MSRTC Avdel Tithe Pravas Yojana 2023: नमस्कार मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की एसटी महामंडळाची महिलांसाठी 50 टक्के मोफत प्रवास खूप फायदेशीर ठरत आहे. आणि या योजनेने बऱ्याच महिला एसटीने प्रवास करू लागले आहेत. आता एसटी महामंडळाने एक नवीन योजना सुरू केलेली आहे ती म्हणजे “ आवडेल तिथे प्रवास योजना 2023”. नुकताच एसटी महामंडळाकडून याचा अपडेट देण्यात आलेला आहे. चला तर मित्रांनो काय आहे हे अपडेट सविस्तरपणे बघूया.
MSRTC Avdel Tithe Pravas Yojana 2023: आवडेल तिथे प्रवास योजना पास?
या अपडेट नुसार वाहतुकीचा सेवेचा प्रकार साधी, जलद, रातराणी, शहरी, व यशवंती आंतरराज्यसह 7 दिवसाचे पास चे मूल्य प्रौढ व्यक्तींसाठी2040 तर मुलांसाठी 1025 आहे. आणि चार दिवसाचे पास चे मूल्य प्रौढ व्यक्तींसाठी 1170 रुपये आणि मुलांसाठी 585 रुपये इतके आहे.
शिवशाही बस साठी रोड व्यक्तींचे 7 दिवसाचे पास चे मूल्य 3 हजार 30 रुपये आहे तर लहान मुलांचे 1520 रुपये आहेत. चार दिवसाचे पास चे मूल्य प्रौढ व्यक्तींसाठी 1520 आहे आणि मुलांसाठी पाच वर्षापेक्षा जास्त आणि बारा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी लागू असणार आहे.
हे देखील वाचा: दहा मिनिटात असं मिळवा घरबसल्या ५० हजार रुपये लोन | एसबीआई ई मुद्रा लोन
आता करा एसटीने आवडेल तिथे कुठेही प्रवास:
- आवडेल तिथे कुठेही प्रवास या योजनेत सात आणि चार दिवसाचे पाच दिले जाणार आहेत
- साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेस साठी म्हणजेच साधी, रातराणी, जलद, शहरी, यशवंती आंतरराज्यसह मार्गाचे ग्राह्य राहणार आहे.
- निम आराम सेवेसाठी स्वतंत्रदर निश्चित करण्यात आलेले नाहीत.
- शिवशाही बस सेवेसाठी देण्यात येणारा पास शिवशाही बस सेवा साधी,
- निम आराम, वीणा वातानुकूलित शयन असणे या सर्व सेवांसाठी आंतरराज्य मार्गसह ग्राह्य राहील.
हे देखील वाचा: असा घ्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा फायदा
कुणासाठी आहे ही MSRTC Avdel Tithe Pravas Yojana योजना?
आवडेल तिथे कुठेही प्रवास योजना ही लहान मुलांसाठी म्हणजेच 5 वर्षे ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आणि व्यक्तींसाठी लागू केलेली योजना आहे.
प्रौढ व्यक्तींसाठी आणि लहान मुलांसाठी या योजनेचे दर वेगवेगळे निश्चित केले गेलेले आहे.
तुम्ही पाच आणि सात दिवसांचा पास काढू शकतात आणि संपूर्ण आंतरराज्य एसटीने प्रवास करू शकतात.
हे देखील वाचा: असा घ्या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ
आवडेल तिथे कुठेही प्रवास योजनेचे नियम:
- या योजने अंतर्गत ७ व ४ दिवसाचे पास दिले जातील.
- साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी (साधी, जलद, रातराणी, शहरी, यशवंती (मिडी) आंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहतील.
- निमआराम बससेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले नाहीत शिवशाही बससेवेसाठी देण्यात येणारा पास शिवशाही बससेवेसह साधी,निमआराम,विनावातानुकुलीत शयन आसनी या सर्व सेवांसाठीआंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहील.
- या योजनेअंतर्गत देण्यात येणारे पास दहा दिवस अगोदरपर्यंत देता येईल.
- “आवडेल तेथे कोठेही प्रवास ” योजनेचे पास नियमीत बसेस सोबतच कोणत्याही जादा बसेसमध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बसमध्ये ग्राह्य राहील.
- सदर पासावर प्रवास करणाऱ्या पासधारकांसाठीते पासधारक आहेत म्हणून प्रवेश नाकारू नये.
- आवडेल तेथे प्रवास पासधारकांसाठी बसमधील आसनासाठी हमी देता येणार नाही,
- परंतु या योजनेतील पास धारकाना सदर पासावर आरक्षण भरून आसन आरक्षित करता येईल.
- या योजनेअंतर्गत प्रौढ पासधारकास ३० किलो व १२ वर्षाखालील मुलास १५ किलो प्रवासी सामान विनाआकार नेता येईल.
- पासधारकास आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जेथपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसने प्रवास करता येईल.
- पास हरविल्यास त्याचे ऐवजी दुसरा पास देण्यात येणार नाही. वा हरविलेल्या पासाचा कोणताही परतावा दिला जाणार नाही.
- सदरचा पास अहस्तांतरणीय राहील.पासाचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास पास जप्त करण्यात येईल.
- प्रवासात वैयक्तीक वस्तु गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी स्विकारणार नाही.
हे देखील वाचा: आता मोदी सरकार देणार पाच कोटी पर्यंतच कर्ज फक्त 59 मिनिटात
आवडेल तिथे कुठेही प्रवास योजनेचे काही नियम:
- आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पासाच्या दिवसाची गणना ००.०० ते २४.०० अशी करण्यात येईल.
- पासाचे मुदतीच्या शेवटच्या दिवशी प्रवासी सदर पासावर २४.०० वा.नंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवासासाठी तिकीट घेणे आवश्यक राहील.
- काही वेळा रा.प.बसेस उशिरा सुटल्यामुळे,मार्गस्थ बिघाड झाल्यामुळे अगर काही अपरिहार्य कारणामुळे जी बस नियोजित पोहचण्याची वेळ २४.०० पूवी होती ती २४.०० नंतर पोहचत असेल व पासधारकाचा प्रवास खंडित झाला नसल्यास पासधारकांकडून तिकीट आकार वसूल करू नये.
- राप/वाह/सामान्य-८८/८०७२ दिनांक ०२/११/१९९८ – वाहतूक खाते परिपत्रक क्र.३०/१९९८ अन्वये दिलेल्या सुचनांनुसार घरातील नातलगाचा मुत्यू,भुकंप,आग लागणे, आतिवृष्टी, महापूर, नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पासधारकास पास रद्द करावयाचा असल्यास व त्याने तसे प्रवासाच्या तारखेपुर्वी पुराव्यासह कळविले असल्यास प्रत्येक पासामागे रु.२०/- सेवा शुल्क वसुल करून उर्वरीत रकमेचा त्यास परतावा देण्यात यावा. परंतु अशा बाबतीत सदर पासावर पुढील तारखेस प्रवास करण्याची प्रवाशाची इच्छा असल्यास त्याचा जुना पास रद्द करून त्याला नवीन पास देण्यात यावा,व त्यासाठी शुल्क आकारणी करण्यात येऊ नये.
- संप / काम बंद आंदोलन यामुळे रा.प. वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवासी सदर पासावर प्रवास करू न शकल्यास त्याने प्रवास न केलेल्या दिवसांचा परतावा / मुदतवाढ देण्यात येईल.सदरची मुदतवाढ / परतावा वाहतूक सुरु झाल्या पासून ३ महिने पर्यंतच्या कालावधीत देण्यात येईल.
- स्मार्ट कार्ड योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या आवडेल तेथे कोठेही प्रवास पासांसाठी वरील सूचना लागू राहतील.