Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra | ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना योजनेअंतर्गत मिळणार 3 हजार रुपये | असा करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व जेष्ठ नागरिकांना आता 3 हजार रुपये एका योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्या योजनेचे नाव आहे Mukhyamantri Vayoshri Yojana.  मुख्यमंत्री वयोश्री योजनाशिंदे सरकार मार्फत सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक स्वरूपात मदत मिळणार आहे. त्यासोबतच वेगवेगळ्या स्वरूपात लाभ मिळणार आहे. 

राज्यातील वय वर्ष 65 आणि त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य परिस्थितीनुसार जगण्यासाठी, तसेच त्यांना वाढत्या वयामुळे येणारे अपंगत्व किंवा अशक्तपणा यावर उपाययोजना म्हणून आवश्यक साह्य साधने आणि उपकरणे खरेदी करणे करता या योजनेअंतर्गत आर्थिक स्वरूपात मदत मिळणार आहे. मन स्वास्थ्य केंद्र योग्य प्रचार केंद्र व इतर याद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अभाधित ठेवण्यासाठी प्रबोधन आणि प्रशिक्षणाकरता एकाच वेळी एक रक्कम तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या खात्यात प्राप्त होणार आहे. त्यासाठी हीमुख्यमंत्री वयोश्री योजना राबविली जाणार आहे.

mukhyamantri vayoshri yojana maharashtra

 चला तर मित्रांनो या योजनेबद्दल आता आपण अधिक माहिती घेऊया. जसे की या योजनेचे फायदे काय? या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष काय? योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा? या योजनेचे स्वरूप काय असणार आहे? या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रांची आवश्यकता लागेल? Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra या योजनेअंतर्गत कोणकोणती उपकरणे घेण्यासाठी लाभ मिळतो? या योजनेची उद्दिष्टे आणि पात्रता काय?

हे देखील वाचा: आरे वा! आता मोदी सरकार देणार पाच कोटी पर्यंतच कर्ज फक्त 59 मिनिटात

Mukhyamantri Vayoshri Yojana योजनेचे स्वरूप काय?

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra

 मित्रांनो, या योजनेअंतर्गत वयोवृद्ध लाभार्थ्याला तीन हजार रुपये आर्थिक मदत म्हणून मिळणार आहे. ही मदत त्या व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. त्याला खालील प्रमाणे उपकरणे किंवा साधने खरेदी करण्यासाठी ही मदत दिली जाणार आहे.

  • चष्मा
  •  श्रवण यंत्र
  •  कमोड खुर्ची
  •  फोल्डिंग वॉकर
  •  ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर
  •  नी ब्रेस
  •  लंबर बेल्ट
  •  सर्वाइकल कॉलर इत्यादी

हे देखील वाचा: अशा प्रकारे मिळवा 3000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये | vayoshri yojana शासन निर्णय

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे? (Document required)

  • आधार कार्ड
  •  रहिवासी प्रमाणपत्र
  •  ओळखपत्र
  •   वयाचा पुरावा
  •  अपंग असल्यास प्रमाणपत्र
  •  रेशन कार्ड
  •  मोबाईल नंबर
  •  पासपोर्ट साईज फोटो

हे देखील वाचा: बघा! प्रधानमंत्री जनधन योजना बँक खाते कसे उघडायचे?

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र या योजनेचे उद्दिष्टे काय?

महाराष्ट्र राज्य सरकारकडून 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. थेट लाभ वितरण प्रणालीनुसार 3000 रुपये च्या मर्यादित निधी वितरण करण्यात येईल. विविध शिबिराचे आयोजन करण्यात येईल, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा उपचार मोफत होईल. असे विविध उद्दिष्टे या योजनेअंतर्गत आहे.

हे देखील वाचा: बघा काय आहे प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र परीयोजना

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra साठी पात्रता काय?(Eligibility Criteria)

  • मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणारा व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा ज्येष्ठ नागरिक असावा.
  •  त्या नागरिकाचे वय 31 डिसेंबर २०२३ च्या अखेरपर्यंत 65 वर्षे पूर्ण केलेली असावीत.
  •  त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. किंवा आधार नोंदणी पावती तरी असावी.
  •  उत्पन्न मर्यादा लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्याचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.
  •  सदर लाभार्थी व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसह कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच  उपकरणे विनामूल्य प्राप्त केलेले नसावे.
  •  याबाबतचे लाभार्थ्याचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक  राहील. मात्र दोषपूर्ण कार्यक्षम उपकरणे इत्यादी बदललेला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते.
  •  लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL  रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजना अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करणे.
  •  निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्याच्या संकेत पैकी 30 टक्के महिला असतील.
  •  पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यात तीन हजार रुपये थेट लाभ वितरण प्रणाली द्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन स्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याच्या देयक प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आज संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थामार्फत विकास पोर्टलवर तीस दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थी कडून सदर व रक्कम वसूल करण्यात येईल.

हे देखील वाचा: आरे वा! शेतकऱ्यांना उद्योगासाठी मिळणार दहा लाखांपर्यंत अनुदान

Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र ही शिंदे सरकार मार्फत राबविण्यात येत असलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील जेष्ठ नागरिकांना वेगवेगळे लाभ मिळणार आहेत. मुख्यमंत्री वयोश्री  योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले जाणार आहे, त्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्राच्या राष्ट्रीय वयोश्री  योजनेच्या धर्तीवर ही योजना राज्य सरकार राबवत आहे. त्यामुळे अर्ज करण्याची प्रक्रिया देखील दोघे योजनेसाठी सारखीच आहे. 

या योजनेसंबंधी मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला आहे, परंतु अजून. नवीन अपडेट येण्याअगोदर आमच्याकडून तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ही माहिती दिली जाईल. त्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा. किंवा या पेजला Bookmark करून ठेवा.

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra साठे सारखेच अर्ज प्रक्रिया असणार आहे त्यामुळे तुम्ही खालील पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

  • सर्वात आधी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
  • मुख्यमंत्री वयोश्री योजना अधिकृत वेबसाईट
  •  या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला Mukhyamantri Vayoshri Yojana Apply online  साठी रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक करायचे आहे.
  •  फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे. सर्व माहिती अचूक असावी. जेणेकरून तुमचा अर्ज अडकून राहणार नाही.
  •  सूचनेनुसार आवश्यक ती सर्व कागदपत्रे सॉफ्ट कॉपी मध्ये अपलोड करावी लागेल. आवश्यक कागदपत्रे वर दिल्याप्रमाणे राहणार आहे.
  •  शेवटी हा फॉर्म भरून झाल्यावर तुम्ही अर्ज सबमिट करायचा आहे.

 अशा पद्धतीने तुम्ही Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra योजनेचा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात सादर करू शकतात.

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!