Sheli Palan Yojana: नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण एका नवीन योजनेबद्दल माहिती घेणार आहोत ती म्हणजे शेळी पालन अनुदान योजना. आज आपण मराठवाडा दहा शेळ्या आणि दोन बोकड गट वाटप योजना जाणून घेऊया. ज्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात ही 20 शेळ्या आणि 2 बोकड वाटप योजना राबविण्यात मान्यता मिळालेली आहे तेआहेत उस्मानाबाद, यवतमाळ, सातारा, आणि गोंदिया. दुसऱ्या टप्प्यात बीड आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये ही शिर्डी गट वाटप योजना राबविण्यात प्रशासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून शेळी गट वाटप राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनेमधील शेळ्या आणि बोकडाची किंवा मेंढ्या आणि नर मेंढ्याची आधारभूत किंमत वाढविण्यास 12 मे 2019 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने प्रदान केलेली आहे. त्याचा आधारे खालील प्रमाणे शासन निर्णय मिळालेला आहे.
Sheli Palan Yojana: 20 शेळ्या 2 बोकड गट वाटप योजना शासन निर्णय:
शेळी पालन योजना अंतर्गत 20 शेळ्या 2 बोकड गट वाटप साठीनिवड झालेल्या लाभार्थ्याला शेळी आणि बोकड घट वाटप करणे प्रस्तावित असलेल्या शेळी गटाचा एक अनपेक्षित खर्च शेळी गट व शेळ्यांसाठी 2 लाख 31 हजार 400 रुपये इतका आहे. या योजनेअंतर्गत गट व स्थापना करताना सुरुवातीला लाभार्थ्याला शंभर टक्के निधी स्वतः किंवा वित्तीय संस्थेचे म्हणजेच बँकेचे कर्ज याद्वारे उभा करावा लागणार आहे. सर्व प्रवर्गासाठी प्रत्यक्ष खर्च 50% प्रति गट कमाल मर्यादा एक लाख पंधरा हजार याप्रमाणे अनुदान मिळेल. तसेच गट कमीत कमी 1 लाख 15 हजार 700 रुपये याप्रमाणे अनुदान देय राहणार आहे.
हे देखील वाचा: शासन निर्णय: तलंगा गट वाटप – योजनेचे नाव – ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे
पशुसंवर्धन शेळी गट वाटप योजनेचा तपशील(Pashusavardhan Yojana Application Form):
- पशुसंवर्धन योजनेअंतर्गत 20 शेळी खरेदी करण्यासाठी सहा हजार रुपये असणार आहे.
- या 20 शेळी गटाची अपेक्षित एकूण किंमत 1 लाख 20 हजार एवढी असणार आहे.
- दोन बोकड खरेदी करण्यासाठी एक बोकड आठ हजार रुपयांना तर असे दोन बोकड गटाची किंमत एकूण 16 हजार रुपये असणार आहेत.
- शेळ्यांसाठी शेड बांधण्यासाठी 450 चौरस फुटाचा वाडा प्रति शेळी किंवा बोकड 212 रुपये प्रति चौरस फूट या दराने एकूण शेळ्यांचा वाडा बांधण्याची टोटल किंमत 95400 रुपये एवढी असणार आहे.
- असे 20 शेळ्या, दोन बोकड आणि शेळ्यांसाठी शेड सर्व एकत्रितपणे होणाऱ्या खर्चाची रक्कम 2,31,400 रुपये इतकी असणार आहे.
अ.क्र. | तपशील | दर( प्रति शेळी/ बोकड) | गटांची एकूण किंमत |
1 | 20 शेळ्या खरेदी | 6000 रुपये | 1,20,000 रुपये |
2 | 2 बोकड खरेदी | 8000 रुपये | 16,000 रुपये |
3 | शेळ्यांचा वाडा(450 चौ. फूट) | 212 रुपये चौ.फूट | 95,400 रुपये |
एकूण | 2,31,400 रुपये |
अ.क्र. | गटाचे स्वरूप | गटाची किंमत | 50% अनुदान रक्कम |
1 | 20+2 शेळी गट वाटप | 2,31,400 रुपये | 1,15,700 रुपये |
हे देखील वाचा: महाडीबीटी बियाणी वितरण अनुदान योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करावा
Sheli Palan Yojana 2023 GR
- मित्रांनो, पशुसंवर्धन विभागामार्फत शेळी पालन योजना 2023 साठी शेळी गट वाटपाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण
- आणि जिल्हास्तरीय योजनेमधील शेळी आणि बोकडाची/ मेंढ्या आणि नर मेंढ्यांची आधारभूत किंमत वाढविण्यास 12-5-2021 रोजी झालेल्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे.
- याच अनुषंगाने शासन तर्फे निर्णय तयार करण्यात आलेले आहे.
- महाराष्ट्र सरकारने जारी केलेला sheli palan gr pdf मध्ये तुम्हाला सर्व निर्गमित केलेले निर्णय दिसतील.
- मित्रांनो, केवळ शेती या मुख्य व्यवसायावर अवलंबून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही, हे आपल्याला माहीतच आहे.
- नैसर्गिक संकटे, बाजार भाव यामुळे उत्पादनाबद्दल शेतकऱ्याच्या मनात नेहमीच शंका असते.
- यासाठी आपल्याला पर्याय नक्कीच शोधावा लागेल जर शेतीसोबतच जोड व्यवसाय केला तर प्रत्येक शेतकऱ्याची चिंता काहीशी मिटेल.
- मात्र, कोणता जोड व्यवसाय करावा, सुरुवात कशी करावी याचाच विचार मनात चालू असतो.
- शेळीपालन हा व्यवसाय अत्यंत चांगला व्यवसाय आहे यात उत्पन्न देखील चांगले आहे.
- शेतकरी मित्रांनो, या लेखामध्ये दिल्याप्रमाणे अनुदान लाभार्थी शेतकऱ्याला देयर राहील.
- तुम्ही या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्या.
- गरजू लोकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवा. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारकडून मिळणार आहे.
- माहिती आवडली असल्यास नक्की शेअर करा, धन्यवाद!
नमस्कार मला या योजनेचा फायदा कसा काय करून घेणे सोपे होईल याची माहिती मिळावी अशी विनंती