PMFME Scheme In Marathi|शेतकऱ्यांना  उद्योगासाठी मिळणार दहा लाखांपर्यंत अनुदान|केंद्र सरकारची नवीन योजना सुरू, असा भरा ऑनलाइन फॉर्म

PMFME Scheme In Marathi: नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणे हा लेख ही तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. अशाच महत्वपूर्ण योजनांपैकी आहे ही PMFME Scheme.  या योजनेअंतर्गतशेतकऱ्यांना उद्योग करण्यासाठी दहा लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाते. मित्रांनो शेतीसोबतच जोडधंदा असणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून  निघणारे उत्पन्न जर कमी झालं तर  जोडधंद्याच्या मदतीने शेतकऱ्यांचा दैनंदिन जीवनाचा खर्च निघतो.

 आता शेतीसोबतच शेतकऱ्यांना जोडधंदा करता यावा यासाठी केंद्र सरकारकडून  पंतप्रधान  सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना देशभरात सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 10 लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाईल.  आता व्यावसायिक वर्ग यांच्यामार्फत अन्न पिकावर प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास प्रकल्पाचा 35% आणि जास्तीत जास्त 10 लाख रुपये पर्यंत अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे.

Join Whatsapp Channel

PMFME Scheme In Marathi

 केंद्र शासनाकडून ही योजना शेतकऱ्यांना उद्योजक बनविण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारकडून विविध स्वरूपातील उद्योगांसाठी खूप योजना राबविल्या जात आहेत. त्यातीलच महत्त्वाची आहे ही पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना.

हे देखील वाचा: येथे क्लिक करून जाणून घ्या प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान किती?

पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कोण अर्ज करू शकतो?

 या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी जे शेतकरी उद्योजक होण्यास इच्छुक आहेत असे शेतकरी पात्र असतील. यासोबत वैयक्तिक लाभार्थी, भागीदारी संस्था,बेरोजगार युवक,  गट लाभार्थी इत्यादी सुद्धा या योजनेत अर्ज करू शकतात. आता आपण बघूया कोणत्या उद्योगासाठी तुम्हाला अर्ज करता येईल. योजनेच्या सुरुवातीला जिल्ह्याची निवड ठराविक उद्योगासाठी करण्यात येत होती. पण आता शासनाने ही अट रद्द करून शेतकऱ्यांना कोणत्याही पिकावर किंवा फळावर आधारित उद्योग सुरू करता येईल असे जाहीर केलेले आहे. यात  कोणत्या फळांचा किंवा पिकांचा समावेश असेल ते आता आपण पाहूया.

  •  डाळिंब
  •  ऊस
  •  धान्य
  •  दूध व दुग्धजन्य पदार्थ
  •  भाजीपाला
  • कुक्कुटपालन
  •  मध
  •  मस्य पालन 

PMFME  योजनेच्या अटी व शर्ती कोणत्या?

  •  अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.
  • अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार असणे गरजेचे आहे.
  •  एकाच कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल.
  •  उद्योगांमध्ये दहापेक्षा कमी कामगार कार्यरत असावेत.
  •  पात्र प्रकल्प किमतीच्या 10 टक्के लाभार्थी  हिस्सा देण्याची व उर्वरित बँक मुदत कर्ज घेण्याची तयारी अर्जदाराची असावी लागेल.
  • या योजनेसाठी कोणतीही शैक्षणिक पात्रतेची अट नाही.

हे देखील वाचा: आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना मिळू शकते पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज!

पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना योजनेचे उद्दिष्टे:

  • सूक्ष्म उद्योगाची क्षमता वाढविणे
  •  मायक्रो फूड प्रोसेसिंग, उद्योग बचत गट आणि सहकारी संस्थांकडून पतपुरवठा करण्याची क्षमता वाढविण्यास सक्षम करणे.
  •  दोन लाख उपक्रमांचे औपचारिक फ्रेमवर्क हस्तांतरण समर्थन देणे.
  •  प्रक्रिया सुविधा प्रयोगशाळेसारख्या समभागांचे जतन करणे.
  •  व्यावसायिक तांत्रिक सामर्थनासाठी इंटरप्राईज मध्ये प्रवेश वाढवणे
  • अन्न प्रक्रिया क्षेत्रात संस्थांचे संशोधन प्रशिक्षण मजबूत करणे. 

PMFME योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा?

PMFME योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा?

 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अर्जदारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. यासाठी केंद्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत.

हे क्लिक करून बघा प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान(PMFME Scheme Subsidy) किती?

How to apply online PMFME  scheme?

Official Website: pmfme.mofpi.gov.in/pmfme/

सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेसाठी offline  अर्ज कुठे करावा?

 या योजनेसाठी अर्जदाराने बँकेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा.

हे देखील वाचा: येथे क्लिक करून PMFME शासन निर्णय PDF डाउनलोड करा

PMFME  योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

 या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज व प्रकल्प अहवाल एवढीच कागदपत्रे आवश्यक असतील.

PMFME Scheme योजनेचा कालावधी किती आहे?

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा कालावधी असणार आहे  2020-21 ते 2024-25.  इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ  घ्यावा. या योजनेसाठी पाच वर्षात दहा हजार कोटींची तरतूद आहे. 

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!