शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता फक्त 600 रुपयात मिळणार DAP | पहा कुठे आणि कसे मिळेल नॅनो डीएपी खत

Nano DAP Fertilizer: नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि कामाची बातमी आजच्या लेखामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत. खरीप हंगामासाठी शेतकरी आतापासूनच तयारी सुरू करत आहे. म्हणजेच रासायनिक खते, बी बियाणे खरेदी करत आहेत. परंतु यंदाच्या खरीप हंगामासाठी केंद्र शासनाकडून एक महत्त्वाचं अपडेट समोर आलेला आहे. हे अपडेट जर पाहिलं तर शेतकऱ्यांना आता डीएपी मात्र 600 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तेही तुम्हाला फक्त एका बॉटलमध्येच 50 किलो गोणीच्या तुलनेत हे  डीएपी काम करणार आहे.  पीक वाढीसाठी अति महत्त्वाचे असलेले हे खत आता शेतकऱ्यांना स्वस्त दरात मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता बाजारात नॅनो DAP आले आहे. हे  डीएपी इफको(iffco) द्रवरूप स्वरूपात विकसित केले आहे.

Join Whatsapp Channel

Nano DAP Fertilizer By Iffco:

आधी इफको(iffco) ने नॅनो युरिया विकसित केला होता आता नॅनो डीएपी विकसित केले असून या नॅनो डीएपीला  केंद्रीय गृह आणि सरकार मंत्री अमित शहा यांनी नुकतेच लॉन्च केले आहे.  26 एप्रिल 2023 रोजी अमित शहा यांच्या हस्ते Nano DAP  या अंतरावर उप खताचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांना 50 किलोच्या डीएपीच्या  बॅग खरेदी करण्याची गरज राहणार नाही.

हे देखील वाचा: येथे क्लिक करून Nano DAP ची किंमत आणि फायदे पहा

  • स्वस्त दरात न्यानो डीएपी आल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
  • शिवाय यामुळे जमिनीची  सुपीकता कायम राहिला मदत होईल आणि उत्पन्नात देखील वाढ होण्यास मदत होईल.
  • आता आपण बघूया शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये  कशी बचत होणार आहे.

 Nano DAP Fertilizer: शेतकऱ्यांच्या खर्चात होणारी बचत:

Nano DAP Fertilizer फक्त 600 रुपयात मिळणार DAP
  • नॅनो डीएपीची 500 मिली ची एक बॉटल 50 किलोच्या पारंपारिक दाणेदार डीएपी खताच्या समतुल्य राहणार असल्याची माहिती इफकोच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.
  • म्हणजे 50 किलोची  खताची गोणी वापरण्याची केवळ 500 ml ची बॉटल पिकांवर  फवारल्याने डीएपी ची गरज भागवता येणार आहे.
  • सहाजिक आहे यामुळे शेतकऱ्यांचा पैसा वाचण्यास मदत होईल
  • पारंपारिक चालत आलेल्या दाणेदार डीएपीच्या एका गोणीसाठी शेतकऱ्यांना जवळपास 1350 रुपये मोजावे लागतात
  • पण नॅनो डीएपीच्या एका 500ml च्या बाटलीची किंमत केवळ 600 रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे.
  • त्यामुळे शेतकऱ्यांचा निम्म्याहून अधिक खर्च वाचणार आहे.
  • उत्पन्नात वाढ होईल आणि उत्पन्नासाठी लागणारा खर्च बचत होईल.
  • जमिनीची सुपीकता देखील कायम ठेवण्यास मदत होईल.
  • अशाप्रकारे द् द्रवरूप नॅनो डीएपीचा वापर करून तुम्ही खर्चाची बचत करू शकतात.

हे देखील वाचा: मागेल त्याला शेततळे योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड कशी केली जाईल?

एका हेक्टर मध्ये 76 क्विंटल गव्हाचे उत्पादन देणार वाण! उत्पन्न वाढवण्यास उपयुक्त:

 चाचणी देशातील जवळजवळ अकराशे ठिकाणी दोन डझन पिकांवर करण्यात आल्याचे सांगण्यात आलेले आहे. पारंपारिक पद्धतीने वापर करण्यात येत असलेल्या डीएपी, झिंक आणि कॉपरपेक्षा ते किती चांगले आहे हे पाहण्यासाठी विविध पिकांवर त्याची स्थापना करण्यात आली होती. नॅनो युरिया प्रमाणेच डीएपी आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचे ही परिणाम चांगले आलेले आहेत.  या खताचा वापर केल्याने परिणाम असा होईल की कमी खर्चात जास्त उत्पन्न घेता येईल.

हे देखील वाचा: आदिवासी कर्ज (Loan) योजना महाराष्ट्र 2022 पात्रता  व लागणारी कागदपत्रे?

Nano DAP चे प्लांट कुठे उभारल्या जाणार आहेत?

 शेतकरी डीएपी चा देखील वापर करतील, अशी आशा कृषी क्षेत्रातील  तज्ञांना आहे. नॅनो युरिया, नॅनो डीएपी  उत्पादनासाठी उत्पादन प्रकल्प अमला, फुलपूर, कलोल, बेंगलोर, पार दीप, कांडला, देवघर, आणि गुवाहाटी या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. या सर्व युनिट्सची दररोज दोन लाख बाटल्यांची उत्पादन क्षमता असणार आहेत. त्याच्या स्थापनेसाठी एकूण 3000 कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. त्यापैकी 720 कोटींची रक्कम आधीच वाटप करण्यात आलेली आहे. या प्लांट मधून सुमारे एक हजार लोकांना रोजगार मिळणार आहे असा दावा करण्यात आलेला आहे.

 माहिती आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद!

Nano DAP Fertilizer, IFFCO Nano DAP, नॅनो डीएपी खत, iffco nano dap buy online

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!