Majhi kanya bhagyashree yojana: नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण एक अनोख्या योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर एका मुलीचे पालक असाल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. या योजनेचे नाव आहे माझी कन्या भाग्यश्री योजना. Majhi kanya bhagyashree yojana या योजनेअंतर्गत जर पालकांनी दुसऱ्या मुलीला जन्म दिल्यानंतर कुटुंब नियोजन प्रक्रिया केली असेल, तर नसबंदी नंतर दोन्ही मुलींच्या नावे 2500, 2500 रुपये बँकेत जमा केले जातील.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मुलींना याचा लाभ होणार आहे. त्यातल्या त्यात एका व्यक्तीच्या दोन मुलींनाच हा लाभ दिला जाईल. माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर एका वर्षाच्या आत पालकांना नसबंदी करावी लागेल. आणि दुसरी मुलगी जन्मल्यापासून सहा महिन्यांच्या आत नसबंदी करणे बंधनकारक आहे.
नवीन धोरणानुसार या योजनेअंतर्गत मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांवरून 7.5 लाख रुपये करण्यात आलेले आहे. जे पूर्वी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना या योजनेचा लाभ होत होता. चला तर मित्रांनो आता आपण या योजनेबद्दल अधिक माहिती घेऊया.
Majhi kanya bhagyashree yojana उद्दिष्टे काय?
मित्रांनो, आपल्या समाजामध्ये मुलींना ओझं मानलं जातं. मोठ्या प्रमाणावर भ्रूणहत्या केली जात होती आणि मुलींना शिक्षणापासून देखील लांब ठेवण्यात येत होतं. या समस्यांवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही माझी कन्या भाग्यश्री योजना सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत मुलींचा जन्मदर वाढविणे. मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे. तसेच भ्रूणहत्या थांबवणे, मुलींना समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्साहन करता समाजात सामूहिक चळवळ निर्माण करणे अशा उद्दिष्टांचा समावेश आहे. तसेच मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि राज्यातील लोकांची नकारात्मक जुनी विचारसरणी बदलणे हा देखील या योजनेचा उद्दिष्ट आहे. सामाजिक बदल घडविणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट होय.
हे देखील वाचा: प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी काय?
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अटी आणि शर्ती काय?
- Majhi kanya bhagyashree yojana सर्व गटातील दारिद्र्यरेषेखालील(BPL) आणि दारिद्र्यरेषेवरील( पांढरे रेशन कार्डधारक) कुटुंबात जन्मलेल्या आपत्यांपैकी दोन मुलींना लागू असणार आहे.
- मुलीचे पालक महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे बंधनकारक.
- माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ एक ऑगस्ट 2017 रोजी जन्मलेल्या व त्यानंतर जन्मलेल्या मुलींना अनुदाय राहील.
- ज्या कुटुंबांना एक ऑगस्ट 2017 पूर्वी एक मुलगी आहे आणि एक ऑगस्ट 2017 नंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास आणि माता पित्याने कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर
- फक्त दुसऱ्या मुलीला रुपये 25000 इतका या योजनेचा लाभ अनुदेय राहील.
- अर्ज करताना मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- मुद्दलावर मिळणाऱ्या व्याजाचा दर हा त्यावेळी बँकेमार्फत लागू असलेल्या दरानुसार अनुदेय राही.
- एखाद्या परिवाराने अनाथ मुलीस दत्तक घेतले असेल तर सदर मुलीला त्याची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ देता येईल.
- पण सदर ला प्राप्त होण्यासाठी दत्तक मुलीचे वय 0 ते 6 वर्ष इतके असावे.
- विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होणे आवश्यक राहील.
- सोबतच त्या मुलीने दहावी परीक्षा उत्तीर्ण होणे आणि 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक राहील.
- दुसऱ्या प्रसूतीच्या वेळेस जुळ्या मुली झाल्या तर त्या दोन्ही मुली या योजनेस पात्र राहतील.
- बालगृहातील अनाथ मुलींसाठी या योजनेचा लाभ घेता येईल.
- प्रकार 1 च्या लाभार्थी कुटुंबास एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.
- त्याचप्रमाणे प्रकार 2 च्या लाभार्थी कुटुंबास देखील दोन आपण त्यांच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.
- विहित मुदतीपूर्वी जर अर्ज केलेल्या मुलीचा विवाह अथवा मृत्यू झाल्यास या योजनेचा फायदा तिच्या पालकांना होणार नाही, मुलीच्या नावे बँक खात्यात जमा झालेली रक्कम महाराष्ट्र शासनाच्या नावे असणाऱ्या Surplus खात्यात जमा म्हणून दर्शवली जाईल.
- जर वैयक्तिक मुलीच्या नावे असलेल्या एकत्रित निधी(corpus) एक लाखापेक्षा अधिक असल्यास ज्यादा ची रक्कम या खात्यात जमा केली जाईल.
- मुदतीपूर्वी मुलीचा विवाह किंवा मृत्यू झाल्यास मुलीच्या नावावरील सर्व एकत्रित निधी surplus या खात्यात जमा केला जाईल.
- प्रकार एक चे लाभार्थी: महाराष्ट्रातील ज्या आई-वडिलांना एकच मुलगी आहे आणि त्याआईने कुटुंब नियोजन केलेले असेल.
- प्रकार दोनचे लाभार्थी: एक मुलगी आहे आणि मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना प्रकार दोनचे लाभ मिळू शकतील. मात्र एक मुलगा आणि एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास त्या जोडप्याला या योजनेचा लाभ होणार नाही.
हे देखील वाचा: शासन निर्णय: तलंगा गट वाटप – योजनेचे नाव – ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे
Majhi kanya bhagyashree yojana साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थी मुलीचे पालक म्हणून महाराष्ट्र राज्यातील अधिकृत रहिवासी प्रमाणपत्र
- मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
- लाभार्थी कुटुंबाने योजनेसाठी अर्ज करताना एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याच्या प्रमाणपत्र
- योजनेसाठी अर्ज करताना लाभार्थी कुटुंबाने दोन मुलींच्या नंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
- अर्जदाराचे आधार कार्ड
- BPL श्रेणी रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- अर्जदाराचा मोबाईल नंबर
- मुलीचे व मातेचे बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
हे देखील वाचा: प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी काय?
Mazi kanya bhagyashree yojana apply online
मित्रांनो, माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही तो ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने करू शकतात. या योजनेचे आवश्यक सर्व अर्ज प्रत्येक ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, महिला बाल विकास यांच्या कार्यालयामध्ये विनामूल्य उपलब्ध करून दिलेले आहे. ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही यापैकी कोणत्याही कार्यालयात भेट देऊन अर्ज मागू शकतात.
पण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी या योजनेचा अर्ज महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता.
Click Here to Visit Official Website
Bhagyashri sukanya yojana लाभाकरता मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामपंचायत/ नगरपालिका किंवा महानगरपालिका या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे प्रपत्र-अ किंवा ब मध्ये अर्ज सादर करावा.
या अर्जासोबत वडिलांचे महाराष्ट्र राज्यात राहत असल्याचे रहिवासी दाखला, जन्म नोंदणी प्रमाणपत्र, दारिद्र्यरेषेखालील असल्याचा पुरावा( रेशन कार्ड), उत्पन्नाचा दाखला आणि वर दिल्याप्रमाणे इतर कागदपत्रे या अर्जासोबत सादर करावे. जर अर्जदाराने अर्ज अपुरा भरला असल्यास किंवा आवश्यक कागदपत्रे जोडली नसल्यास या अर्जदाराला दिलेल्या मुदती व्यतिरिक्त वाढीव एक महिन्याची मुदत देता येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत असा अर्ज दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाही. म्हणून अर्ज भरताना तो व्यवस्थित पूर्ण झाला आहे की नाही पुन्हा तपासून पहावा आणि सोबतच कागदपत्रे देखील तपासा.
Bhagyashri sukanya yojana Benefits
या योजनेचे फायदे काय?
येथे क्लिक करून माझी कन्या भाग्यश्री योजना पीडीएफ डाउनलोड करा