नमस्कार मित्रांनो, आपल्या इतर लेखाप्रमाणे आजचा लेख देखील महत्त्वाचा आहे. आजच्या लेखांमध्ये आपण पाहूया की 1985 सालापासून चे खरेदी खत,जुने दस्त ऑनलाइन पद्धतीने कसे पाहायचे. हो मित्रांनो, आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून Maharashtra Land Record online पद्धतीने पाहू शकतात.
जुने दस्त, खरेदी खत ऑनलाइन पद्धतीने कसे पहावे?
- सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्मेंट च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यासाठी तुम्ही कुठे दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.
- https://igrmaharashtra.gov.in/
- या लिंक वर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र शासनाची नोंदणी व मुद्रांक विभागाची अधिकृत वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल.
- आता या पेजवर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिस हा पर्याय निवडायचा आहे. त्यामधील पहिला पर्याय e-search यावर क्लिक करा.
- पुढे विनाशुल्क सेवा या बटनवर क्लिक करून त्यामधील free search 1.9 हा पर्याय वर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर search flow नावाचे पेज ओपन होईल. त्यावर काही सूचना दिलेल्या असतील त्या वाचा आणि ते पेज close करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये मिळकत निहाय(document details), दस्त निहाय(document number) असे पर्याय दिसतील.
आता तुम्ही दोन पद्धतीने दस्त शोधू शकतात: पहिली पद्धत म्हणजे मिळकत निहाय ची माहिती भरून. आणि दुसरा पर्याय म्हणजे दस्त निहायची माहिती भरून. तर ते कसे करायचे ते आता आपण पाहूया.
हे देखील वाचा: साठेखत म्हणजे काय | साठेखत करणे का आवश्यक असते?
मिळकत निहाय ची माहिती भरून दस्त कसा पाहायचा?
- आता आपल्याला एखाद्या गावातील रेकॉर्ड(Maharashtra Land Record) पाहायचा असल्याने इथं उर्वरित महाराष्ट्र पर्याय निवडायचा आहे.
- वर्ष निवडा. १९८५ पासून च्या खरेदी खतांचा, दस्तानचा रेकॉर्ड उपलब्ध आहे.
- पुढे जिल्हा, तहसील कार्यालय, आणि गाव निवडायचा आहे.
- त्यानंतर मिळकत क्रमांक टाकायचा आहे.( तुम्ही येथे सर्वे नंबर, मिळकत नंबर, गट नंबर किंवा प्लॉट नंबर टाकू शकता).
- पुढे दिलेल्या खात्यामध्ये कॅपच्या भरायचा आहे.(हिरव्या बॉक्समध्ये दिसणारे लेटर येथे भरा).
- जर तुम्हाला मिळकत नंबर माहिती नसेल तर तुम्ही Do you want to take name based search या पर्यायासमोर असलेल्या yes वर क्लिक करू शकतात. तेथे तुम्ही नाव टाकून सर्च करा.
- मिळकत क्रमांक टाकल्यानंतर शोधा किंवा सर्च या पर्यायावर क्लिक करा.
- पुढे खालच्या बाजूला तुम्हाला जुन्या दस्तानची माहिती दिसेल. यात दस्ताचा क्रमांक, प्रकार, कोणत्या तारखेला आणि कोणत्या कार्यालयात नोंदणी झालेली आहे, जमीन देण्याचा आणि घेणाऱ्याचं नाव तसेच किती क्षेत्रासाठी खरेदी झाली याचे संपूर्ण वर्णन दिलेला असेल.
- याच लाईन मधील शेवटच्या index2 पर्याया तुम्ही ते खरेदीखत डाऊनलोड करू शकतात.
हे देखील वाचा: मान्सूनची या तारखेपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याचे संकेत
दस्त निहाय ची माहिती भरून कसा पाहायचा?
- जर तुमच्याकडे मिळकत नंबर नसेल तर तुम्ही दस नंबर टाकून Maharashtra Land Record करू शकतात.
- त्यासाठी तुम्हाला दस्त निहाय या पर्यायावर क्लिक करून regular वर टिक करा.
- पुढे जिल्हा, दुय्यम निबंधक कार्यालय, वर्ष आणि दस्त क्रमांक टाकायचा आहे.
- पुढे त्याच्या टाकून सर्च किंवा शोधा वर क्लिक करा.
- आता खालच्या बाजूला दस्त क्रमांक, त्याचा प्रकार, किती तारखेला आणि कोणत्या कार्यालयात नोंदणी झाली, या व्यवहारातील जमीन लिहून घेणार आणि देणार कोण असे सर्व मालमत्तेचे वर्णन दिलेलं असेल.
- हा दस्त डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला index2 या पर्यायावर क्लिक करावे लागेल.