Mini tractor anudan yojana Maharashtra apply online: मित्रांनो मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना काय आहे याची माहिती आपण आधीच्या ब्लॉगमध्ये घेतली. मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत 90 टक्के अनुदान मिनी ट्रॅक्टर आणि त्यासोबत त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी मिळणार आहे. आता आपण पाहूया मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी येणारे 90 टक्के अनुदानासाठी अर्ज कसा करायचा आहे? हा अर्ज कुठे करायचा आहे? आणि कोण कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू झाले आहे? ही सर्व माहिती आपण येथे पाहणार आहोत.
मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याच्या पद्धती
Mini tractor anudan yojana Maharashtra Offline registration
- या योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जावं लागेल. जिल्हा कार्यालयात समाज कल्याण विभागात सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधने या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- हा अर्ज घेतल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अयोग्य भरा. त्यासोबत विचारलेली सर्व कागदपत्रे जोडा.
हे देखील वाचा: मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?
- भरलेला अर्ज कागदपत्रांसोबत त्या कार्यालयात जमा करा. अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेली असेल.
Mini tractor anudan yojana Maharashtra apply online
- आता आपण पाहूया ऑनलाइन पद्धतीने मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा? त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो कराव्या लागतात.
- तुम्हाला सर्वप्रथम भारत सरकारच्या मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यासाठी तुम्ही कुठे दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.
- https://mini.mahasamajkalyan.in/Homelogin.aspx
- येथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही “ऑनलाईन अर्ज” या पर्यायावर क्लिक करा.
- हा रजिस्ट्रेशन अर्ज मध्ये सर्व माहिती भरा जसे की तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर, ईमेल आयडी, बचत गटाचे नाव.
- माहिती भरल्यावर रजिस्टर बटन वर क्लिक करा. अशा प्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले आहे.
- आता अर्जदाराला त्याचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
- तुमच्यासमोर आता या योजनेचा अर्ज ओपन होईल. येथे विचारलेली संपूर्ण माहिती अचूक करा.
- सोबत विचारलेली कागदपत्रे अपलोड करा. आणि त्यानंतर submit बटन वर क्लिक करा.
- अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेली असेल.