच ज्या विद्यार्थ्यांना 90 टक्के गुण मिळालेले आहे अशा विद्यार्थ्यांना एक लाखांपर्यंतची व पारितोषिक देखील या योजनेअंतर्गत मिळणार आहे. तसेच मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही जामीनदाराची आवश्यकता नाही.

Shram Vidya Shaikshanik Karj Yojana, education loan scheme, maharashtra government education loan scheme

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!