New Ration Card Apply Online: आपल्या भारतामध्ये गरिबांपर्यंत मोफत धान्य पोहोचवण्यासाठी रेशन कार्डचा उपयोग केला जातो. रेशन कार्ड केवळ धान्यासाठीच नाही तर ओळखीचा पुरावा म्हणून देखील महत्त्वाचे मानले जाते. आता तुम्ही घर बसल्या बसल्या आपल्या आधार कार्ड ऑनलाइन बघू शकतात. जर आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर त्यासाठी अर्ज करू शकतात. आणि आपल्याकडे असलेल्या आधार कार्ड चा आरसी नंबर सुद्धा जाणून घेऊ शकतात. जर आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीची राशन कार्ड मध्ये नोंदणी केलेली नसेल तर तीही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने समावेश करू शकतात.
जर तुम्हाला घरातील व्यक्तीची राशन कार्ड मध्ये नोंदणी करायची असेल तर ते कसं करायचं हे आपण येथे जाणून घेणार आहोत. भारतात राहणारी कोणतीही व्यक्ती रेशन कार्ड साठी अर्ज करू शकते. आता आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा ते बघूया.
हे देखील वाचा: ऑनलाइन चेक करा तुमच्या आधार कार्डवर किती सिम आहेत ऍक्टिव्ह
ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड साठी असा करू शकता अर्ज:
- अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल त्यासाठी तुम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करा: http://mahafood.gov.in/ .
- या पेजवर अप्लाय फॉर रेशन कार्ड या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्ही आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, हेल्थ कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी ओळखपत्र म्हणून देऊ शकता. रेशन कार्ड बनवण्यासाठी तुमच्याकडून पाच ते 45 रुपये पर्यंत शुल्क घेतले जाईल अर्ज भरल्यानंतर सबमिट करा.
- तुमच्या डिटेल्स व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा अर्ज योग्य असल्याचे आढळल्यास रेशन कार्ड मिळेल.
आता आपण जाणून घेणार आहोत रेशन कार्ड बनवण्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते.
रेशन कार्ड बनवण्यासाठी लागणारे कागदपत्र:
रेशन कार्ड बनवण्यासाठी ओळखपत्र म्हणून तुम्ही
- आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकतात.
- पासपोर्ट साईज फोटो
- उत्पन्नाचा दाखला
- पत्ता म्हणजेच ऍड्रेस चा पुरावा
- विज बिल
- गॅस कनेक्शन
- टेलिफोन बिल
- बँक स्टेटमेंट अथवा पासबुक
- भाडेकरू असाल तर भाडेकरार
इत्यादी कागदपत्रांपैकी काही कागदपत्र लागतील. आता तुम्हाला जर तुम्ही केलेल्या अर्जाचा स्टेटस बघायचं असेल तर तुम्ही पुढे दिलेल्या पद्धतीने बघू शकतात.
हे देखील वाचा: रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी अशा पद्धतीने करू शकता
ऑनलाइन रेशन कार्ड अर्जाचं स्टेटस असे तपासा:
- रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज केल्यावर तुम्ही घरबसल्या अर्जाची स्थिती सुद्धा जाणून घेऊ शकतात.
- यासाठी http://mahafood.gov.in/ या वेबसाईटवर जा.
- त्यानंतर सिटीझन कॉर्नर सेक्शन वर क्लिक करा.
- पुढे ट्रॅक फूड सिक्युरिटी एप्लीकेशन वर क्लिक करा
- पुढे चार पैकी कोणताही एक पर्याय निवडा.
- येथे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती बघू शकतात.
हे देखील वाचा: Maharashtra Satbara Utara Online | महाराष्ट्र 7 12 उतारा कसा बघायचा?
आता ऑनलाइन आपले राशन कार्ड बघणे झाले सोपे
नमस्कार मित्रांनो आता आपल्याला ऑनलाईन आपले राशन कार्ड बघता येणार आहे.
आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी शेती विषयी आणि नवनवीन सरकारी योजनांची माहिती घेऊन येत असतो. तर मित्रांनो आज आपण अशाच एका सरकारी योजनेची माहिती घेणार आहोत ती योजना म्हणजे आपले रेशन कार्ड. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वस्त धान्य मिळण्यासाठी या रेशन कार्ड ची आवश्यकता असते. तर आता आपण हे रेशन कार्ड ऑनलाइन सुद्धा बघू शकतो. ते कसे बघायचे याचीच आपण आजच्या ब्लॉगमध्ये माहिती घेणार आहोत.
वर्ष 1997 पासून भारत सरकारने म्हणजेच केंद्र शासनाने किमान सामायिक कार्यक्रमांतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वस्त धान्य पुरवण्याची योजना सुरू केलेली आहे. योजनेअंतर्गत सुरुवातीला गरीब कुटुंबांना दर महिना दहा किलो अन्नधान्य चालू दराच्या जवळजवळ अर्ध्या किमतीत उपलब्ध करून दिले जात होते, नंतर यात 1 एप्रिल 2000 पासून वाढ करण्यात आली म्हणजे प्रति कुटुंब दरमहा 20 किलो अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात आहे. त्यानंतर 2002 पासून दारिद्र्यरेषेखालील बीपीएल म्हणजेच पिवळ्या रेशन कार्ड धारकांना दरमहा 35 किलो धान्य आणि केशरी राशन कार्ड धारकांना प्रति महिना 15 किलो धान्य वाटप करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. नंतर 2014 ला राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्यामध्ये दोन गट अस्तित्वात आले अत्त्योदय गट आणि प्राधान्य गट असे दोन गट अस्तित्वात आले. अतिदे गटाच्या लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच 35 किलो धान्य वाटप करण्यात येते तर प्राधान्य गटाच्या लाभार्थ्यांना प्रति महिना प्रति व्यक्ती पाच किलो अन्नधान्य वाटप केले जाते.
हे देखील वाचा: अशी करा गाय गोठा व नवीन विहीर ग्रामपंचायत योजना ऑनलाइन तक्रार
राशन कार्ड(ration card) चे तीन प्रकार(Types of ration Card)
मित्रांनो आपल्याला माहित आहे का महाराष्ट्र राज्य सह सगळीकडे तीन प्रकारचे राशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका दिले जातात ते कोणते आपण हे जाणून घेऊया. सोबतच आज आपण या तिन्ही राशन कार्ड मधला मेन फरक आणि कोणत्या कार्ड मध्ये कोणते लाभ मिळतात हे जाणून घेणार आहोत.
पिवळे रेशन कार्ड(BPL)
ज्यांना पिवळे रेशन कार्ड दिलेले आहे ते लोक दारिद्र्यरेषेखालील म्हणजेच खूप गरीब असतात म्हणून त्यांना बीपीएल म्हणजेच पिवळे रेशन कार्ड दिले जाते.
केसरी रेशन कार्ड(APL)
APL म्हणजेच केशरी रेशन कार्ड धारक लोक म्हणजे अशी लोक जे दारिद्र्यरेषेखालील लोकांपेक्षा थोडेसे आर्थिक दृष्ट्या प्रबळ आहेत.
पांढरे रेशन कार्ड(AAY)
AAY म्हणजेच पांढरे रेशन कार्ड कार्ड धारक लोक दारिद्र्यरेषेखाली मोडत नाहीत म्हणूनच त्यांना पांढरे रेशन कार्ड देण्यात येते.
हे देखील वाचा: नोंदीत बांधकाम कामगारांसाठी मध्यान भोजन योजना अंतर्गत अर्ज पद्धती, नियम आणि अटी, कागदपत्रे आणि पात्रता
रेशन कार्डचा नंबर म्हणजेच RC number ऑनलाईन कसा पाहायचा (How to check RC number online)
आरसी तपशील रेशन कार्ड:
मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आरसी नंबर ऑनलाईन कसा पाहायचा त्यासाठी तुम्हाला काही स्टेप फॉलो कराव्या लागतील.
- सर्वात आधी तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवर जावे लागेल.
- http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx या वेबसाईटवर उजवीकडे ऑनलाईन सेवा हा सेक्शन दिसेल. त्यात ऑनलाइन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
- एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवरील उजवीकडे वरच्या बाजूस मराठी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला वेबसाईटवरील माहिती मराठीमध्ये दिसू लागेल.
- आता तुम्हाला साइन इन किंवा रजिस्टर ऑप्शन मध्ये ऑफिस लॉगिन किंवा सार्वजनिक लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
- तुम्ही सार्वजनिक लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करा त्यानंतर खाली तुम्हाला दोन पर्याय दिसतील एक म्हणजे नोंदणीकृत यूजर आणि दुसरा म्हणजे नवीन युजर जर आपण वेबसाईट वरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर आपल्याला नवीन युजरमध्ये वर क्लिक करावे लागेल आणि जर आपण आधी व्हिजिट केलेले आहे म्हणजेच रजिस्टर युजर आहेत तर तुम्हाला नोंदणीकृत यूजर वर क्लिक करावे लागेल.
- या पेजवर तुम्हाला दोन पर्याय दिसतील Do you have ration card? आणि No ration card. No ration card वर क्लिक करा.
- इथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती म्हणजे तुमचं संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर,लिंग, ई-मेल आयडी अशी माहिती भरावी लागेल.
- सर्व माहिती भरून झाली की verify adhar या पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर तुम्हाला एक मेसेज येईल. आणि याच मेसेजमध्ये तुमचा आरसी म्हणजेच रेशन कार्ड नंबर आहे तुम्हाला मिळून जाईल.
मित्रांनो आता तुम्हाला जर रेशन कार्ड ऑनलाइन बघायचं असेल तर ते कसं बघायचं मी इथे सांगणार आहे.
हे देखील वाचा: घरबसल्या मिळेल तुमच्या आधारवर सुरू असलेल्या सिम कार्डची माहिती
रेशन कार्ड ऑनलाइन कसं पाहायचं(How to check your ration card online)
आता तुमच्याकडे तुमचा आरसी नंबर म्हणजेच रेशन कार्ड नंबर अवेलेबल आहे तर त्यावरून तुम्ही रेशन कार्ड ऑनलाइन बघू शकतात. ऑनलाइन राशन कार्ड बघण्यासाठी खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो करा.
- https://rcms.mahafood.gov.in/ या वेबसाईट वरती व्हिजिट करा.
- या पेजवर उजवीकडे तुम्हाला एक राशन कार्ड हा पर्याय दिसेल त्यावर गेल्यानंतर
- तुम्हाला Know your ration card या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- इथे तुम्हाला कॅपच्या म्हणजेच व्हेरिफिकेशन साठी दिलेले एबीसीडी चे लेटर टाकावे लागेल आणि त्यानंतर verify वर क्लिक करावे लागेल.
- आता इथे RC Number म्हणजेच आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे तो टाकला की समोरील view report वर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर तुमच्या रेशन कार्ड बद्दलची माहिती ओपन होईल.
- या पेजवर तुम्हाला दिसेल की सुरुवातीला रेशन कार्ड नंबर आणि मग
- त्यापुढे Print Your Ration Card असे पर्याय दिलेला आहे त्यावर क्लिक करा म्हणजे तुमचं रेशन कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल.
- आता यावर सर्व डिटेल तुम्हाला दिसेल उदाहरणार्थ कुटुंब प्रमुखाचे नाव रेशन कार्ड नंबर पत्ता राशन दुकानदाराचा नंबर
- आणि पत्ता कुटुंबातील सदस्यांची माहिती आणि तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत धान्य मिळतो आणि ते किती मिळतं.
- अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन रेशन कार्ड बघू शकतात.
- तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुम्ही हे रेशन कार्ड कोणत्याही सरकारी किंवा इतर कामासाठी वापरू शकत नाही.
- तशी स्पष्ट आणि डिटेल मध्ये सूचना महाराष्ट्र सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वेबसाईटवर दिलेली आहे. तुम्ही फक्त इथे तुमचं रेशन कार्ड बघू शकतात.
बंधू आणि भगिनींनो तुम्हाला जर आजचा लेख आवडला असेल तर नक्कीच हा लेख इतर लोकांना शेअर करा म्हणजे त्यांना पण या योजनेबद्दल माहिती मिळेल आणि माहितीचा लाभ घेता येईल.
हे देखील वाचा: पहा येथे गाय म्हैस वाटप योजना mahabms शासन निर्णय