Nano DAP By IFFCO ची किंमत आणि फायदे

Nano DAP By IFFCO: मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण Nano DAP By IFFCO ची किंमत आणि कोण कोणते फायदे आहेत हे जाणून घेणार आहोत. तुमच्या आपल्या ब्लॉग वरती स्वागत आहे. मित्रांनो, 26 एप्रिल 2023 रोजी Iffco सदन येथे झालेल्या बैठकीत  केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी Iffco Nano DAP  हे संपूर्ण भारत देशातील शेतकऱ्यांना समर्पित केलेले आहे. इफकोची नॅनो डीएपी खताची एक बाटली पारंपारिक डीएपीच्या 50 किलो बॅग ची जागा घेईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यासोबतच ही एक बाटली पारंपरिक DAP च्या निम्म्या किमतीमध्ये उपलब्ध होणार आहे. नॅनो डीएपी चे पहिले उत्पादन युनिट हे गुजरात राज्यातील कलोल येथे स्थापित करण्यात येईल, iffco ने लॉन्च कार्यक्रम दरम्यान दिलेली आहे.

Nano DAP By IFFCO

इफकोचे नॅनो डीएपी

मित्रांनो आपल्याला माहितीच आहे केंद्र सरकारने इफकोचे नॅनो डीएपी(Nano DAP By IFFCO) हे प्रॉडक्ट नुकतेच लॉन्च केले आहे.  आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. शेतकऱ्यांना खर्चामध्ये बचत सुद्धा होणार आहे. नॅनो डीएपी ची 500 मिली ची एक बाटली  पारंपारिक दाणेदार डीएपी खताच्या 50 किलो गोणी बरोबर आहे आता तुम्हाला 50 किलो  डीएपी वर खर्च करण्याची गरज नाही.  50 किलो डीएपी खताची गोणी वापरणे ऐवजी 500 ml  ची बाटली फवारल्याने तेवढाच फायदा होईल. पारंपारिक पद्धतीची दाणेदार डीएपी खताची एक गोणी शेतकऱ्यांना जवळजवळ 1350 रुपयांना मिळत होती.  तर आता नॅनो डीएपी ची 500 एम एल ची एक बाटली शेतकऱ्यांना फक्त 600 रुपयांमध्ये मिळणार आहे.

Join Whatsapp Channel

Nano DAP म्हणजे काय? What is Nano Fertilizer

  • Nano DAP मध्ये 8.0% नायट्रोजन आणि 16.0% फॉस्फरस असते, जे की द्रव स्वरूपात एका बाटलीमध्ये उपलब्ध आहे.
  • यांच्या कणांचा आकार 100nm पेक्षा कमी आहे.
  • हे खत वनस्पतींमध्ये सहजरीत्या प्रवेश करू शकते.
  • या नॅनो डीएपी खतामध्ये कार्यशील नायट्रोजन आणि फॉस्फरस क्लस्टर आहेत ज्यामुळे ते पिकांमध्ये लगेच  पसरू शकतात.

हे देखील वाचा: महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना काय आहे?

 नॅनो डीएपी चे फायदे(Fertilizer Uses):

  • नॅनो डीएपी(Nano DAP By IFFCO) चा वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि खर्चात बचत होणार आहे.
  • नॅनो डीएपी चा वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि खर्चात बचत होणार आहे.
  • सोबतच Nano DAP By IFFCO  वापरामुळे पिकाचे उत्पादन देखील वाढणार आहे.  पिकाचा एकूण दर्जा कमालीचा सुधारेल.
  • हे खत पिकांना पोषक तत्वांचा अचूक वापर प्रदान करते, ज्यामुळे रासायनिक खतांचा एकूण वापर कमी होईल.
  • हे  नॅनो डीएपी खत पर्यावरणास अनुकूल आहे आणि पर्यावरणास हानी न पोहोचवता पिकांच्या पौष्टिक गरजा पूर्ण करते.
  • नॅनो डीएपी हे एक द्रवरूप फॉर्मुलेशन आहे जे साठवणे आणि वाहतूक करणे अत्यंत सोपं आहे.
  • हाही शेतकऱ्यांसाठी एक सोयीस्कर पर्याय आहे. 
  • अशाच प्रकारे जमिनीची सुपीकता देखील कायम ठेवण्यास मदत होईल.
  • जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला नॅनो डीपी व नॅनो एरिया खरेदी करायचा असेल तर जवळच्या  खत विक्रेता किंवा इफकोच्या ऑफिशियल वेबसाईट वरून ऑर्डर करू शकता.
  • सध्या इको च्या वेबसाईटवर Coming soon  असं आहे म्हणजे लवकरच ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

हे देखील वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता फक्त 600 रुपयात मिळणार DAP | पहा कुठे आणि कसे मिळेल नॅनो डीएपी खत

बॉटल मधील नॅनो डीएपी(Nano DAP By IFFCO) कसे वापरावे?

नॅनो डीएपी हे बहुउपयोगी आणि सर्वच पिकांसाठी उपयुक्त आहे. या Nano DAP  चा डोस हा पीक अवस्था, बियांचा आकार, आणि वजन यावर अवलंबून आहे. हे खत बियाणे प्रक्रिया, मूळ/ कंद प्रक्रिया किंवा फवारणी द्वारे वापरले जाऊ शकते.

  • बीज प्रक्रिया- 3-5  मिली प्रति किलो बियाणे.
  • फवारणी-3-5  मिली प्रति लिटर पाणी.

हे देखील वाचा: गाय वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कार्यपद्धती असणार आहे?

मित्रांनो आजच्या लेखांमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्की शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. धन्यवाद!

nano dap, nano dap fertilizer in hindi, nano dap iffco price, iffco dap liquid

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!