Maharashtra Rojgar Hami Yojana: नमस्कार मित्रांनो नेहमीप्रमाणेच आजचा ब्लॉग देखील तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जर तुम्ही रोजगार संधीच्या शोधात असाल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. महाराष्ट्र रोजगार हमी योजना ही महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गावातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. जे ही लोक काम करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी या योजनेचा फायदा होतो. महाराष्ट्र रोजगार हमी योजना ही मनरेगाच्या अंतर्गत येते. चला तर मित्रांनो या योजनेबद्दल अधिक जाणून घेऊया.
मनरेगाचा आधार; मजुरांना नियमित रोजगार
मनरेगा कामांची योग्य प्रकारे आखणी करून प्रभावी अंमलबजावणी करते त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामावर मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील मजुरांनी हजेरी लावली आहे. मजूर उपस्थितीमध्ये चंद्रपूर हा जिल्हा आज राज्यात दुसऱ्या क्रमांकावर तर ग्रामपंचायत अंतर्गत कामाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर येतो.
या जिल्ह्यांतर्गत सर्व तालुक्यांमधील मनरेगाच्या विविध कामावर आज 71 हजार 643 एवढे मजूर काम करीत आहे. मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे असे दिसून येते.
हंगामी वर्षाच्या शेवटी शेतामधील कामे संपल्यानंतर शेतमजुरांकडे कोणतीही कामे उपलब्ध राहत नाही. जास्त करून उन्हाळ्यामध्ये काम मिळणे मुश्किल होतात. अशावेळी त्यांना रिकामी राहावे लागते. कधी कधी तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. अशा बिकटप्रसंगी ग्रामीण भागातील मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना चंद्रपूर जिल्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
हे देखील वाचा: येथे क्लिक करून बघा Mgrega Job Card कसे बनवायचे? असे करा जॉब कार्ड डाउनलोड
Maharashtra Rojgar Hami Yojana
मनरेगा अंतर्गत वैयक्तिक आणि सार्वजनिक दोन्ही प्रकारची कामे हाती घेतले जाते. यामध्ये भूमिहीन शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सिंचन विहीर, शेततळे, फळबाग,शेत बांध, गोळी खोलीकरण, मॉडेल, सौच खड्डे, गुरांचे गोठे, शेळी निवारा, बायोगॅस निर्मिती, कुक्कुटपालन शेड अशा विविध वैयक्तिक स्वरूपाची कामे हाती घेतले जातात.
तसेच सार्वजनिक भौतिक सुविधांची मालमत्ता निर्माण करणारी कामे जसे की गोडाऊन निर्मिती, ग्रामपंचायत भवन, ग्राम संघ भवन, शेठ, पांदण रस्ते, तलावातून गाळ काढणे, वृक्ष लागवडी अशी अनेक कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घेतली जातात. याकरिता ग्रामपंचायती अंतर्गत सर्व कामांचे नियोजन आर्थिक वर्ष सुरू व्हायच्या आधी करण्यात येते.
जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे तसेच जिल्ह्यात नाविन्यपूर्ण काम करण्यावर चंद्रपूर जिल्हा परिषदेने भर दिलेला आहे. यावर्षी ग्रामीण भागात खेळ प्रवृत्तीचा विकास करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील युवकांना सैनिक भरती, पोलीस भरती आणि अशाच इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी क्रीडांगण उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी प्रत्येक तालुका पाच क्रीडांगणाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देऊन एकूण 75 कामे जिल्ह्यात एकाच वेळी मनरेगा मधून सुरू केली गेली आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात एक गोडाऊन आणि ग्रामसंघ भवन तयार करण्याचे नियोजन केलेले आहे.
हे देखील वाचा: पहा येथे गाय म्हैस वाटप योजना mahabms शासन निर्णय
अमृत महोत्सवी फळझाड वृक्ष व फुल पिकं लागवड योजना
- मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर केलेल्या वृक्ष लागवड योजनेसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. शेतकऱ्याने लावलेल्या रोपांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सीईओ, व्हिडिओ यांच्या माध्यमातून जिल्ह्यात तपासणी मोहीम हाती घेतली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोप लागवड नाही केली तर ते दोषी ठरतील.
- शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या उद्दिष्टांपैकी अनेक ठिकाणी मुश्किल झाडे बांधावर दिसून येतात. त्यामुळे जिल्हाधिकारी, अधिकारी, कर्मचारी लाभार्थ्याच्या एकाच वेळी पंचनामा करून दोषींवर कारवाई करतात. या पंचनाम्यात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येते.
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक लाभाच्या शेतावर शेताच्या बांधावर आणि पडीत जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड वृक्ष व फुल पिकं लागवड योजना अमलात आणली गेली.
- ही योजना पंचायत समिती कृषी विभाग सामाजिक वनीकरण विभागामार्फत ठाणे जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना एक शाश्वत उत्पन्न मिळून आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. पंचायत समिती विभाग अंतर्गत जिल्ह्यात वीस ते शंभर रुपयांपर्यंत फळ लागवड वृक्ष व फुल पीक लागवडीचे उद्दिष्टे देण्यात आलेलं आहे. यानुसारच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केलेले आहेत.
- तपासणी: ठाणे जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी तर त्यांना दिलेल्या उद्दिष्ट पैकी मोजक्या म्हणजेच कमी झाडांची लागवड केल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाला मिळालेली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील फळबाग लागवडीची सत्यता तपासणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य अधिकारी तालुक्यातील यांच्या सर्व गटविकास अधिकारी तांत्रिक अधिकारी व सहाय्यक कार्यक्रमाधिकारी यांची अदलाबदल करून झाडांची तपासणी करतात.
- रोजगार हमी योजना विभागाकडे अनेक कर्मचारी एकाच तालुक्यात अनेक वर्षापासून कार्य करत आहे. त्यामुळे एकाच तालुक्यात तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची प्रशासकीय बदली करण्यात येऊ शकते.
- या योजनेअंतर्गत झाडे न लावता शेतकऱ्यांना अनुदान दिले असेल तर कोणत्या शेतकऱ्यांनी अनुदान उचलले? मात्र लागवड केली नाही, त्याची खातरजमा करून कार्यवाही करण्यात येते.
हे देखील वाचा: प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा?
महाराष्ट्र रोजगार हमी योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन,स्टेटस आणि लाभार्थी यादी
सध्या स्थितीत महाराष्ट्र राज्यात रोजगार हमी अधिनियम 1977( दिनांक 6 ऑगस्ट 2014 पर्यंत सुधारित) अमलात आहे.
या कायद्या अंतर्गत खालील दोन योजना सुरू आहेत:
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना: MGNREGA च्या या योजनेअंतर्गत केंद्रशासन 100 दिवस प्रती कुटुंब रोजगाराची हमी देते. शंभर दिवस प्रती कुटुंब मजुरीच्या खर्चासाठी निधी पुरवते आणि प्रतिक कुटुंब १०० दिवसावरील प्रत्येक मजुराच्या मजुरीच्या खर्चाचा आर्थिक भार राज्य शासन उचलते.
- महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 सुधारित कलम(12)(ई) नुसार वैयक्तिक लाभाच्या योजना अनुदान तत्त्वावर प्रतिपूर्ती योजना म्हणून राबविण्यात येतात. उदाहरणार्थ: 1) जवाहर/ धडक सिंचन विहीर योजना 2) रोहयोअंतर्गत फळबाग लागवड योजना
मजुरांना पगार कसा मिळणार?
आधार कार्ड लिंक केलेल्या बँक खात्यावर होणार मनरेगाचा पगार जमा
- महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपाय म्हणून मजुरांना डिजिटल हजेरी लावणे बंधनकारक केलेले आहे.
- त्यामुळे आता आधार लिंक असलेले बँक खाते पगारासाठी बंधनकारक आहे.
- अशा अखात्यांमध्येच त्यांची मजुरी जमा केली जाईल.
- ज्या व्यक्तींचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नाही त्यांनी तो त्वरित जमा करून घ्यावा, अन्यथा तुम्हाला मजुरी मिळणार नाही.
- पूर्वी रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांच्या हजेरीमध्ये फेरफार होत होता.
- हा फेरफार रोखण्यासाठी डिजिटल हजेरीचा निर्णय घेण्यात आला.
- मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम या मोबाईल ॲप वर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
- सार्वजनिक कामांसाठी हा निर्णय बंधनकारक असून वैयक्तिक कामासाठी लाभार्थ्यांना सूट देण्यात आलेली आहे.
- या नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम या ॲपवर नोंदणी केलेल्या मजुरांसाठी आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
- तुमची मजुरी डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होईल.
- डिजिटल हजेरी लावण्यासाठी मोबाईल ॲप वर दोनदा वेळ नमूद केलेली आहे.
- सोबतच मजुराचे फोटो घेतली जातात.
- हजेरीची वेळ सकाळी 9 ते 11 आणि दुपारी दोन ते सहा या काळात दोनदा ठरलेली आहे.
- मजुरी वेळेवर न मिळणे, बनावट मजूर दाखवणे अशा सर्व गैरप्रकारांना आता आळा बसणार आहे.
- याचा परिणाम प्रत्यक्ष काम करणाऱ्याला या योजनेचा लाभ मिळेल, असे केंद्र सरकारचे उद्देश आहे.
- हा निर्णय एक फेब्रुवारीपासून लागू करण्यात आलेला आहे.
हे देखील वाचा: Aam Aadmi Vima Yojana Benifits आम आदमी विमा योजनेचे फायदे कोणते?
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
Maharashtra Rojgar Hami Yojana Online Registration
- सर्वात आधी तुम्हाला मनरेगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
- https://egs.mahaonline.gov.in/
- आता तुमच्यासमोर मुख्यपृष्ठ ओपन होईल. यावर तुम्हाला रजिस्टर या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता एक नवीन पेज उघडेल.
- यावर तुम्हाला तुमचे नाव, जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अशी माहिती भरावी लागेल.
- पुढे तुम्ही रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा.
- पुढे तुम्हाला लॉगिन साठी ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड येथे टाकावा लागेल जो तुम्हाला रजिस्टर केल्यानंतर मिळालेला असेल.
- त्यानंतर पुढे लॉगिन या पर्यायावर क्लिक करा.
- पुढे तुम्हाला महाराष्ट्र रोजगार हमी योजना(apply for rojgar hami yojana) हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- तुमच्यासमोर एप्लीकेशन फॉर्म उघडेल तो तुम्हाला भरायचा आहे.
- येथे तुम्हाला सर्व महत्त्वाची माहिती जसे की तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी भरायचे आहे.
- यानंतर तुम्हाला विचारलेले सर्व महत्त्वाचे कागदपत्रे येथे अपलोड करायचे आहे.
- पुढे तुम्ही सबमिट या बटनवर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र रोजगार हमी योजनेसाठी अप्लाय करू शकतात.
Maharashtra Rojgar Hami Yojana, Maharashtra Employment Guarantee Scheme, Rojgar Hami yojana samiti maharashtra, Maharashtra gramin rojgar hami yojana, Maharashtra rojgar hami yojana list, Maharashtra rojgar hami yojana online registration, Maharashtra government rojgar hami yojana, MGNREGA Job Card