PM Kusum Solar Pump Yojana|PM कुसुम सोलर पंप अनुदान योजना महाराष्ट्र जीआर

PM Kusum Solar Pump Yojana:  नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री कुसुम योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लेख पूर्ण वाचा. येथे आपण कुसुम  सोलर पंप योजनेबद्दल अधिक माहिती घेणार आहोत जसे की काय आहे कुसुम सोलर योजना, लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्रे,  या योजनेचे लाभ कोणते,? अर्ज भरण्याची फी किती असणार, याकुसुम सोलार पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा, हेल्पलाईन नंबर इत्यादी सर्व गोष्टींची आपण माहिती बघूया. तर मित्रांनो आपण या योजनेचे उद्दिष्ट बघूया.

Join Whatsapp Channel

 कुसुम सोलार पंप योजना महाराष्ट्र चे उद्दिष्ट:

 कुसुम सोलार पंप योजना वित्तमंत्री श्री अरुण जेटली यांच्याद्वारे सुरू केली गेलेली  केंद्र सरकारची योजना आहे. या योजने मागचे मुख्य उद्दिष्ट एवढेच आहे की कमीत कमी पैशात सौर कृषी पंप उपलब्ध करून शेतकऱ्यांना देणे आहे. या योजनेचा दुसरा लाभ असा होऊ शकतो की सौरपॅनल मधून तयार होणारी वीज लाभार्थी शेतकरी विकू शकतो आणि वीज विक्रीनंतर मिळवलेल्या पैशातून शेतकरी नवीन व्यवसाय सुरू करू शकतो.

PM Kusum Solar Pump Yojana

या योजनेत एकूण खर्च तीन विभागांमध्ये विभाग गेलेला आहे ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे ते खालील प्रमाणे:

  •  सरकार शेतकऱ्यांना 60 टक्के अनुदान देईल.
  •  30 टक्के खर्च सरकार कर्ज स्वरूपात देईल.
  •  शेतकऱ्यांना प्रकल्पाचे एकूण खर्चाच्या केवळ दहा टक्के रक्कम द्यावी लागेल.

 चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या कुसुम सोलार पंप योजना महाराष्ट्र 2023 साठी लाभार्थी निवडीची पात्रता  व अटी काय आहे.

हे देखील वाचा: महाराष्ट्र राज्य शेततळे अनुदान योजना:मागेल त्याला शेततळे योजना 2023 संपूर्ण माहिती

 कुसुम सोलार पंप योजना साठी लाभार्थी निवडीची पात्रता व अटी कोणत्या?

  •  अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार.
  •  बोरवेल, विहीर,  बारा महिने  वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी  अर्जासाठी पात्र असतील.
  •  ज्या शेतकऱ्यांना पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील.
  • 2.5  एकर शेत जमीन असणारे शेतकरी 3 HP DC, 5  एकर शेतजमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 HP DC, 5 एकर पेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 HP DC  तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यासाठी अनुदान मिळेल.

 कुसुम सोलार पंप योजना महाराष्ट्र चे वैशिष्ट्ये काय?

  •  शेतकऱ्यांना स्वखर्चाने इतर उपकरणे या कृषी पंपाला लावता येतील.
  •  सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचे कृषी पंप किमतीच्या दहा टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना पाच टक्के लाभार्थी सभूषित केलेला आहे.
  • पारेषण विरहित 3814  कृषी पंपाची महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात स्थापना करण्यात आलेली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे.
  •  शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार 3 एचपी, 5 एचपी, 7.5  एचपी व त्यापेक्षा जास्त  एचपी डीसी सौर पंप अर्ज केल्यानंतर उपलब्ध होणार आहे.

हे देखील वाचा: मित्रांनो असा घ्या आदिवासी कर्ज(Loan) योजनेचा फायदा

 PM Kusum Solar Pump Yojana महाराष्ट्र लाभ कोणते?

  •  शेतकऱ्यांना  पंतप्रधान कुसुम योजनेचे लाभ खालील प्रमाणे असणार आहेत:
  •  शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा मिळेल.
  •  शेतकऱ्यांच्या शेती ऊर्जा अनुदानाचा भार कमी होईल.
  •  भूजल अतिरेक तपासणीची क्षमता वाढेल.
  •  शेतकऱ्यांना जोखीम मुक्त उत्पन्न प्राप्त  होईल.
  •  शेतीत कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास मदत होईल.

 PM Kusum Solar Pump Yojana साठी आवश्यक पात्रता काय?

  •  अर्जदार हा  भारतीय शेतकरी असावा.
  •  सदर योजनेअंतर्गत स्वयं गुंतवणुकीद्वारे  प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही.
  •  प्रतिम मेगा व्हॅट अंदाजे दोन हेक्टर जमीन आवश्यक आहे.
  •  अर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या  क्षमतेच्या( कमी असेल तर) प्रमाणात दोन मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करू शकतो.
  •  सदर योजनेअंतर्गत शेतकरी 0.5 मेगावॅट ते 2 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी अर्ज करू शकतात.

हे देखील वाचा: रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी अशा पद्धतीने करू शकता

 कुसुम सोलार पंप अनुदान योजनेची लाभार्थी:

  •  शेतकरी
  •  सहकारी संस्था
  •  शेतकऱ्यांचा गट
  •  जल ग्राहक संघटना
  •  शेतकरी उत्पादक संस्था

 चला तर मित्रांनो आता आपण पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

हे देखील वाचा: अशी करा गाय गोठा व नवीन विहीर ग्रामपंचायत योजना ऑनलाइन तक्रार

  कुसुम सोलार पंप अनुदान योजना महाराष्ट्र साठी महत्त्वाची कागदपत्रे:

  •  आधार कार्ड
  •  पासपोर्ट साईज फोटो
  •  रेशन कार्ड
  •  प्राधिकरण पत्र
  •  नोंदणी प्रत
  •  जमिनीची कागदपत्रे
  •  मोबाईल नंबर
  •  बँक खाते क्रमांक
  •  चार्टर्ड अकाउंटद्वारे जारी केलेला नेटवर्क प्रमाणपत्र (विकासकाद्वारे प्रकल्प विकसित करण्याच्या बाबतीत)

हे देखील वाचा: Namo Kisan Yojana: नमो किसान योजना आता मिळणार सहा हजार रुपये|अर्ज करण्यासाठी लागणार आहे ही कागदपत्रे

PM Kusum Solar Pump Yojana अर्ज फी:

 या योजनेअंतर्गत अर्जदारास सौर ऊर्जा केंद्रासाठी अर्ज करण्यासाठी प्रति  मेगा 5 हजार रुपये आणि  जीएसटीचा अर्ज भरावा लागेल.  राजस्थान नूतनीकरण योग्य ऊर्जा मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट च्या रूपात ही देय रक्कम दिली जाईल. 0.5   मेगावॅट  ते 2  मेगावॅट पर्यंतच्या अर्जाची द्यायची  फी खालील प्रमाणे असणार आहे.

  • 0.5 मेगावॅट साठी 2500 रुपये +  जीएसटी
  • 1 मेगावॅट साठी 5000 रुपये +  जीएसटी
  • 1.5 मेगावॅट साठी 7500 रुपये +  जीएसटी
  • 2 मेगावॅट साठी 10000 रुपये +  जीएसटी

पी एम कुसुम सोलार पंप योजनेसाठी काही महत्त्वाची संकेतस्थळे:

  •  ऑफिशियल वेबसाईट: mnre.gov.in
  • Online Apply PM कुसुम योजना  2022 वेबसाईट: mahaurja.com/meda/en/node
  • अर्ज नोंदणी(Online Apply) पीएम कुसुम योजना 2022 लिंक: https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

हे देखील वाचा: येथे क्लिक करून कुसुम सोलार पंप योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा.

महत्त्वाचे:  पीएम कुसुम सोलर योजनेच्या नावाने फसव्या वेबसाईट पासून राहा सावध!

 मित्रांनो आपल्या भारतीय मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे की पीएम किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महा अभियान (प्रधानमंत्री  कुसुम योजना)  यांच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून सौर पंप अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासह नोंदणी आणि पंपाची किंमत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जात असल्याचे मंत्रालयाच्या निर्दशनास आले आहे.  तरी मित्रांनो तुम्ही अशा वेबसाईट पासून सावध रहा.

 त्यापैकी काही बनावट वेबसाईट .org, .in, .com  अशा डोमेन नावामध्ये नोंदणीकृत आहेत जसे की www.kusumyojanaonline.in.net, www.pmkisankusumyojana.co.in, www.onlinekusamyojana.org.in, www.pmkisankusumyojana .com आणि इतर अशा अनेक वेबसाइट.

म्हणूनच पीएम कुसुम योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना फसव्या वेबसाईटवर कोणतीही देय रक्कम देऊ नये असा सल्ला देण्यात आलेला आहे.  राज्य सरकारच्या विभागांमार्फत प्रधानमंत्री कृषी योजना राबवल्या जात आहे.

ऑनलाइन सोलर पंप रजिस्ट्रेशन maharashtra,www mahaurja com kusum registration, kusum yojana subsidy, kusum solar pump yojana 2023, kusum mahaurja solar pump registration, mahadiscom solar kusum, mahaurja kusum registration, mahaurja solar pump apply online

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!