शासन निर्णय Sheli Palan Yojana:शेळी मेंढी पालन योजनेला नवीन मंजुरी | पहा काय आहे या योजनेचे स्वरूप अटी आणि शर्ती | शेळी पालन माहिती

Sheli Palan Yojana: नमस्कार मित्रांनो, आज आपण शेळी आणि मेंढी पालन योजनेबद्दल आलेल्या नवीन मंजुरी बद्दल जाणून घेऊया. मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे Sheli Palan Yojana  ही 2011-12 पासून  सुरू केलेली योजना आहे. शेळी पालन योजना अंतर्गत लाभार्थ्याला शेळ्या मेंढ्या तसेच बोकड आणि नर मेंढा यांचा शासन निर्णयांमध्ये नमूद केलेली किंमत दिली जात होती. परंतु शेळ्या मेंढ्या आणि बोकड, नर मेंढा यांच्या किमतीत वाढ होत असल्याने शासन निर्णयामध्ये सांगितलेल्या किमतीमध्ये हे पाळीव प्राणी उपलब्ध करून देण्यास अडचणी येत आहेत. यामुळे अर्ज करणाऱ्या लाभधारक तसेच लोकप्रतिनिधींकडून या योजनेअंतर्गत दिलेल्या दरामध्ये सुधारणा करण्याची वारंवार मागणी केली जात होती.

वाढत्या किमतीमुळे शेळ्या मेंढ्या तसेच बोकड आणि नर मेंढा उपलब्ध करणे बिकट होत आहे. मित्रांनो,  शेळी पालन हा शेती व्यवसायाला पूरक आणि कमी खर्चात होणारा व्यवसाय मानला जातो. शिवाय हा व्यवसाय कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणार आहे. 

Join Whatsapp Channel

शेळ्या किंवा मेंढ्यांचे सध्याचे बाजारातील किमती विचारात घेऊन मुक्त किमतीत वाढ करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. याच अनुषंगाने 21 मे 2019 रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये खाली दिल्याप्रमाणे काही शासन निर्णय घेण्यात आले.

Sheli Palan Yojana शेळी पालन व्यवसाय माहिती

Sheli Palan Yojana या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचे स्वरूप कसे राहील?

मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करणारा  अर्जदार हा खुल्या प्रवर्गातील किंवा मागास प्रवर्गातील असेल तर,

 त्याला लाभासाठी मिळणारा रकमेतील 50% हिस्सा राज्य सरकार आणि राहिलेला 50 टक्के अर्जदाराला स्वतः भरावा लागेल. किंवा बँकेतून कर्ज पद्धतीने भांडवल उभारणी करावी लागेल.

 Sheli Palan Yojana अंतर्गत जर अर्जदार हा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असेल तर,

 त्याला मिळणाऱ्या एकूण लाभार्थी रकमेच्या 75 टक्के हिस्सा राज्य सरकार देईल तर राहिलेला पंचवीस टक्के लाभार्थ्याला स्वतः रकमेच्या स्वरूपात भरावा लागेल. किंवा बँक  कर्ज पद्धतीने उपलब्ध करावा लागेल.

 दुसरी गोष्ट म्हणजे जरी बँकेकडून लोन प्रकरण मंजूर झाले तरी बँक हे जास्तीत जास्त वीस टक्के कर्ज तुम्हाला देऊ शकेल म्हणजेच तुम्हाला पाच टक्के रक्कम स्वतः भरावी लागणार आहे.

हे देखील वाचा: आम आदमी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा?

शेळी पालन अनुदान योजनेमध्ये लाभार्थी निवडीचे निकष काय?

 मित्रांनो शेळीपालन अनुदान योजनेमध्ये  लाभार्थी कसा निवडला जाईल? कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातील? कोणत्या व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल? हे आपण बघूया.

  • दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी या योजनेस पात्र.
  • अत्यल्प भूधारक म्हणजेच एक हेक्टर पर्यंतचे भूधारक लाभार्थी या योजनेस पात्र राहतील.
  • अल्पभूधारक म्हणजेच एक ते दोन हेक्टर पर्यंतचे भूधारक व्यक्ती या योजनेत पात्र राहतील.
  • सुशिक्षित बेरोजगार रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेला बेरोजगार युवक या योजनेस पात्र राहील.
  • महिला बचत गटातील लाभार्थी या योजनेस पात्र राहील. 

चला तर मित्रांनो, आता आपण पाहूया या योजनेअंतर्गत शेळ्या मेंढ्या आणि बोकड, नर मेंढा यांचा खर्चाचा तपशील कसा असणार आहे.

sheli palan yojana

हे देखील वाचा: गाय म्हैस वाटप योजना mahabms शासन निर्णय

Sheli Palan योजनेअंतर्गत शेळी मेंढी गटाचा विमा

  • मित्रांनो, Sheli Palan Karj Yojana अंतर्गत शेळ्यांची किंवा मेंढ्यांची खरेदी केल्यानंतर लाभधारक व्यक्तीला  त्यांचा विमा लगेच उतरवून घेणे बंधनकारक राहील. यातील 50 टक्के विमा रक्कम लाभार्थ्याने भरणे बंधनकारक आहे.
  •  शेळी किंवा मेंढी गटाचा विमा लाभार्थी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावे उतरविण्यात यावा.
  •  गट पालन योजनेअंतर्गत गटातील विमा संरक्षित असलेल्या शेळी/ मेंढी/ बोकड/ किंवा नर  मेंढा यांचा मृत्यू झाल्यास प्राप्त होणाऱ्या विम्याच्या रकमेतून लाभार्थ्यांनी पुन्हा शेळी/ बोकड/ मेंढी किंवा  नर मेंढे खरेदी करणे आवश्यक राहील.
  •  सोबतच लाभार्थ्याने विहित नमुन्यात बंधपत्र करून देणे आवश्यक राहील.

शेळी पालन योजनेअंतर्गत शेळी/ मेंढी गट खरेदी करण्यासाठी खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे:

  1.  पशुधन विकास अधिकारी( विस्तार)
  2.  पशुधन विकास अधिकारी/ स. प. वि. अ/ प.प निकटम पशुवैद्यकीय दवाखाना
  3.  राष्ट्रीयकृत बँकेचा प्रतिनिधी
  4.  विमा कंपनीचा प्रतिनिधी
  5.  आणि लाभार्थी

मित्रांनो, आता या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाईल.

Download PDF

हे देखील वाचा: नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये ,सरकारने महासन्माननी दिला दिला हिरवा कंदील

Sheli Palan योजनेअंतर्गत अंमलबजावणी  पद्धती(sheli mendhi palan yojana online application):

  • या  योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांची एकदा निवड झाल्यानंतर त्यांना कोअर बँकिंग ची सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडावे लागेल.
  •  अथवा आधीच तुमचं अशा बँकेत खाते असल्यास ते खाते तुम्हाला या योजनेची जोडणे आवश्यक राहील.
  • जेणेकरून त्या खात्यामध्ये या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम डीबीटी द्वारे दिली जाईल.
  •  लाभार्थ्याने त्याचा आधार कार्ड क्रमांक आणि पॅन कार्ड क्रमांक या बचत खात्याशी जोडलेला असणे बंधनकारक राहील.
  •  वरील प्रमाणे उघडलेल्या बँक खात्यामध्ये लाभार्थ्याने स्वतःच्या हिस्स्याची रक्कम जमा केल्याची खात्री केल्यानंतर शासकीय अनुदानाची रक्कम डीबीटी द्वारे बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.
  •  त्यानंतर या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या उस्मानाबादी/ संगमनेरी किंवा अन्य स्थानिक जातीच्या शेळ्या किंवा बोकडांची
  • तसेच माडग्याळ, दख्खनी व इतर स्थानिक जातीच्या मेंढ्या/ नर मेंढ्यांची खरेदीकरण्यात येईल.
  •  प्रामुख्याने पुण्यश्लोक अहिल्याबाई महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळ यांचे कडून ही खरेदी करण्यात येईल.
  •  महामंडळाकडे शेळ्या/ मेंढ्या/  नर मेंढेसर उपलब्ध नसेल तर अधिकृत बाजारातून खरेदी करण्यात येईल.

 अशा प्रकारे शेळी पालन योजना अंतर्गत अंमलबजावणी कार्यपद्धती(sheli mendhi palan yojana online application) असणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. आजच्या लेखांमधील माहिती आवडल्यास इतर व्यक्तींपर्यंत अवश्य शेअर करा. जेणेकरून सर्वजण या योजनेचा लाभ घेऊ शकतील. धन्यवाद!

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!