Quality Medicines Available At Affordable Prices For All
Pradhan Mantri Bharatiya Janaushadhi Pariyojana: नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परीयोजना. आपल्या सर्वांना स्वस्त दरामध्ये गुणवत्तापूर्ण औषधी उपलब्ध व्हावी हा या योजनेचा उद्देश आहे.या योजनेची सुरुवात नोव्हेंबर 2008 मध्ये भारत सरकारच्या फार्मास्युटिकल विभागाकडून करण्यात आली होती.या योजनेअंतर्गत स्वस्त दरात औषधी उपलब्ध करण्यासाठी जन औषधी केंद्र म्हणजेच जनरिक मेडिकल खुले करण्यात आले होते. 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण देशभरात 9303 जनरिक मेडिकल उपलब्ध झालेले आहेत. प्रधानमंत्री भारतीय जन औषधि परियोजनेमध्ये 1800 औषधी आणि 285 सर्जिकल वस्तू उपलब्ध आहेत.
पीएमबीजेपी योजनेमध्ये उपलब्ध जनसंधींचा उपयोग करून सार्वजनिक आरोग्य वितरणाच्या लक्षात सर्वांचा सामावल्याचा एकमेव ध्येय असतो. ह्या योजनेद्वारे जनऔषधीचा दर कमी करण्यात येतो किंवा उत्कृष्ट गुणवत्ताच्या प्रतिसादांची खात्री देण्यात येते. जन औषधींचा उपयोग करून पेशंटला उत्तम औषध प्रदान केल्यावर उच्च खर्चाचा बोझ त्यांना नसतो आणि त्यांच्या कुटुंबासह सर्वात महत्त्वाचा लोकांना हे फायदेशीर असते.
हे देखील वाचा: इथे क्लिक करून प्रधानमंत्री जन औषधी केंद्र सुरू कसे करायचे ते पहा
प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजनेचे वैशिष्ट्ये:
- भारत सरकार द्वारा प्रधानमंत्री जन औषधी परियोजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- या योजनेची सुरुवात आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या नागरिकांसाठी करण्यात आली आहे.
- जन औषधी केंद्राच्या माध्यमातून लोकांना जनरिक औषधे स्वस्त दरात उपलब्ध होतील.
- उपलब्ध होतील.
- प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आउटलेट खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- देशातील 734 जिल्ह्यांमध्ये हे प्रधानमंत्री जन औषधि केंद्र फुले केले जाईल.
- या केंद्राद्वारे देशातील नागरिकांना कमी किमतीत गुणवत्ता पूर्ण औषधी उपलब्ध करून दिल्या जाईल.
- या व्यतिरिक्त केंद्रीय फार्मास्युटिकल क्षेत्रातील उपक्रम आणि खाजगी क्षेत्रातून औषधी खरेदी करण्यासोबत या योजनेची देखरेख देखील केली जाईल.
- या केंद्रांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या ब्रॅण्डेड औषधी 50% ते 90% कमी दरात नागरिकांना दिल्या जातील.
- या योजनेच्या माध्यमातून वर्ष 2022 23 मध्ये 814.21 करोड रुपयांची विक्री होईल.
- या योजनेच्या माध्यमातून नागरिकांची जवळजवळ 4800 करोड रुपयांची बचत होईल.
काय आहे हे जनरिक औषधी?
जनरिक औषधी ही तेवढीच इफेक्टिव्ह आणि ब्रँडेड आहे जशा इतर औषधी असतात. शिवाय इतर औषधी पेक्षा स्वस्त दरात मिळतात.
जनरिक औषधींची कॉलिटी, प्रभावीता कशी सुनिश्चित केली जाते?
जन औषधी केंद्रामध्ये मिळणाऱ्या जनरिक औषधीची क्वालिटी म्हणजेच गुणवत्ता आणि त्या औषधीचा प्रभाव CPSU तसेच खाजगी पुरवठादारांकडून खरेदी केलेल्या औषधांच्या प्रत्येक बॅचची NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमधून चाचणी करून आणि PMBI च्या वेअरहाऊसमधून जन औषधी केंद्रांना पुरवठा करण्यापूर्वी आवश्यक गोष्टींची खात्री करून घेतली जाते.
हे देखील वाचा: ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना योजनेअंतर्गत मिळणार 3 हजार रुपये
Jan Aushadhi Sugam Mobile Application
“Jan Aushadhi Sugam” हे मोबाईल एप्लीकेशन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. हे ॲप्लिकेशन मोबाईल मध्ये त्वरित इंस्टॉल करून घ्या. या एप्लीकेशन चा वापर करून तुम्ही स्वस्त दरात औषधी खरेदी करू शकतात. आणि पैशाची बचत करू शकतात. तुम्हाला सर्व औषधी स्वस्त दरात मिळतील आणि या औषधी क्वालिटी आणि ब्रँडेड असतील.
तर मित्रांनो तुम्हीही या जन औषधी केंद्राकडून मिळणाऱ्या स्वस्त दरातल्या जनरिक औषधींचा लाभ घेऊ शकतात. जर तुमच्या आजूबाजूला असे गरीब लोक आहेत जे महागड्या औषधीचा खर्च उचलू शकत नाही अशा लोकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. जेणेकरून त्यांनाही या सरकारी योजनेचा फायदा होऊ शकतो. महागड्या औषधी एवजी त्यांना स्वस्त दरात चांगल्या क्वालिटीच्या औषधी मिळू शकता. आणि आपल्या भारत देशातील नागरिकांचा स्वास्थ्य क्षेत्रात जीवनमान उंचावेल. लेख आवडल्यास नक्की शेअर करा, धन्यवाद!
Pradhan mantri bhartiya janaushadhi pariyojana, pradhan mantri bharatiya janaushadhi pariyojana, bharatiya janaushadhi pariyojana, jan aushadhi sugam, jan aushadhi sugam app