पीक कर्ज योजना(Crop Loan): डॉ. पंजाबराव देशमुख पिक कर्ज सवलत अनुदान योजना

Pik karj savalat yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण डॉ. पंजाबराव देशमुख पिक  कर्ज सवलत  अनुदान योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्जावर व्याज अनुदान मिळत आहे.  जर तुम्हालाही अशा पीक कर्जाची आवश्यकता असेल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वाचा ठरेल.  तर चला आपण जाणून घेऊया या योजनेची सखोल माहिती.

Join Whatsapp Channel

 डॉ. पंजाबराव देशमुख Pik karj savalat yojana व्याज अनुदान:

सन  2090 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने डॉ.  यांच्या नावाने एक नवीन योजना सुरू केली होती. ही योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत जे शेतकरी शेतीतील पिकावर कर्ज घेत आहेत त्यांना व्याज अनुदान मिळवून फायदा होईल.

डॉ. पंजाबराव देशमुख Pik karj savalat yojana व्याज अनुदान

पीक कर्ज सवलत योजना यापूर्वीच अमलात आणलेली असून या योजनेनुसार त्रिस्तरीय सरकारी पतसंस्थेचे कडून 3 लाख रुपये अल्पमुदत पीक कर्जाची उचल करून विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 रुपये पर्यंतच्या कर्जावर 4 टक्के व्याज सवलत व त्या पुढील 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 2 टक्के व्याज सवलत देण्यात येते. तसेच 3 लाख रुपये पर्यंत अल्प मुदत कर्जाची नियमित कर्ज परतफेड जे शेतकरी करतात त्यांना केंद्र शासनाने व्याज सवलतीच्या  दरामध्ये 2011-12 पासून 2 टक्के ऐवजी 3 टक्के करण्याचे योजिले होते. महाराष्ट्रात ही योजना शेती प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सुरू केली होती. चला तर आता जाणून घेऊया या योजनेचे उद्दिष्ट काय आहे.

हे देखील वाचा: आदिवासी कर्ज(Loan) योजना महाराष्ट्र 2023 संपूर्ण माहिती

डॉ. पंजाबराव देशमुख पिक कर्ज सवलत योजनेचे उद्दिष्ट:

पिक कर्ज सवलत अनुदान योजना चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे होय.  भारतामध्ये शेतकरी हा आपल्या देशाचा व राज्याचा प्रमुख आधार आहे.  केंद्र सरकारने यापूर्वीच शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत. पंजाबराव देशमुख योजना ग्रामीण भागातील राज्यस्तरीय शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या विविध उपक्रमांपैकी एक आहे.  या योजनेचे  दुसरे उद्दिष्ट कृषी उत्पन्न वाढ हे  ही आहे.  या योजनेतून मिळणारा लाभातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी उपकरणे,  खत,  बी बियाणे,  औषधे इत्यादी खरेदी करता येणार आहे.

 व्याजावर सवलत मिळत असल्याकारणाने शेतकरी पीक कर्जाची मुदतीत परतफेड करतील त्यामुळे बँकांची वसुली वाढवून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.  तसेच कर्ज होऊन शेतकरी ची आत्महत्या करतात त्या थांबण्यास देखील नक्कीच मदत होईल.  शेतकऱ्यांवर असलेला कर्जाचा बोजा या योजनेने नक्कीच कमी होईल आणि ते वेळेवर सहजतेने रक्कम ची परतफेड करू शकतील.

चला तर मित्रांनो आता जाणून घेऊया या डॉ.  पंजाबराव देशमुख पिक कर्ज सवलत योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता काय आहे.

हे देखील वाचा: येथे क्लिक करा आणि पहा प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशी पहायची?

योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता:

  • या योजनेचे मुख्य लाभार्थी शेतकरी आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी असे कोणतेही विशेष निकष नाही.
  •  कोणत्याही उत्पन्न गटातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात
  •  महाराष्ट्र राज्यातील नागरिक असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  •  या योजनेसाठी जात धर्म लिंग व उत्पन्नाची मर्यादा यांसारखे कोणतेही बंधन नाही.
  •  ज्या शेतकऱ्याकडे जमीन आहे असा शेतकरी या योजनेसाठी अर्ज  करू शकतो.

हे देखील वाचा: शेतकऱ्यांसाठी केंद्राची प्रधान मंत्री पिक विमा योजना|पहा योजनेचे फायदे

डॉ.  पंजाबराव देशमुख Pik karj savalat yojana च्या व्याज अनुदानाची महत्त्वाची वैशिष्ट्ये:

  • पिक कर्ज सवलत अनुदान योजना या योजनेअंतर्गत कर्ज आणि मूळ रक्कम प्रत्येक वर्षाच्या 30 जून पर्यंत भरणे आवश्यक आहे.
  • जर शेतकरी वेळेवर कर्ज फेडण्यास स अपयशी झाला तर अनुदान काढून टाकता येईल.
  • पण हे योजनेच्या अटी व नियमांवर अवलंबून आहे.
  • या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य सरकार अर्थसहाय्य देते.
  • यात केंद्र सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही ही योजना केवळ राज्यातील ग्रामीण भागातच लागू आहे.
  • कोणत्याही प्रकारचे इतर शुल्क आकारले जाणार नाही.
  • तालुका सहाय्यक निबंधक यांनी तपासून शिफारस केलेल्या प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक आणि सहकारी संस्था यांच्या स्तरावर मंजूर केल्या जातात.
  • उपलब्ध निधीनुसार प्रस्ताव मंजूर केले जातात.

1 thought on “ पीक कर्ज योजना(Crop Loan): डॉ. पंजाबराव देशमुख पिक कर्ज सवलत अनुदान योजना”

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!