RBI Bank License Ban List: मित्रांनो तुमचेही बँकेमध्ये खाते असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. RBI बँकेने आठ बँकांचे परवाने रद्द केलेले आहेत. त्यांचे लायसन्स रद्द करून त्यांच्या होणाऱ्या व्यवहारावर बंदी घातलेली आहे. त्यासंबंधीचे अपडेट आपण आजच्या लेखांमध्ये पाहूया. चला तर मित्रांनो बघूया कोणते आहेत या बँका.
रिझर्व बँकेने भारतातील तब्बल आठ बँकांना दणका दिलेला आहे म्हणजेच त्यांचा परवाना रद्द केलेला आहे. त्यांचं लायसन्स रद्द झाल्यामुळे त्यांना आता कोणतेही व्यवहार करता येणार नाही. मित्रांनो, तुमच्यासाठी त्या बँकांचे नाव जाणून घेणे महत्त्वाचे आहे कारण तुमचे त्या बँकांमध्ये खाते तर नाही ना.
रिझर्व बँक ऑफ इंडिया ने 31 मार्च रोजी संपलेला आर्थिक वर्षात अनेक सहकारी बँकांचे परवाने रद्द केलेले आहेत.
RBI Bank License Ban List:
यामध्ये जर तुमचे बँक खाते असेल तर तुम्हाला कुठे दिलेली माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. या 8 बँकांना रिझर्व बँकेकडून कारवाईचा सामना करावा लागलेला आहे. त्यांचे परवाने तर रद्द झालेले आहेतच सोबतच त्यांना मोठा दंडही ठरवण्यात आला आहे. आरबीआयचा कारवाईचा फटका सहकारी बँकांना बसलेला आहे.
काही बँकांना नियमाचे पालन न केल्याबद्दल रिझर्व बँकेने 100 पेक्षा जास्त वेळा बँकांवर दंड देखील ठरविले आहे. या आठ बँकांमधील अनियमितता समोर आल्याने आरबीआयने कठोर पाऊल उचललेले आहे. चला तर मित्रांनो आता जाणून घेऊया या 8 बँका कोणत्या आहेत.
हे देखील वाचा: येथे क्लिक करून RBI ने लायसन्स रद्द केलेल्या आणि व्यवहारावर बंदी घातलेल्या 8 बँकांची यादी पहा
RBI ने 114 वेळा ठोठावला दंड
31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष 2022-23 या वर्षात आठ सहकारी बँकांवर कारवाई केली. त्यांचा परवाना रद्द केला. काही बँकांवर तर आरबीआयने 114 वेळा ठोठावला दंड ही आहे.या बँकांवर काही आरोप लावण्यात आलेले आहेत जसे की नियमांचे पालन न करणे. या सहकारी बँकांच्या माध्यमातून आपल्या देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागात बँकिंगच्या सुविधा झपाटाने पोहोचल्या गेल्यात, पण या बँकांनी नियमांचे पालन केलेच नाही. यांच्या मनमानी विरोधात आरबीआयने कडक कारवाई केली आहे. या सहकारी बँकांवर आरबीआयचे काटोकारपणे लक्ष असते आणि त्यामुळेच यांचे दुर्व्यवहार लक्षात आले.
RBI Bank License Ban List: सहकारी बँकांवर रिझर्व बँकेची कारवाई
मित्रांनो, वर दिलेले लिंक वर क्लिक करून तुम्ही त्या बँकांची यादी तपासू शकतात. अपुरे भांडवल, बँकिंगचे पालन न करणे यामुळे आरबीआयने वरील बँकांचा परवाना रद्द केलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून सहकारी बँकिंग क्षेत्रावर आरबीआयकडून देखरेख केली जात आहे. आरबीआयच्या मध्यवर्ती बँकेने 2021-22 मध्ये 12 सहकारी बँकांचे परवाने, तर 2020-21 मध्ये 3 बँका, आणि 2019-20 मध्ये 2 सहकारी बँकांचे परवाने रद्द केलेले आहेत.
हे देखील वाचा: ऑफलाइन/ऑनलाईन पद्धतीने लिंक करा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी
नियमांचे पालन न केल्याचा आरोप
- सहकारी बँकांना नियमांचे उल्लंघन आणि अपुरे भांडवल यामुळे मोठा फटका बसलेला आहे.
- त्यातच स्थानिक नेत्यांचा वारंवार हस्तक्षेप असल्यामुळे या अशा बँका आरबीआयच्या नियमांकडे डोळेझाक करत असतात.
- म्हणूनच गेल्या एक वर्षात 8 आठ बँकांवर सातत्याने आरबीआयचे लक्ष होते.
- आणि शेवटी त्यांना दंड ठोठवण्यात येऊन त्यांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहे.
हे देखील वाचा: अशा प्रकारे मिळवा 3000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये
ठेवीदाराचा पैसा
- बँकांचे परवाने रद्द झाल्यावर ठेवीदाराला ठेव विमा आणि क्रेडिट हमी महामंडळाकडून एक ठराविक रक्कम नुकसान भरपाई च्या रूपात दिली जाते.
- त्यामुळे ग्राहकांना एक ठराविक रक्कम मदत म्हणून मिळणार आहे.
- केंद्र सरकारने ग्राहकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी या नुकसान भरपाई रक्कम वाढीचा निर्णय घेतला होता.
- 2020 मध्ये सरकारने याविषयीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विमा संरक्षण वाढविण्यात आलेले आहे.
- याआधी बुडीत बँकेतील ठेवीदारांना एक लाख रुपये मिळत होते. आता ही रक्कम पाच लाख रुपये इतकी झालेली आहे.
RBI Bank License Ban List, बँकांचे लायसन्स केले रद्द, rbi bank, rbi bank license