PMFME Scheme Subsidy|प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

Pradhan Mantri Micro Food Industry Yojana: Subsidy up to 3 crores: PMFME Scheme Subsidy

Golden Opportunity for Food Processing Entrepreneurs

PMFME Scheme Subsidy: केंद्र शासन पुरस्कृत  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग अनुदान योजना 2020-21 पासून ते 2024-25 पर्यंत  राबविण्यात येत आहे.  या योजनेअंतर्गत वैयक्तिक मालकी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, अशासकीय संस्था, त्याचबरोबर सहकारी संस्था आणि खाजगी कंपन्या या शासकीय व खाजगी वैयक्तिक तसेच संस्थांना एकूण प्रकल्प किमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त दहा लाखांपर्यंत अनुदान लाभ देय राहणार आहे.

तसेच सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना सामायिक  पायाभूत सुविधा करता गट लाभार्थी, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट आणि त्यांचे फेडरेशन शासकीय संस्थांना एकूण प्रकल्प किमतीच्या 35 टक्के, जास्तीत जास्त 3 करोड पर्यंत अनुदान लाभ मिळणार आहे.  मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग साठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 50% आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना प्रकल्प किमतीच्या 35 टक्के जास्तीत जास्त तीन कोटी रुपये आहेत.

Join Whatsapp Channel

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान किती?

PMFME Scheme Subsidy

1) सूक्ष्म प्रक्रिया उद्योगासाठी मिळणारे अनुदान:

 सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी उद्योग  खर्चाच्या पस्तीस टक्के किंवा जास्तीत जास्त रुपये दहा लाख इतके अनुदान दिले जाईल. प्रकल्प उभारणीसाठी बँकेकडून कर्ज घेणे आवश्यक राहील. कर्ज घेतल्यानंतर कर्जाशिवाय प्रकल्पांमध्ये लाभार्थ्याचा स्वतःचा हिस्सा देखील प्रकल्पाच्या किमान 10 टक्के रकमेचा असणे आवश्यक आहे.

 स्वयंसहायता गटाच्या सदस्यांनाही याच प्रमाणे 25% किंवा जास्तीत जास्त दहा लाख रुपये पर्यंतचे अनुदान मिळेल. त्याचबरोबर सदस्य हे अन्नप्रक्रिया उद्योग मध्ये गुंतलेले आहेतअशाच सदस्यांना बीज भांडवल म्हणून प्रत्येक सदस्याला रुपये 40 हजार हे खेळते भांडवल तसेच आवश्यक छोटी उपकरणे खरेदी करण्यासाठी असेल. अशा प्रकारे एका गटाला जास्तीत जास्त 4 लाख रुपये वीज भांडवल दिले जाईल.

 स्वयंसहायता गटातील सर्व सदस्य हे अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित नसल्यामुळे त्यांचे बीज भांडवल हे स्वयंसहायता गटाच्या फेडरेशनला देण्यात येईल.

हे देखील वाचा: Gai Gotha Anudan Yojana: गाय गोठा अनुदान योजना अंतर्गत मिळणारे अनुदान:

 2) सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सामायिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मिळणारे अनुदान:

PMFME  या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान हे शेतकरी उत्पादक संघ स्वयंसहायता गट किंवा उत्पादक सहकारी संस्था किंवा खाजगी उद्योग किंवा कोणत्याही शासकीय यंत्रणा यांना देण्यात येते. यासाठी 35 टक्के अनुदान मिळणार. दहा लाख रुपयांपेक्षा जास्त  अनुदानाचे प्रस्ताव केंद्र शासनाच्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडे पाठविले जातात.

 सामायिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दिला जाणाऱ्या अनुदानामध्ये शेतामध्ये असे प्रतवारी संकलन, सामाजिक प्रक्रिया सुविधा, गोदाम, शीतगृह या सामायिक पायाभूत सुविधा उभारता येतील यासाठी अनुदान देय राहणार आहे.

 शेतकरी उत्पादक संघ किंवा स्वयंसहायता गट किंवा उत्पादकांच्या सहकारी संस्था यांना प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पा नुसार प्रकरणी 50 हजार रुपये एवढे अर्थसहाय्य म्हणून देण्यात येईल.

 3) विपणन व ब्रँडिंग साठी मिळणारे अनुदान:

शेतकरी उत्पादक संघ, स्वयंसहायता गट किंवा सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग एस पी व्ही, उत्पादकांच्या सहकारी संस्था यांना उत्पादकांचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी म्हणजेच मार्केटिंग करण्यासाठी लागणारा एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान देय राहील. सदरचे उत्पादन हे एक जिल्हा एक उत्पादनाशी संबंधित असावे., अंतिम उत्पादन हे ग्राहकांना किरकोळ विक्री पैकी मध्ये विकणे आवश्यक आहे. सदरच्या उत्पादनाचा टर्न ओव्हर हा किमान पाच कोटी तरी असणे आवश्यक आहे. 

हे देखील वाचा: येथे क्लिक करून बघा  प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाते कसे उघडायचे?

कोण कोणते अन्न प्रक्रिया उद्योग:

  • दूध प्रक्रिया:  खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही,  तूप, लस्सी.
  •  पालेभाज्या व फळे प्रक्रिया: आंबा, सीताफळ, पेरू, आवळा, सफरचंद, मोसंबी, लिंबू, चिंच, बोर, जांभूळ इत्यादी पासूनचा प्रक्रिया उद्योग जसे की जाम, जेली, आईस्क्रीम, रबडी, काजू, बदाम, पिस्ता, बेदाणा, ड्रायफ्रूट  इत्यादी पासून रेडी टू इट प्रक्रिया अंतर्गत येणारे सर्व खाद्यपदार्थ पॅकिंग ब्रॅण्डिंग सह सर्व प्रकारची फळे तसेच सर्व प्रकारच्या पालेभाजक प्रक्रिया उद्योगात येतात.
  •  मसाले प्रक्रिया: चटणी, मसाला, कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, मटन चिकन मसाला, गोडा मसाला, शेंगदाणे चटणी, खोबरे चटणी, कारल्याची चटणी, जवसाची चटणी.
  •  तेल घाना प्रक्रिया: शेंगदाणा, सोयाबीन, तीळ,  सूर्यफूल, बादाम आणि सर्व प्रकारची तेल उत्पादने
  •  पशुखाद्य निर्मिती प्रक्रिया: मक्का  चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य इत्यादी.
  •  पावडर उत्पादन प्रक्रिया: काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स, ज्वारी, गहू, धना, जिरे, मिरची, गुड, हळद.
  •  कडधान्य प्रक्रिया: हरभरा व इतर डाळी पॉलिश करणे, बेसन तयार करणे.
  •  राईस मिल: चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इत्यादी.
  •  बेकरी उत्पादन प्रक्रिया: बिस्किट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट, नानकटाई, क्रीम रोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, पोस्ट, ब्रेड, बन पाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चिरमुरे इत्यादी.
  • सागरी उत्पादने: सुकवलेले मासे, डबाबंद मासे, खारवलेले मासे, गोठवलेले मासे, चिप्स, वेफर्स, पापड, फिश पॉपकॉर्न, नगेट्स टिक्की इत्यादी.
  •  नाचणी: पीठ, पापड, बिस्किट,  नाचणी सत्व, चकली, इडली, शंकरपाळे, भगर पीठ इत्यादी.
  •  चिकू: स्नॅक, पल्प, जाम, जेली, स्लाईसेस, आईस्क्रीम, कँडी, पावडर, ज्यूस, चॉकलेट,चॉकलेट बार, फ्रुटबार,वडी,ड्रायफ्रूट बर्फी, इत्यादी.
  •  आंबा: पल्प,  जाम, जेली, मुरब्बा, स्नेक, ट्रॅक्टर, कॉकटेल, स्लाईसेस, आईस्क्रीम, ड्राईड स्लाईसेस, डबाबंद ज्यूस, गोठवलेले, लोणचे,  चटणी, फ्रुट बार,  सॉस, कुंदा, सॉफ्ट कँडी, अल्कोहोल विरहित पेय इत्यादी
  • केळी: चिप्स, प्युरी, पल, वाईन, पावडर, वेफर्स, फ्रोजन स्लाईसेस, जाम, फ्रुटी, सुकेली ट्रॉफी, ड्रायफूट, पिल कँडी इत्यादी.
  •  टोमॅटो: केचप, जाम, प्युरी, कॅन टोमॅटो, सॉस, पेस्ट, टोमॅटो चटणी, सूप, ज्यूस, लोणचे इत्यादी

PMFME Scheme 35% Subsidy

Pradhan Mantri Micro Food Industry Yojana: Subsidy up to 3 crores, PMFME Scheme Subsidy

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!