SBI life smart annuity plus plan: नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण SBI च्या एका नवीन प्लान बद्दल जाणून घेणार आहोत. हा खास प्लान तुमच्या म्हातारपणामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. हा pension plan काय आहे हे आपण येथे जाणून घेऊया.
SBI Life Smart Annuity Plus Plan: New Pension Plan
मित्रांनो एकदा की आपण रिटायर म्हणजेच सेवानिवृत्त झालं तर त्यानंतरच्या काळासाठी आपल्याजवळ पैसे असणे आवश्यक आहे. या काळात नियमित उत्पन्न म्हणजेच आपल्याला मिळणारे निवृत्तीवेतन आपल्याला मदत करते. पण काही व्यक्ती जे नोकरी नाही करत त्यांना आपल्या वृथापकाळासाठी काहीतरी व्यवस्था करावी लागते. अशा वेळेस तुमच्यासाठी SBI life smart annuity plus plan फायदेशीर ठरतो. चला तर मित्रांनो आता आपण या प्लान बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
हे देखील वाचा: ऑफलाइन/ऑनलाईन पद्धतीने लिंक करा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी
एसबीआय लाइफ स्मार्ट ॲन्युइटी प्लस प्लॅन
एसबीआय लाइफ स्मार्ट ॲन्युइटी प्लस प्लॅन हा एक स्वतंत्र, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टीसिपेटेटिंग,जनरल ॲन्युइटी प्रोडक्सच्या सहाय्याने आयुष्यभर आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य होण्यासाठी मदत करणारा plan आहे. यामध्ये तुम्हाला निवडीसाठी तात्काळ आणि विलंबित असे दोन पर्याय दिले जातात. हे प्लान तुम्हाला तुमचे जीवनमान कायम राखण्याची संधी देत असते. SBI life smart annuity plus मुळे तुमचे सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्य सुख समाधानात जायला मदत होते.
हे देखील वाचा: दहा मिनिटात असं मिळवा घरबसल्या ५० हजार रुपये लोन | एसबीआई ई मुद्रा लोन
SBI pension plan for senior citizen साठी लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत?
मित्रांनो, जर तुम्हालाही हा प्लान अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी लाभार्थी निवडीचे कोणकोणते अटी आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे. ते आपण पुढे दिलेल्या इमेज मध्ये पाहू शकता. जर तुम्हाला या प्लान बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. त्यासाठी तुम्ही पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.
हे देखील वाचा: फायदा करायचाय? पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मिळणार 1.85 लाख रुपये व्याज बघा कोणाला आणि कसे
तुमच्याकडे उपलब्ध असलेले ॲन्युइटी पर्याय कोणते?(smart annuity plus plan Option)
मित्रांनो, तुमच्याकडे उपलब्ध असलेले ॲन्युइटी चे पर्याय कोण कोणते आहेत ते आपण आता पाहूया.
- वार्षिकी पर्याय
- आजीवन उत्पन्न
- भांडवली परताव्यासह उत्पन्न(आजीवन)
- शिल्लक भांडवली परताव्यासह उत्पन्न(आजीवन)
- 3% किंवा 5% वार्षिक वाढीसह उत्पन्न(आजीवन)
- 5,10,15 किंवा 20 वर्षाच्या ठराविक कालावधी सह उत्पन्न
- नियमित उत्पन्न
- ॲन्युइटी पेआउट पर्याय
- पेआउटची वारंवारता
- उच्च प्रीमियम साठी प्रोत्साहन
- सवलत
smart annuity plus plan customer care number?
Customer care number: 1800 267 9090