PM Avas Yojna Gramin|प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना|घरकुल योजना संपूर्ण माहिती

PM Avas Yojna Gramin: नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे आपल्या भारत देशात बरेच असे लोक आहेत जे आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत. ज्यांच्याकडे राहण्यासाठी चांगले घर नाही, काही तर झोपडी मध्ये सुद्धा राहतात. अशा सर्व नागरिकांसाठी आपल्या भारत देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारा पक्के घरे बनवून देणारी योजना अमलात आणण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी फायदेशीर  ठरत आहे. चला तर मित्रांनो पाहूया काय आहे  ही PM Avas Yojna Gramin,  लाभ कसा घेऊ शकतात, ग्रामीण आवास योजना आवश्यक कागदपत्रे कोणती, pradhan mantri gramin avas yojana अर्ज करण्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत कशी, कोणी या योजनेसाठी पात्र ठरू शकत. 

PM Avas Yojna Gramin

PM Avas Yojna Gramin

या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या लोकांसाठी पक्की घरे बनवून देण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना सरकारकडून घर बनवण्यासाठी दोन प्रकारच्या क्षेत्रानुसार अनुदान देणार आहे. मैदानी क्षेत्रात घर बनविण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये अनुदान या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला प्राप्त होईल. आणि पहाडी म्हणजेच पठारी भागात घर बनवण्यासाठी लाभार्थ्याला एक लाख तीस हजार रुपये एवढी आर्थिक मदत अनुदान स्वरूपात प्राप्त होईल. चला तर मित्रांनो आता आपण पाहूया या घरकुल  योजनेचे मुख्य उद्देश काय आहे.

Join Whatsapp Channel

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचे मुख्य उद्दिष्टे काय आहेत?

Pmayg  च्या अंतर्गत सर्व बेघर परिवारांना तसेच कच्चे घरे असलेल्या परिवारांना पक्के घरे बनवून देण्याचं लक्ष ठेवलेला आहे.’ सर्वांसाठी घर’ या उद्देशाने 2021-24 पर्यंत 2.95 करोड घरांची निर्मिती करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. याआधी या योजनेतून 2016-17 ते 2018-19 पर्यंत तीन वर्षात 1 करोड परिवारांना या योजनेचा लाभ झाला होता. Pmaygयोजनेचे मुख्य उद्दिष्ट भारतातील ग्रामीण भागात कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना मूलभूत सुविधांसह पक्की घरे बनवून देणे हा आहे. घरासोबतच त्यांना शौचालय, विज, पाणी अशा मूलभूत गरजा सुद्धा  प्रदान केल्या जाणार आहेत. या योजनेमुळे आपल्या भारत देशातील गोरगरीब लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल हाही या योजनेचा उद्दिष्ट आहे.

Pmayg nic in gramin घरकुल योजना माहिती

  • भारत देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचं घर बनवून देणे यावर सरकारचा भर आहे.
  •  घरे दोन टप्प्यांमध्ये बांधली जातील- पहिल्या टप्प्यात 2016 ते 19 पर्यंत एक करोड घरे बांधण्याचे उद्दिष्ट होते. आणि दुसऱ्या टप्प्यात 2019 ते 24 पर्यंत 1.95  करोड घरे बांधण्याचे  उद्दिष्ट आहे.
  •  सपाट जमीन असलेल्या भागात लाभार्थ्याला 1.20 लाख रुपये मिळतील तर पहाडी म्हणजेच डोंगराळ भागातील लाभार्थ्याला घरे बांधण्यासाठी 1.30 लाख रुपये अनुदान प्राप्त होईल.
  •  25 चौरस मीटर पर्यंतची घरे या योजनेत समाविष्ट आहेत, याआधी इंदिरा आवास योजनेत ही मर्यादा वीस चौरस मीटर पर्यंतची होती. जी 5 चौरस मीटरने वाढलेली आहे.
  •  बांधकामाचा कालावधी 114 दिवसांचा आहे, यापूर्वी तो 314 दिवसांचा होता.
  •  या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
  •  या योजनेसाठी दोन निधी पुरविला जातो तो sqकेंद्र आणि राज्य सरकार या दोन्हीकडून मिळतो. यामध्ये ६० टक्के राज्य आणि 40 टक्के केंद्र सरकार देते. राज्यांमध्ये हे प्रमाण 10:90 असे आहे.
  • भू- टेकिंग द्वारे या योजनेचा आढावा घेतला जातो, याचा फायदा असा की भ्रष्टाचाराची क्षमता कमी होते.
  •  अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी पात्र कोण ठरणार?

  • ग्रामीण भागातील असे परिवार ज्यांच्याकडे घर नाही.
  •   आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंब
  •  अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती(SC & ST)
  •  बंधमुक्त कामगार
  • महिला( कोणत्याही जातीतील)
  •  कमी आवक वाले व्यक्ती
  • शहीद संरक्षण कर्मचारी/ निमलष्करी दलाच्या सैनिकांच्या विधवा आणि अश्रित

हे देखील वाचा: येथे क्लिक करून तुम्ही प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 2023 लाभार्थ्यांची यादी तपासू शकतात

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणती?

  • आधार कार्ड
  •  ओळखपत्र
  •  उत्पन्नाचा दाखला
  •  जमिनीची कागदपत्र
  •  बँक खाते पासबुक(बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे)
  •  एक अफिडेविट ज्यामध्ये लिहिलेले असावे की  अर्जदाराकडे कोणतेही पक्के घर नाही.
  •  हाऊसिंग सोसायटीकडून मिळालेली NOC
  • पासपोर्ट साईज फोटो

हे देखील वाचा: ऑफलाइन/ऑनलाईन पद्धतीने लिंक करा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी

Pradhanmantri Gramin Avas Yojana पात्रता 

  •  अर्जदाराजवळ आधीचे कोणतेही पक्के घर नसावे.
  •  परिवाराची वार्षिक कमाई 180000 किंवा त्याच्यापेक्षा कमी असायला हवी.
  • अर्जदारांनी याआधी कोणत्याही आवाज योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  •  सीनियर सिटीजन, दिव्यांग लोकांना ग्राउंड फ्लोअर ला म्हणजेच पहिल्या मजल्यावर प्राधान्य दिले जाईल.
  •  पहिली इन्स्टॉलमेंट च्या 36 महिन्याच्या आत घराची निर्मिती पूर्ण झालेली पाहिजे.
  •  अर्जदार कोणत्याही प्रकारचं आधीचा कर भरत नसावा.
  •  सरकारी नोकरी नसावी आणि असेल तर त्याची महिन्याची कमाई दहा हजार किंवा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे.
  •  या योजनेचा लाभ SC,ST तसेच मायनॉरिटी गटातील लोक घेऊ शकतात. 

जर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

हे देखील वाचा: येथे क्लिक करून तुम्ही प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात

Pmayg nic in मोबाईल ॲप्लिकेशन कसे डाउनलोड करायचे?

  • Pmayg mobile application  डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
  •  वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर मुख्य पृष्ठ खुले झालेले असेल.
  •  या पेजवर  तुमच्या उजव्या साईडला वर “Google Play” हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  •  क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर तुम्ही “Awas App”  इन्स्टॉल करू शकतात.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी हेल्पलाइन नंबर

Pmayg Helpline Number: 1800116446

Email Support: pmayg@gov.in

pradhan mantri gramin avas yojana, ग्रामीण आवास योजना, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, pmayg nic in gramin, प्रधानमंत्री आवास योजना, आवास योजना, प्रधानमंत्री घरकुल यादी

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!