Pradhan Mantri Janaushadhi Kendra: नमस्कार मित्रांनो, जसे की तू मला माहीतच आहे आपल्या देशामध्ये बरेच लोक असे आहेत की जे आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत. अशा सर्व नागरिकांना महाग दराची औषधी खरेदी करणे शक्य नसते. यासाठी हीच सरकारकडून आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या लोकांसाठी प्रधानमंत्री जन औषधि केंद्र खुले करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
प्रधानमंत्री जन औषधि केंद्र म्हणजेच जनरिक मेडिकल वर कमी किमतीच्या औषधी उपलब्ध होणार आहेत. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला Pradhan Mantri Janaushadhi Kendra ची संपूर्ण माहिती देणार आहोत. या लेखातून तुम्हाला पीएम जन औषधी केंद्राचा उद्देश, वैशिष्ट्ये, लाभ, पात्रता, लागणारी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इत्यादी संबंधित माहिती देणार आहोत. त्यासाठी पूर्ण लेख नक्की वाचा.
Pradhan Mantri Janaushadhi Kendra 2023
भारत सरकार द्वारा प्रधानमंत्री जन औषधि केंद्र योजना सुरू करण्यात आलेली आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांना या योजनेचा फायदा होईल. जन औषधी केंद्र च्या माध्यमातून नागरिकांसाठी जनरिक औषधी स्वस्त दरात उपलब्ध केली जाईल. आता तुम्हाला प्रश्न पडेल ही स्वस्त औषधी म्हणजे कॉलिटी कमी असेल, पण असं नाही या औषधी ब्रॅण्डेड औषधींसारख्याच प्रभावी असतील.
या योजनेची सुरुवात नोव्हेंबर 2008 मध्ये भारत सरकारच्या फार्मास्युटिकल विभागाकडून करण्यात आली होती.या योजनेअंतर्गत स्वस्त दरात औषधी उपलब्ध करण्यासाठी जन औषधी केंद्र म्हणजेच जनरिक मेडिकल खुले करण्यात आले होते. 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण देशभरात 9303 जनरिक मेडिकल उपलब्ध झालेले आहेत. प्रधानमंत्री भारतीय जन औषधि परियोजनेमध्ये 1800 औषधी आणि 285 सर्जिकल वस्तू उपलब्ध आहेत.
हे देखील वाचा: येथे क्लिक करून पहा काय आहे प्रधानमंत्री जन औषधि परियोजना?
प्रधानमंत्री जन औषधी केंद्राचा उद्देश:
प्रधानमंत्री जन औषधी केंद्र चा मुख्य उद्देश देशातील नागरिकांना स्वस्त दरात चांगल्या औषधी उपलब्ध करून देणे हा होय. या योजनेत अंतर्गत जनरिक औषधी कमी दरात उपलब्ध होतील. आता देशातील आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेले नागरिक ही औषधी खरेदी करू शकतील. ही योजना देशातील नागरिकांचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. लोकांचे जीवनमान उंचावेल. प्रधानमंत्री जन औषधि केंद्र बरेच लोकांना रोजगार देखील देईल.
मित्रांनो तुम्हाला एजन औषधी केंद्र सुरू करायचे असेल तर खालील माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. नक्की वाचा.
प्रधानमंत्री जन औषधि केंद्राचे मार्जिन किंवा प्रोत्साहन:
- प्रत्येक औषधीच्या MRP म्हणजेच किमतीवर केंद्राकडून 20% मार्जिन दिल्या जाईल.
- महिला उद्योजक, अपंग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागास भागात उघडलेल्या जन औषधी केंद्रांसाठी विशेष प्रोत्साहन दिले जाईल. उद्योजकांना सामान्य प्रोत्साहनाच्या व्यतिरिक्त दोन लाख रुपये दिले जातील. ज्यामध्ये एक लाख पन्नास हजार मेडिकल स्टोअरच्या फर्निचर साठी आणि 50 हजार कम्प्युटर, इंटरनेट, प्रिंटर, स्कॅनर इत्यादीसाठी दिले जातील.
- ही रक्कम एकरकमी अनुदान असेल, जे तुम्हाला सर्व बिले जमा केल्यानंतर मिळेल. ही रक्कम फक्त प्रत्यक्ष खर्च पुरती मर्यादित असेल.
- इतर उद्योजक, फार्मसी लिस्ट, एनजीओ द्वारा चालविल्या जाणाऱ्या जन औषधी केंद्राला पाच लाख पर्यंतचे अनुदान मिळेल. ज्याला PMBI कडून महिन्याच्या खरेदीच्या पंधरा टक्के दराने प्रोत्साहन दिले जाईल. किमान 15000 रुपये फक्त एका महिन्यात दिले जाईल. याची एकूण मर्यादा पाच लाख असेल. महिला उद्योजक, दिव्यांग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये उघडलेल्या प्रधानमंत्री जन औषधि केंद्रालाही प्रोत्साहन दिले जाईल.
हे देखील वाचा: प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा?
जन औषधी केंद्र उघडण्यासाठीची सक्तीची रचना:
- पट्टा करार किंवा जागा वाटप पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे 120 फुटाची स्वतःची किंवा भाड्याने घेतलेली जागा अर्जदाराला प्रधानमंत्री जन औषधी केंद्र चालवण्यासाठी जागेची व्यवस्था स्वतः करावी लागेल.
- जर अर्जदार महिला उद्योजक, दिव्यांग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि NITI आयोगाने अधिसूचित केलेल्या महत्त्वकांक्षी जिल्ह्यातील कोणत्याही उद्योजकाच्या श्रेणीतील असल्यास अशा अर्जदाराला प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- फार्मसीस्ट प्रमाणपत्र लागेल.
- ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे अशा सर्व जिल्ह्यांमध्ये दोन केंद्रांमध्ये 1 किलोमीटरचे अंतर असणे बंधनकारक आहे.
- ज्या जिल्ह्याची लोकसंख्या दहा लाखापेक्षा कमी आहे अशा परिस्थितीत दोन केंद्रांमध्ये दीड किलोमीटरच्या अंतर असणे बंधनकारक आहे.
Pradhan Mantri Janaushadhi Kendra साठी अर्ज करण्याची फी किती?
- या योजनेअंतर्गत अर्ज सोबत पाच हजार रुपये जमा करावी लागेल.
- महिला उद्योजक, दिव्यांग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि NITI आयोगाने अधिसूचित केलेल्या महत्त्वकांक्षी जिल्ह्यातील कोणत्याही उद्योजकाकडून कोणतेही आर्थिक शुल्क आकारला जाणार नाही.
हे देखील वाचा: Aam Aadmi Vima Yojana Benifits आम आदमी विमा योजनेचे फायदे कोणते?
पीएमबीआय(PMBI) चा रोल काय आहे आहे?
Pharmaceuticals & Medical Devices Bureau of India (PMBI) जनरिक औषधी केंद्र योजना व्यवस्थित रित्या चालू ठेवण्यासाठी आवश्यक ती मदत देईल. पी एम बी आय प्रधानमंत्री जन औषधी केंद्राला जनरिक औषधे, तसेच शस्त्रक्रिया वस्तूचा पुरवठा देखील करेल.
प्रधानमंत्री जन औषधि केंद्र सुरू करण्याबाबतच्या काही महत्त्वाच्या सूचना
- केंद्र सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला प्रधानमंत्री जन औषधि केंद्र सुरू करण्याच्या आधी एक एग्रीमेंट साइन करावे लागेल.
- हे जनरिक औषधी केंद्र सरकारी निर्देशन अनुसार चालवण्यात येतील.
- जनरिक औषधी केंद्र सुरू करण्यासाठी त्या केंद्राच्या नावाने लायसन्स मिळवणे आणि ते केंद्र चालवणे यासाठीच्या सर्व परवानगी घेण्याची जबाबदारी केंद्र ऑपरेटरची असणार आहे.
- सर्व सरकारी नियमांचे पालन करण्याची जबाबदारी केंद्र ऑपरेटरची असेल.
- जनरिक औषधी केंद्रातील सर्व बिले पीएमबीआय कडून सुरू केलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करूनच बनवले जातील.
- केंद्र ऑपरेटर फक्त पीएमबीआय च्याच औषधींची विक्री करेल. दुसरी कोणतीही औषधी विकण्याची परवानगी त्याला दिली जाणार नाही.
हे देखील वाचा: गाय गोठा व नवीन विहीर ग्रामपंचायत योजना ऑनलाइन तक्रार
जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
आता आपण जाणून घेऊया जनरिक औषधी केंद्र सुरू करण्यासाठी कोणकोणत्या आवश्यक कागदपत्रांची गरज भासते. ही कागदपत्रे वेगवेगळ्या गटानुसार वेगवेगळे असणार आहे. ती खालील प्रमाणे:
वैयक्तिक प्रोत्साहन:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- अंडरटेकिंग
- डिस्टन्स पॉलिसी डिक्लेरेशन
- बँक अकाउंट स्टेटमेंट( सहा महिने)
- जातीचा दाखला
- दिव्यांग असल्याचा दाखला( विकलांग असेल तर)
- फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन दाखला
- इन्कम टॅक्स रिटर्न( दोन वर्ष)
- जीएसटी डिक्लेरेशन
सामान्य प्रोत्साहन:
वैयक्तिक:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन दाखला
- ITR ( दोन वर्ष)
- जीएसटी डिक्लेरेशन
- डिस्टन्स पॉलिसी डिक्लेरेशन
- बँक अकाउंट स्टेटमेंट( सहा महिने)
संस्था/ NGO/धर्मादाय संस्था/हॉस्पिटल इ.
- दर्पण आयडी (फक्तएनजीओ) इतर असल्यास कृपया समर्थन कागदपत्रे प्रदान करा
- पॅन कार्ड
- रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
- फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन दाखला
- ITR ( दोन वर्ष)
- बँक अकाउंट स्टेटमेंट( सहा महिने)
- डिस्टन्स पॉलिसी डिक्लेरेशन
- जीएसटी डिक्लेरेशन
हे देखील वाचा: बँक खाते आधार कार्डशी लिंक कसे करायचे?
शासन/शासन नामांकित एजन्सी:
- विभागाचा तपशील: कोणसोबत जागा वाटप केली आहे, सहाय्यक कागदपत्रांसह/मंजुरी आदेश.
- पॅन कार्ड
- इतर कागदपत्रे
- डिस्टन्स पॉलिसी डिक्लेरेशन
- जीएसटी डिक्लेरेशन
- लास्ट सहा महिन्याचं बँक अकाउंट स्टेटमेंट डिटेल
- फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
- दोन वर्षाचा आयटीआर
प्रधानमंत्री जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे?
मित्रांनो तुम्हालाही जन औषधी केंद्र सुरू करायचं असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो कराव्या लागतील.
- सर्वात आधी तुम्हाला प्रधानमंत्री जन औषधी केंद्राच्या अधिकृत वेबसाईटवर व्हिजिट करावे लागेल. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करा.
- http://janaushadhi.gov.in/index.aspx
- आता तुमच्यासमोर मुख्य पृष्ठ उघडलेलं असेल.
- या मुखपृष्ठावर तुम्हाला “apply for PMBJK” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर “click here to apply online” या पर्यायावर क्लिक करा.
- पुढे एक नवीन पेज उघडेल. इथे तुम्हाला “register now” या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म खुला होईल. या फॉर्ममध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, स्टेट, युजर आयडी पासवर्ड इत्यादी माहिती भरा.
- पुढे “submit” या पर्यायावर क्लिक करा.
- या प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री जन औषधि केंद्र खोलण्यासाठी अर्ज करू शकतात.
प्रधानमंत्री जन औषधि केंद्र सुरू करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा?
प्रधानमंत्री जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.
- सर्वात आधी तुम्हाला पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल. आणि दिलेला एप्लीकेशन फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
- येथे क्लिक करून एप्लीकेशन फॉर्म डाउनलोड करा.
- यानंतर या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा.
- यानंतर विचारलेली सर्व कागदपत्रे या फॉर्मला जोडा.
- आता तुम्हाला हा फॉर्म संबंधित विभागाकडे जमा करावे लागेल.
- या प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री जन औषधि खोलण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
pradhan mantri janaushadhi kendra,PM jan aushadhi kendra, Pradhan mantri jan aushadhi kendra near me, Pradhan mantri bhartiya janaushadhi pariyojana, Jan aushadhi kendra list, Modi jan aushadhi kendra near me, Jan aushadhi store near me