Maharashtra Satbara Utara Online: नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेऊया की ऑनलाईन पद्धतीने सातबारा उतारा कसा बघायचा. मित्रांनो आता तुम्ही तुमच्या जमिनीची सर्व माहिती घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून मिळू शकतात. ऑनलाइन पद्धत आल्यामुळे हे सहज शक्य झाले आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला 7 12 उतारा ची गरज भासत असते. ऑफलाइन पद्धतीने जर तुम्हाला सातबारा उतारा बघायचा असेल तर तुम्हाला तहसीलला भेट द्यावी लागते. पण यामध्ये तुमचं टाईम वाया जातो. त्यामुळेच आता हे रेकॉर्ड ऑनलाइन पद्धतीने पाहण्यासाठी सरकारकडून विविध ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहेत. चला तर मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण बघूया ऑनलाइन पद्धतीने सातबारा उतारा कसा पाहायचा, इतर जमिनीचे रेकॉर्ड कसे तपासायचे, सर्वे नंबर/ गट नंबर, भू नकाशा, भूलेख इत्यादी माहिती कशी पहायची.
ऑनलाईन सातबारा(7/12) उतारा कसा बघायचा?
Maharashtra Satbara Utara Online: मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने सातबारा उतारा बघायचा असेल तर तू मला खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो कराव्या लागतील.
- सर्वात आधी तुम्हाला खाली दिलेल्या महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
- https://bhulekh.mahabhumi.gov.in/
- पुढे एक मुखपृष्ठ उघडेल. त्यावर तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे.आणि “Go” वर क्लिक करा
- त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवड करा.
- पुढे तुमच्यासमोर “सर्वे नंबर/ गट नंबर, अक्षरी सर्वे नंबर/ गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव, संपूर्ण नाव असे पर्याय दिसतील. यापैकी ज्या पर्यायाने तुम्हाला उतारा शोधायचा आहे तो निवडा. पुढे शोधावर क्लिक करा.
- पुढे तुमचा मोबाईल नंबर टाका. आणि शोधा या बटणावर क्लिक करा.
- तुमच्यासमोर एक लिस्ट ओपन होईल. त्यातील ज्या व्यक्तीचा सातबारा पाहायचा आहे त्याचं नाव सिलेक्ट करा.
- पुढे नवीन पान ओपन होईल त्यात तुम्हाला त्या व्यक्तीचा सातबारा उतारा बघायला मिळेल.
हे देखील वाचा: येथे क्लिक करून प्रधानमंत्री घरकुल आवास योजना 2023 ची यादी तपासा
सातबारा उतारा काढताना असा बघा तुमचा विभाग
मित्रांनो महाराष्ट्र राज्यात एकूण 6 विभाग येतात. आणि सातबारा उतारा बघताना तुम्हाला तुमचा विभाग निवड करावा लागतो. जर तुम्हाला तुमचा विभाग कोणता आहे हे माहिती नसेल तर खाली दिलेल्या टेबल मध्ये तुमचा जिल्हा कोणत्या विभागात येतो हे दिलेले आहे. त्यासाठी तुम्ही खाली दिलेला टेबल बघा.
7/12 Online Maharashtra Bhumi Abhilekh:
औरंगाबाद विभाग | औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली |
अमरावती विभाग | अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम |
नागपूर विभाग | भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा |
पुणे विभाग | कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर |
कोकण विभाग | मुंबई सिटी, मुंबई सुबुर्बन, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग |
नाशिक विभाग | अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार |
हे देखील वाचा: शेत रस्त्यासाठी कायदेशीर मागणी अर्ज कसा करायचा?
जमिनीचे रेकॉर्ड ऑनलाइन असल्याचे फायदे कोणते?
- मित्रांनो आता तुम्हाला जमिनीचे कोणतेही रेकॉर्ड किंवा तपशील बघायचा असेल तर कोणत्याही शासकीय कार्यालयात जाण्याची गरज नाही.
- जमिनीचे जमाबंदी, तपशील, तसेच जमिनीचा नकाशा तुम्ही तुमच्या राज्याच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजेच वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने बघू शकतात.
- सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळे शासकीय यंत्रणेत पारदर्शकता येत आहे.
- जमिनीच्या संबंधित माहिती मिळवण्यासाठीचीप्रक्रिया अत्यंत सोपी आहे. कोणताही नागरिक जमिनीचा तपशील सहज बघू शकतो.
- सर्व माहिती सरकारने डिजिटल केलेली आहे. यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. शिवाय शासकीय यंत्र व्यवस्थित पारदर्शकता येण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: जमिनीचा नकाशा कसा पाहायचा:अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलवर जमिनीचा नकाशा असा पाहू शकता
जुना सातबारा, जुने फेरफार नोंदवही ऑनलाइन कसे काढावे?
मित्रांनो जमिनीची जुनी कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने काढण्यासाठी तुम्हाला सरकारच्या आपले अभिलेख पोर्टलवर भेट द्यावी लागेल. या पोर्टल वर जाऊन तुम्ही ऑनलाइन जुना 7/12 उतारा, जुने फेरफार आणि इतर जुनी कागदपत्रे काढू शकतात. यासाठी तुम्ही खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.
- सर्वात आधी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords/
- तुमच्यासमोर पोर्टल उघडलेलं असेल. आता तुम्ही जर नवीन यूजर असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि या आधी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुमच्याकडे युजरनेम आणि पासवर्ड नक्कीच असेल.
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता, आणि लॉगिन करण्यासाठी लॉगिन आयडी अशी सर्व माहिती भरा.
- रजिस्ट्रेशनच्या वेळेस जो युजरनेम आणि पासवर्ड बनवलेला आहे तो टाकून लॉगिन करा.
- पुढे “Basic Search” या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर “Exact search” हा पर्याय निवडून तुमचे जिल्हा, तालुका, गाव अशी सर्व माहिती भरा.
- Search पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या माहितीनुसार search result मध्ये कागदपत्रांची सूची असेल त्यातून तुम्ही तुमची कागदपत्र ओळखायची आहे आणि त्यापुढे दिलेल्या “Add to cart” या बटनावर क्लिक करून शेवटी Review Cart यावर क्लिक करा.
- नंतर तुम्ही निवडलेले कागदपत्रे येथे दिसतील. आता Continue बटन वर क्लिक करा.
- तुमच्यासमोर एक छोटी विंडो उघडेल त्यावर Ok वर क्लिक करा.
- येथे थोड्या वेळानंतर पुन्हा Review cart वर जा. आता तुम्हाला Download पर्याय तुमच्या स्क्रीनवर दिसेल. कागदपत्रे बघायची असेल तर view वर क्लिक करा. कागदपत्रे डाऊनलोड करायची असेल तर Download Available Files या बटन वर क्लिक करा.
- अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जमिनीची कागदपत्रे बघू शकतात आणि डाऊनलोडही करू शकतात.
हे देखील वाचा: जमिनीचा नकाशा Online पद्धतीने कसा पाहायचा?
7/12(सातबारा) उतारा चे महत्व काय?
मित्रांनो, 7/12 उतारा हा एक महत्त्वपूर्ण कागद आहे जो तुमच्या जमिनी बद्दल माहिती देतो. महाराष्ट्रातील ग्रामीण जिल्ह्यांमध्ये जमीन खरेदी करू पाहणाऱ्या खरेदी दारासाठी विशेषतः हा कागद महत्वपूर्ण ठरतो. 7/12 उतारा जमिनीच्या मालकी बद्दल महत्वपूर्ण माहिती देतो आणि जमिनीबद्दल पूर्वजांची माहिती उघड करण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो.
शिवाय हे कोणत्याही प्रलंबित दावे, मागील विभाग किंवा प्रलंबित खटल्यासंबंधी जमिनीच्या कायदेशीर स्थितीची खरेदी दारात खात्री करून देण्यास मदत करतो. सातबारा उतारा कृषी वैशिष्ट्ये, भौतिक ओळख, पीक माहिती, मालमत्ता नोंदणीवर केलेल्या विविध कामाचे तपशीलवार वर्णन देतो. जेव्हा खरेदी विक्रीचा व्यवहार होतो तेव्हा रजिस्टर च्या उप कार्यालयात सातबारा उतारा तयार केले जाणे आवश्यक आहे.
बँकेतून कर्ज घेण्यासाठी सातबारा उतारा आवश्यक असतो. जर तुमचे काही जमिनी संबंधात कोर्टामध्ये खटले चालू असतील तर सातबारा उतारा हा पुरावा म्हणून सबमिट करणे आवश्यक असते.
चला तर मित्रांनो आता आपण पाहूया या सातबारा उताऱ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केलेला असतो.
हे देखील वाचा: ऑफलाइन/ऑनलाईन पद्धतीने लिंक करा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी
7/12 उताऱ्यामध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टी
- गावांची नावे
- सर्वे क्रमांक
- सर्वेक्षण क्रमांकाचा उपविभाग
- भाडेकरुचे नाव
- खाता क्रमांक
- जमिनीचे स्थानिक नाव
- अलागवडी योग्य जमीन
- लागवडी योग्य जमीन
- जमिनीच्या कृषी पैलूंचा तपशील
- वहीवाटी चा प्रकार
- धारक/ वहिवाटी दाराचे नाव
- न्याय कर किंवा विशेष मूल्यांकन
- इतर अधिकार
7 12 utara in marathi online, Maharashtra satbara utara online, 7 12 कसा बघायचा, महाराष्ट्र 7 12 उतारा, Bhumi abhilekh 7 12 Maharashtra, Online सातबारा उतारा, Maharashtra 7 12 online