SBI Mudra Loan In 59 minutes: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ने कोविड-19 च्या संकटामध्ये छोट्या मोठ्या उद्योजकांसाठी 59 मिनिटांमध्ये दहा हजार रुपयांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंतचे लोन देत आहे. मित्रांनो, देशातील सर्वात मोठे बँकेकडून हे लोन छोट्या-मोठ्या उद्योजकांना एसबीआय इ मुद्रा लोन योजनेअंतर्गत दिल्या जात आहे.
तुम्हाला जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुमच्या सध्याचा व्यवसाय वाढवायचा असेल तर ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. भारतातील एसबीआय बँकेकडून ग्राहकांसाठी फक्त एका क्लिकवर वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. बँकेच्या ग्राहकांना आता अर्जंट 50 हजार रुपये कर्ज घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मिळवता येणार आहे. SBI E Mudra Loan बँकेत न जाता ग्राहकांना घरबसल्या उपलब्ध करता येईल. यासाठी एसबीआय च्या ग्राहकांना कोणत्याही कागदपत्रांची बँकेमध्ये जाऊन जमा करण्याची गरज नाही.
हे देखील वाचा: आता मोदी सरकार देणार पाच कोटी पर्यंतच कर्ज फक्त 59 मिनिटात: पहा कोणत्या बँकांनी वाढवली कर्जाची रक्कम
SBI Mudra Loan In 59 minutes
आता एसबीआयच्या ग्राहकांना एसबीआयचे शाखेमध्ये जाण्याची गरज नाही ते घरबसल्या देखील कर्ज मिळवू शकतात. SBI Mudra Loan In 59 minutesया योजनेअंतर्गत कर्जासाठी कर्ज पात्रता, क्रेडिट चौकशी, कर्ज मंजुरी आणि कागदपत्रे सादर करणे अशा सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केल्या जातात. तुम्ही जर लहान उद्योजक असाल तर तुम्ही तुमचा उद्योग वाढविण्यासाठी किंवा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
हे देखील वाचा: वृद्धापकाळत नियमित पेन्शन मिळवण्यासाठी जाणून घ्या काय आहे SBI चा हा खास प्लान
SBI E Mudra Loan चे फायदे कोणते?
- एसबीआय मुद्रा कार्ड वर तुम्हाला ओव्हर ड्राफ्ट ची सुविधा मिळते. हे कार्ड डेबिट कार्ड प्रमाणे काम करते.
- वेळ पडल्यास तुम्हाला क्रेडिट कार्ड प्रमाणे ही याचा वापर करता येतो.
- एसबीआय मुद्रा लोन साठी कोणतीही प्रोसेसिंग फी आकारली जात नाही.
- तसेच या कर्जासाठी कोणतीही हमी द्यावी लागत नाही. या योजनेअंतर्गत तुम्हाला बिझनेस लोन पेक्षा स्वस्त दरात कर्ज मिळते.
- महिला उद्योजकांना स्पेशल डिस्काउंट मिळतो. एसबीआय मुद्रा लोन हे महिलांना कमी व्याजदराने मिळते.
- या योजनेअंतर्गत कर्जावर 8.40 ते 12.35 टक्केपर्यंत इतका व्याजदर आकारला जातो.
- तुमचा उद्योग चांगला सुरू असेल तर सहा महिन्यांचे व्याजही माफ केले जाऊ शकते.
- एसबीआय मुद्रा लोन हे 18 ते 65 वयोगटातील व्यक्तींना मिळू शकते.
चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया एसबीआय ई मुद्रा लोन मिळवण्याची ऑनलाईन पद्धत कोणती आहे.
हे देखील वाचा: सूक्ष्म आणि लघु उद्योगांना मिळणार 5 कोटीपर्यंत विनाकारण कर्ज
एसबीआय मुद्रा लोन साठी अर्ज कसा करावा? (SBI E Mudra Loan Apply Online)
SBI Mudra Loan In 59 minutes हवे असल्यास तुम्ही नजीकच्या शाखेची संपर्क साधू शकता अथवा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हे कर्ज मिळवता येईल. त्यासाठी एसबीआयच्या ई मुद्राच्या संकेतस्थळावर जावं लागेल. त्यानंतर सूचनांचे पालन करत सर्व विचारलेली माहिती भरावा लागेल. पुढे एक अर्ज भरून तो सबमिट करावा. यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक द्यावा लागेल. पुढे तुमच्या रजिस्टर नंबर वर एक ओटीपी येईल तो सबमिट केल्यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल.