Pradhan Mantri Svanidhi Yojana | प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2023: उद्देश पात्रता, फायदे, ऑनलाईन अर्ज |  संपूर्ण माहिती

Pradhan Mantri Svanidhi Yojana: नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेल्या नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना. मित्रांनो आपल्याला माहीतच आहे कोविड मुळे लागलेल्या लॉकडाऊनचे आपल्या  जीवनावर खूपच  वाईट परिणाम झाला आहे.  लॉकडाऊन मध्ये रोडवर वस्तू विकत असलेल्या विक्रेत्यांच्या(Street Vendor) जीवनावर खूपच वाईट परिणाम झालेला आहे. असे विक्रेते खूपच कमी भांडवलात काम करत असतात.  या कोविड लोक डाऊन मुळे त्यांची बचतही  संपली. या फेरीवाल्यांची शहरवासी यांना परवडणाऱ्या किमतीत सेवा आणि वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यात खूप मोठी भूमिका असते.

 हे विक्रेते, ठेलेवाला, फेरीवाला,  रेहडी वाला  असे म्हणून काम करतात. हे विक्रेते भाजीपाला, रेडी टू इट स्ट्रीट फूड, फळे, चहा, ब्रेड, कापड, चप्पल बूट, स्टेशनरी सामान अशा विविध वस्तू विकत असतात. या फेरीवाऱ्यांना त्यांच्या पायावर पुन्हा उभे राहण्यासाठी सरकारने या Pradhan Mantri Svanidhi Yojana  ची सुरुवात केलेली आहे. या योजनेअंतर्गत या फेरीवाल्यांना भांडवल घेण्यासाठी कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत हे फेरीवाले एका वर्षासाठी कमी व्याजदरासह तारणमुक्त कर्ज घेऊ शकतात. चला तर मित्रांनो आता आपण पाहूया काय आहे ही योजना आणि या योजनेचा फायदा फेरीवाल्यांना कसा होणार आहे. त्याचबरोबर या योजनेची उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये काय. तसेच आपण पाहूया प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज पद्धती काय आहे.

Pradhan Mantri Svanidhi Yojana

Covid-19 मुळे फेरीवाल्यांच्या जीवनावर खूप वाईट परिणाम झालेला आहे. त्यांना पुन्हा त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेचा फायदा त्यांचे जीवनमान पुन्हा चांगल्या पद्धतीने सुरू करण्यासाठी होणार आहे. या योजनेचा कालावधी सुरुवातीला मार्च 2022 पर्यंत होता. आता हा कालावधी डिसेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आलेला आहे.

Join Whatsapp Channel

या विक्रेत्यांच्या  कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक तसेच आर्थिक उन्नतीसाठी या PM Svanidhi Yojana ची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत भारत सरकार रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना(Street Vendor) दहा हजार रुपये कर्ज देईल. हे कर्ज त्या लोकांना उत्पादन किंवा इतर वस्तू घेण्यासाठी वापरता येईल. एका वर्षाच्या आत या लोकांनी हप्ता भरणे आवश्यक आहे. या कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या विक्रेत्यांच्या खात्यात सरकार 7 टक्के वार्षिक व्याज अनुदान जमा करेल.

 या कार्यक्र योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या देशातील पात्र नागरिकांनी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. 50 लाखापेक्षा जास्त लोकांना या स्ट्रीट वेंडर्स सेल्फ रिलेंट फंडाचा फायदा होईल.  या कर्जाचा वापर करून विक्रेते,  फेरीवाले, आणि इतर फळे- भाजीपाला विक्रेते असे नागरिक येतात.

हे देखील वाचा: विहीर, गाई गोठा योजनेचा अर्ज ग्रामपंचायत स्वीकारत नसल्यास अशी करा ऑनलाईन तक्रार

PM Svanidhi Loan योजनेअंतर्गत एक वर्षासाठी तारण मुक्त कर्ज

PM Svanidhi Loan

पीएम स्वनिधी योजनेतून, रस्त्यावरील विक्रेत्यांना(Street Vendor) एक वर्षासाठी दहा हजार रुपयांपर्यंतचे तारामुक्त कर्ज देण्याची तरतूद केलेली आहे. म्हणजे विक्रेत्यांना कर्जासाठी कोणत्याही प्रकारची हमी देण्याची गरज भासणार नाही. आता या घेतलेल्या कर्जाची परतफेड मासिक हप्त्यांमध्ये करता  येईल. या योजनेअंतर्गत ज्यांनी पीएम स्व निधी योजनेतून मिळालेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली आहे त्यांना वार्षिक 7 टक्के व्याज अनुदान देखील मिळते.

PM Svanidhi Loan योजनेअंतर्गत सबसिडी खात्यावर कशी जमा होते?

 या योजनेअंतर्गत अनुदानाचे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात तिमाही( दर तीन महिन्याला) आधारावर पाठविले जातात. कर्जाच्या प्री पेमेंट वर सबसिडी एकाच वेळी खात्यात जमा केली जाते. विक्रेत्याने विहित पद्धतीने डिजिटल व्यवहार केल्यास या योजनेअंतर्गत  वार्षिक बाराशे रुपयांचा कॅशबॅक देखील दिला जातो.

पहिल्या कर्जाची परतफेड जर वेळेवर झाली तर  लाभार्थी 20000 रुपये पर्यंत जास्त कर्ज मिळवण्यास पात्र ठरतो. पुढचा टप्पा म्हणजे 50000 रुपयांचा. जर आधीचे कर्ज वेळेवर परतफेड लाभार्थ्यांनी केले तर तो 50000 रुपयांच्या कर्जास पात्र ठरतो. 

Pradhan Mantri Svanidhi Yojana ची आकडेवारी

एकूण अर्ज50,70,397
स्वीकारलेले अर्ज16,67,120
वितरित12,06,574
ऑन बोर्ड केलेल्या शाखांची संख्या1,46,966
स्वीकारलेली रक्कमRs 1,521.56 Crore
वितरित रक्कमRs 989.37 Crore
डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्या SVS10,07,536
SVS एकूण कॅश बॅक56,050 Rs
व्याज अनुदान0
 मिळालेले LOR  अर्ज11,43,547
नाकारलेले LOR  अर्ज34,422
अर्जदाराचे वय40

 प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते?

 Pradhan Mantri Svanidhi Yojana साठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे:

  • आधार कार्ड
  •  मतदान ओळखपत्र
  •  मनरेगा कार्ड
  •  चालक परवाना
  •  पॅन कार्ड
  • ULB  किंवा TVC कडून LOR द्वारे जारी केलेले वेंडिंग किंवा ओळखपत्राचे प्रमाणपत्र

हे देखील वाचा: आदिवासी कर्ज योजनेसाठी पात्रता आणि कोणकोणती कागदपत्रे लागणार

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसा करायचा (pm svanidhi loan apply online)

मित्रांनो, लहान मोठ्या वस्तूंची विक्री करणारे फेरीवाले(Street Vendor), विक्रेते शहरी जीवनातील लोकांच्या आयुष्यात  महत्त्वाची भूमिका बजावतात.  त्यांचा हा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात भांडवल असणे आवश्यक आहे.  नुकत्याच येऊन गेलेल्या कोविड-19 च्या साथीमुळे नुकसान झाले. ते बघता  गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने रस्त्यावर विक्रेत्यांना खेळते भांडवल कर्ज, व्याज अनुदान, प्रोत्साहन आणि अधिकच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य देण्यासाठी pm swanidhi yojana ची सुरुवात केली. 

Pradhan Mantri Svanidhi योजनेचे लाभार्थी म्हणजेच पत विक्रेते या कर्ज योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्या पूर्वी त्यांना काही पूर्व अर्ज चरणांचा विचार करावा लागेल ते खालील प्रमाणे.

  • PM Street vender कर्ज अर्जाची आवश्यकता समजून घ्यावी.
  • नोंदणीकृत मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असणे आवश्यक.
  •  योजनेच्या नियमानुसार पात्रता तपासणी.
  •  खाली दिलेल्या सूचनांचे पालन करून स्व निधी योजनेची ऑनलाईन नोंदणी करता येईल.

हे देखील वाचा: प्रधानमंत्री जनधन योजना बँक खाते कसे उघडायचे?

 प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम अर्जदाराने या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  •  अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल.
  •  होम पेजवर “ प्लॅनिंग टू अप्लाय फॉर लोन” हा पर्याय दिसेल.  त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर  कर्जासाठी अर्ज करण्याच्या योजनेतील तीन चरण काळजीपूर्वक वाचा. पुढे जा आणि View more  बटनावर क्लिक करा.
  •  पुढे उघडलेल्या पेजवर View/Download Form  हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. पीएम स्व निधी योजनेचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल
  •  हा फॉर्म तुम्ही डाऊनलोड करा. डाऊनलोड केल्यावर फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
  •  फॉर्म भरल्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे या अर्जासोबत जोडा.
  •  यानंतर तुम्ही तुमचा अर्ज खाली नमूद केलेल्या संस्थांमध्ये जाऊन सबमिट करू शकता.

हे देखील वाचा: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी पात्र कोण ठरणार?

कर्ज देणाऱ्या संस्थांची यादी कशी पहावी?

  • कर्ज देणाऱ्या संस्थांची यादी पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेलं काही स्टेप फॉलो कराव्या लागतील.
  •  सर्वात आधी तुम्हाला स्वनिधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
  •  होम पेजवर तुम्हाला खाली बॉटमला Planning to Apply for Loan? View More असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  •  पुढे तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यावर तुम्हाला Lenders List  हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  •  त्यानंतर तुम्हाला तुमचे, राज्य, जिल्हा निवडावा लागेल.
  • पुढे तुम्ही लेंडर श्रेणी, कर्ज देणाऱ्याचे नाव निवडा आणि search  बटन वर क्लिक करा.
  • तुमच्या राज्य आणि जिल्ह्याच्या सर्व लेंडर्स ची यादी तुमच्यासमोर स्क्रीनवर दिसेल.
  • ही यादी पाहिल्यानंतर तुम्हाला पाहिजे तेथे जाऊन तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकतात. 

PM Svanidhi Loan Apply Online, PM svanidhi portal, svanidhi yojana, pm svanidhi loan, PM swanidhi scheme, PM swanidhi mohua gov in, Pradhan mantri swanidhi yojana

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!