Pradhanmantri surakshya bima yojana in marathi | फक्त 20 रुपयात मिळणार दोन लाखांचे विमा संरक्षण | असा घेता येणार या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ

मित्रांनो, आपल्या जीवनात अनेक चढ-उतार येत असतात. कधी कधी आपण त्याच्यातून लवकर सावरतो तर कधी कधी खूप वेळ लागतो. आपल्या आयुष्यात आणीबाणीची परिस्थिती केव्हाही उद्भवू शकते, अशावेळी आपल्याला मोठ्या रकमेची तात्काळ आवश्यकता भासते.अशा परिस्थितीमध्ये आपल्याजवळ साठवलेले पैसे राहत नाही. जर आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे किंवा स्वतः कुटुंबप्रमुखाचे अपघात होऊन शारीरिक हानी  झाल्यास अशावेळी आपल्याला वाटते की आज विमा असता तर बर झाले असते. काही काही वेळी तर अपघाती मृत्यू देखील होतो अशा वेळेस कुटुंबातील इतर सदस्यांकडेआर्थिक स्त्रोत नसतो. आपल्या देशात अनेक कुटुंब आहेत, ज्यांच्याकडे विम्याचा महाबळा हप्ता भरण्यासाठी उत्पन्न असते. कमी उत्पन्न असलेल्या गरीब वर्गातील लोकांसाठी जास्त प्रीमियम भरणे शक्य नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhanmantri surakshya bima yojana) अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना Pradhanmantri surakshya bima yojana

 प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक अपघाती विमा योजना आहे. अपघातामुळे अपंगत्व किंवा मृत्यू आल्यास त्या विमाधारकास विम्याची रक्कम दिली जात असते. Pradhanmantri surakshya bima yojana या विमा योजनेसाठी वीस रुपये प्रीमियम राशी म्हणून खातेदाराच्या खात्यातून स्वयंचलित डेबिट करण्यात येतं. हा प्रीमियम दरवर्षी 31 मे रोजी देय असतो आणि विमा संरक्षण एक जून पासून सुरू होतं. 

हे देखील वाचा: आम आदमी विमा योजनेचे फायदे कोणते?

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

विमा संरक्षणाची वयोमर्यादा

pmsby या योजनेअंतर्गत 18 ते 70 वयोगटातील सर्व बँक/ पोस्ट ऑफिस खातेधारक या योजनेत सहभागी होण्यास पात्र असतील. एखाद्या व्यक्तीची जर वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती असतील तर ती व्यक्ती केवळ एकाच बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये असलेल्या खात्याद्वारे या योजनेत सहभागी होऊ शकते. बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्यासाठी आधार कार्ड हा प्रमुख के वाय सी कागदपत्र असणार आहे. 

हे देखील वाचा: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी पात्र कोण ठरणार?

pradhan mantri insurance योजनेत सहभागी होण्यास चा कालावधी आणि पद्धती

मित्रांनो, विमा संरक्षण एक जून ते 31 मे या एका वर्षाच्या कालावधीसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी दरवर्षी 31 मे पूर्वी या योजनेत सहभागी होणे आणि खात्यातून आपोआप प्रीमियम कट होणे याकरता विहित नमुन्यातील फॉर्म भरून द्यावा लागेल. या योजनेच्या अटींमध्ये काही बदल झालेले आहेत.  अर्जदार सहभागी होणे किंवा आपोआप निघून जाणे याचा पर्याय देत अनिश्चित किंवा प्रदीर्घ काळासाठी सहभागी होऊ शकतात. म्हणजेच जी व्यक्ती या योजनेतून मध्येच बाहेर पडली आहे, ती व्यक्ती सहभागी होण्याच्या पद्धतीनुसार पुन्हा  नव्याने पुढील वर्षासाठी सहभागी होऊ शकतात.

pm suraksha bima yojana  लाभ कोणते?

  • प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेअंतर्गत विमाधारकाचा जर  अपघाती मृत्यू झाला तर त्याला 2 लाख  रुपये मिळतील.
  •  जर दोन्ही डोळे संपूर्णपणे निकामी झाले किंवा दोन्ही हात/ पाय रिकामी झाले किंवा एका डोळ्याची दृष्टी जाणे आणि एक हात/ पाय निकामे होणे, या स्थितीमध्ये विमाधारकास 2 लाख रुपये मिळतील.
  •  जर एका डोळ्याची दृष्टी संपूर्णपणे गेली किंवा एक हात/ पाय संपूर्ण निकामी झाला तर या परिस्थितीत विमा धारकास 1 लाख रुपये मिळतील.

हे देखील वाचा: Swasthya bima yojana: स्वास्थ्य बीमा योजनेची संपूर्ण माहिती मराठीमध्ये

खात्यातून कट होणारा वार्षिक प्रीमियम किती आहे?

प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी  तुमचं बँक किंवा पोस्ट ऑफिस खाते असणे आवश्यक आहे. तसेच तुमचे एका पेक्षा जास्त बँक खाते असेल तर तुम्ही एकाच बँक खात्यामधून हा योजनेचा लाभ घेऊ शकतात. प्रीमियम रिन्यू म्हणजेच नूतनीकरण करण्यासाठी खात्यात पुरेशी राशी नसल्यास पॉलिसी रद्द करण्यात येईल. अशा परिस्थितीत दरवर्षी 31 मे पूर्वी सर्व खातेदारांनी त्यांच्या विमा पॉलिसीचे नूतनीकरण झाले आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.

विम्याच्या प्रीमियमचे पैसे थेट बँक खात्यातून डायरेक्ट डेबिट केले जातात. म्हणूनच तुमच्या बँक खात्यात कमीत कमी 20 रुपये ठेवणे आवश्यक आहे.  सध्या प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेची प्रीमियम राशी(pmsby premium) वीस रुपये आहे. हीच प्रीमियम राशी यापूर्वी 12 रुपये प्रतिवर्षीप्रमाणे होती. ही pmsby premium राशी एक जून 2022 पासून 20 रुपये एवढी करण्यात आलेली आहे.

हे देखील वाचा: Maharashtra Rojgar Hami Yojana MGNREGA: मनरेगाचा आधार, मजुरांना नियमित रोजगार

pradhan mantri suraksha bima yojanaचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती?(pmsby documents required)

  • ओळखपत्र- तुमचे आधार कार्ड, मतदान कार्ड, मनरेगा कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट तुम्ही ओळखपत्र म्हणून दाखवू शकतात.
  •  तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असावे.

 ऑनलाइन पद्धतीने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ कसा घ्यावा? (pradhan mantri suraksha bima yojana apply online)

  • कोणताही व्यक्ती ज्याचे बँक खाते आहे तो नेट बँकिंग सुविधा द्वारे या pmsby scheme चा लाभ घेऊ शकतो.
  • नेट बँकिंग सुविधा चा वापर करून ऑनलाईन PMSBY खातं खोलू शकतो.
  • अर्जदार आपल्या बँकेच्या खात्यामध्ये लॉगिन करून डॅशबोर्ड वर PMSBY खातं खोलू शकतो.
  • त्याच्यासाठी तुम्हाला काही विचारलेली माहिती तेथे भरावी लागेल.
  • आणि त्यासोबतच तुम्हाला खात्यातून प्रीमियम राशीची सहमती सुद्धा द्यावी लागेल.
  • जेणेकरून दरवर्षी तुमचा प्रीमियम ऑटोमॅटिक कट होऊन तुमची पॉलिसी RENEW होत जाईल.

 ऑफलाइन पद्धतीने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ कसा घ्यावा?(Offline)

  • PMSBY ऑफलाइन पद्धतीने लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या तुमचं खातं असलेल्या बँक शाखेत जावं लागेल.
  • तेथून तुम्हाला अर्ज घ्यावा लागेल.
  • तो अर्ज भरून त्याच्यासोबत विचारली सर्व कागदपत्रे जोडावे.
  • नंतर हा अर्ज बँक शाखेत जमा करावा.
  • त्याची तुम्हाला पावती मिळेल, त्यानंतर तुम्हाला विमा प्रमाणपत्र मिळून जाईल. 

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!