Pradhanmantri Jandhan Yojana In Marathi|प्रधानमंत्री जनधन योजना बँक खाते कसे उघडायचे?

Pradhan Mantri Jandhan Yojana: नमस्कार मित्रांनो आज हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या लेखामध्ये आपण एक महत्त्वपूर्ण योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री जनधन योजना बद्दल आपण जाणून घेणार आहोत. या लेखामध्ये आपण पाहूया की जनधन योजनेचे फायदे कोणते, जनधन योजनेचे उद्दिष्ट काय, पात्रता काय, या योजनेअंतर्गत मिळणारा जीवा जीवन विमा संरक्षण, योजनेचा फायदा घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, आणि जनधन खाते उघडण्यासाठी अर्ज पद्धती काय आहे, जनधन खात्याचा उपयोग कसा करता येईल अशा विविध प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी मिळतील.

Pradhan Mantri Jan Dhan Yojana In Marathi

प्रधानमंत्री जन धन योजना ही 15 ऑगस्ट 2014 ला आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्याद्वारे जाहीर करण्यात आली होती. आणि या योजनेची सुरूवात 28 ऑगस्ट 2014 रोजी करण्यात आलेली होती. या योजनेअंतर्गत देशातील गरीब दुबळ्या लोकांना बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडता येईल. मित्रांनो आपल्याला माहितीच आहे आपण कोणत्याही बँकेत खाते उघडले तर आपल्याला काहीतरी रक्कम डिपॉझिट म्हणून ठेवावी लागते. पण हे गरिबांना शक्य नाही. म्हणून pmjdy Jan Dhan Yojana अंतर्गत देशातील गरीब लोकांना बँकेत, पोस्ट ऑफिस मध्ये तसेच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शून्य पैसे शिल्लक वर बँकांमध्ये खाते उघडणे शक्य होईल.  या शून्य शिल्लक असलेल्या बँक खात्यांचा लाभ देशातील गरीब लोकांना दिला जाणार आहे. मागील सात वर्षात आपल्या देशात 42  कोटी 55 लाखांहून अधिक जनधन खाती उघडण्यात आलेली आहेत. या प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत  जीवन विमा संरक्षण देखील दिल्या जात आहे.  खूप महत्त्वपूर्ण आहे ही प्रधानमंत्री जनधन योजना.  चला तर मित्रांनो आता आपण प्रधानमंत्री जनधन योजनेचे उद्दिष्ट बघूया.

हे देखील वाचा: येथे क्लिक करून पहा प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल संपूर्ण माहिती

Join Whatsapp Channel

प्रधानमंत्री जनधन योजनेचे उद्दिष्टे कोणती?

  • या योजनेद्वारे देशातील प्रत्येक नागरिकाचे बँक खाते उघडण्याचे लक्ष प्रधानमंत्री यांनी निश्चित केलेले आहे.
  •  यामुळे देशातील सर्व नागरिक बँकेकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेऊ शकतील.
  •  प्रत्येक कुटुंबाकडे कमीत कमी एक बँक खाते असावे असा ह्या योजनेचा उद्दिष्ट आहे.
  •  या योजनेअंतर्गत देशातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब लोकांना जनधन योजनेचा लाभ मिळणार आहे.
  •  हे खाते उघडण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही.
  • यामुळे कोणत्याही अडचणी शिवाय तुम्ही खाते उघडू  शकाल.
  •  या योजनेअंतर्गत खाते उघडल्यामुळे गरीब लोकांना आर्थिक सेवा सहज मिळू शकतील.
  •  शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्याला स्टेट बँक खात्यामध्ये मिळू शकेल.

प्रधानमंत्री जनधन खात्याचे फायदे?

  •  एक लाख रुपयापर्यंतचे अपघात विमा संरक्षण
  •  संपूर्ण भारतात सुलभ मनी ट्रान्सफर
  •  जमा रकमेवर व्याज
  •  शुल्लक साठी कोणतीही अट नाही
  •  सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये
  •  पेन्शन, विमा उत्पादनांमध्ये  प्रवेश
  •  प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत लाभार्थ्याला त्याच्या मृत्यूनंतर सामान्य परिस्थितीच्या प्रतिकृती वर तीस हजार रुपयांचा जीवन संरक्षण देय असेल.
  • सहा महिने समाधानकारक काम केल्यानंतर ओव्हर ड्राफ्ट ची सुविधा उपलब्ध राहील
  • या योजनेअंतर्गत, रूपे कार्डधारक कोणत्याही बँकेच्या शाखेत असल्यास वैयक्तिक अपघात विमा अंतर्गत दावा देय राहील. बँक मित्र, एटीएम, पीओएस, इकॉम इत्यादी वर कमीत कमी एक यशस्वी आर्थिक किंवा गैर आर्थिक व्यवहार तुमच्या स्वतःच्या बँकेकडून किंवा इतर कोणत्याही बँकेकडून अपघाताच्या तारखेच्या 90 दिवसाच्या आत, अपघाताच्या तारखेसह, रुपये विमा कार्यक्रमांतर्गत आर्थिक वर्ष 2016-17 covered  मध्ये समाविष्ट होण्यासाठी पात्र असतील.

हे देखील वाचा: शेतकऱ्यांना मिळणार शेतात गाळ टाकण्यासाठी एकरी 15,000 रुपये अनुदान

पीएम  जनधन योजना जीवन विमा संरक्षण किती असणार?

Life Insurance Protection Under PMJDY

पीएम जनधन योजना अंतर्गत देशातील सर्व नागरिकांचे शून्य शिल्लक असलेले बँक खाते उघडण्यात येत आहे. त्यांना डेबिट कार्ड सुद्धा दिले जात आहे. याव्यतिरिक्त त्यांना इतर सुविधाही पुरवल्या जात आहेत.  या योजनेअंतर्गत, जर लाभार्थ्यांचा अपघात झाला, त्या परिस्थितीमध्ये एक लाख रुपयांचे जीवन विमा  कव्हर आणि लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास लाभार्थ्याच्या कुटुंबाला 30 हजार रुपये आर्थिक मदत दिली जात आहे.  या जीवन विमा कव्हर साठी लाभार्थ्याने 15 ऑगस्ट 2014 ते 26 जानेवारी 2015 दरम्यान प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत पहिल्यांदाच खाते उघडलेले असावे.  तर आणि तरच लाभार्थ्याला जीवन विमा संरक्षणाचा लाभ घेता येईल.

 या व्यतिरिक्त लाभार्थ्याच्या खात्यावर 10 हजार ची ऑर्डर ऑफ सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जनधन खाते धारकाचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे. तसेच जनधन योजनेअंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ थेट बँक खात्यात दिला जाईल.

हे देखील वाचा: ऑफलाइन/ऑनलाईन पद्धतीने लिंक करा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी

 प्रधानमंत्री जनधन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती?

  • आधार कार्ड
  •  पॅन कार्ड
  •  ओळखपत्र
  •  पासपोर्ट साईज फोटो
  •  मोबाईल नंबर

 प्रधानमंत्री जनधन योजना 2023 साठी अर्ज कसा करावा?

 प्रधानमंत्री जनधन योजना 2023 साठी अर्ज कसा करावा?

हे देखील वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत आता विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मिळणार 51,000 रुपयांची स्कॉलरशिप

How to Apply Pradhan Mantri Jan Dhan Yojana

  • भारत देशातील ज्या नागरिकांना प्रधानमंत्री जन धन योजनेचे खाते उघडायचे असेल त्यांना खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो करावा लागतो:
  • सर्वात आधी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक शाखेत जावं लागेल.
  •  बँकेत गेल्यानंतर तुम्हाला जनधन खाते उघडण्यासाठी चा अर्ज मिळेल.
  • या अर्जात  विचारलेली सर्व माहिती भरा आणि अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडा.
  •  आता हा अर्ज आणि कागदपत्र बँक अधिकाऱ्याकडे जमा करा.
  •  अशाप्रकारे तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत बँक खाते उघडू शकतात.

Pradhanmantri jandhan yojana, Pradhan mantri jan dhan yojana in marathi, जनधन योजना, Pmjdy, jan dhan yojana bank accounts, PM yojana, पंतप्रधान योजना

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!