Kishori Shakti Yojana: नमस्कार मित्रांनो आज आपण नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना. महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी करत असते. त्यापैकीच आहे ही किशोरी शक्ती योजना. या योजनेअंतर्गत 11 ते 18 वर्ष वयोगटातील ग्रामीण, आदिवासी आणि नागरी क्षेत्रातील मुलींना अंगणवाडी सेविकांच्या मदतीने पोषण, आरोग्य विषयक दर्जा, स्वच्छता, अनौपचारिक शिक्षण प्रशिक्षण या विषयांवर संपूर्ण माहिती दिली जाते. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मुलींना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या प्रबळ बनवणे हे होय.
किशोरी शक्ती योजना (Maharashtra Kishori Shakti Yojana 2023):
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील आहेत त्यामुळे अशा कुटुंबांना कौटुंबिक गरजा पूर्ण करणे शक्य नसते. ते आपल्या मुलींचे आरोग्य त्यांचे शिक्षण तसेच त्यांना योग्य आहार देण्यास असमर्थ्य असतात. या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी किशोरी शक्ती योजना सुरू करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.
येथे या लेखांमध्ये किशोरी शक्ती योजनेची संपूर्ण माहिती दिलेली आहे ती तुम्ही पूर्ण नक्की वाचा. आणि तुमच्या क्षेत्रातील कोणतेही गरीब कुटुंब असेल ज्या कुटुंबातील मुली किशोरी शक्ती योजनेचा लाभ घेऊ शकतील त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा.. चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया किशोरी शक्ती योजनेचे उद्दिष्ट कोणते.
हे देखील वाचा: ऑफलाइन/ऑनलाईन पद्धतीने लिंक करा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी
Kishori Shakti Yojana महाराष्ट्र उद्दिष्टे:
- या योजनेअंतर्गत 11 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींचे पोषण आणि आरोग्य विषयक दर्जा सुधारण्याचा मुख्य उद्देश होय.
- किशोरवयीन मुलींना घरगुती तसेच व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायाच्या दृष्टीने सक्षम बनवणे हा उद्देश या योजनेमार्फत पूर्ण करण्यात येणार आहे.
- किशोरवयीन मुलींची निर्णय क्षमता वाढविणे.
- या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना आरोग्य, पोषण, कुटुंब कल्याण, गृह व्यवस्थापन, बाल संगोपन, व्यक्तिगत आणि परिसर स्वच्छता या विषयांचे शिक्षण देऊन त्यांना जागृत करणे व बालविवाह प्रतिबंध करणे हा उद्देश आहे.
महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेची काही मुख्य मुद्दे:
- सरकारने या योजनेला राज्याच्या अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, चंद्रपूर, भंडारा, धुळे, हिंगोली, जळगाव, लातूर, जालना, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी, रायगड, पुणे, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये लागू केलेली आहे.
- या महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेचे काम पूर्णपणे महिला आणि बाल विकास विभागाच्या निरीक्षणामध्ये अंगणवाडी केंद्राकडून केल जाईल.
- अंगणवाडी केंद्रांवरती प्रत्येक तीन महिन्यानंतर लाभार्थी किशोरी मुलींची आरोग्य तपासणी केली जाईल त्यासाठी त्यांचे आरोग्य कार्ड बनवले जाईल. या काळात त्यांची लांबी, वजन इत्यादींचा रेकॉर्ड ठेवला जाईल.
- राज्य सरकारकडून या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 3.8 करोड रुपये अनुदान दिले जाणार आहे.
- ही रक्कम अंगणवाडी केंद्रांमध्ये जे शिक्षण, पोषण, स्वास्थ्य कार्ड सारख्या सुविधांवर खर्च केला जाईल.
- या योजनेचे मुख्य उद्देश राज्यातील बीपीएल कार्डधारक परिवारातील 11 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरी मुलींना शारीरिक आणि मानसिक रूपाने स्वस्त बनवायचे आहे.
चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या किशोरी शक्ती योजनेची वैशिष्ट्ये काय आहे आणि लाभार्थी निवड कोणत्या निकषांवर आधारित आहे.
हे देखील वाचा: आम आदमी विमा योजनेसाठी पात्रता आणि फायदे | जाणून घ्या अर्ज प्रक्रिया मराठीमध्ये
किशोरी शक्ती योजनेची वैशिष्ट्ये:
- किशोरी शक्ती योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकार द्वारे करण्यात आलेली आहे.
- महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली राज्यातील मुलींसाठीही एक महत्त्वाची योजना आहे.
- या योजनेच्या माध्यमातून बीपीएल धारकपरिवारातील 11 ते 18 वर्ष वयोगटातील मुली ज्या स्कूल कॉलेज सोडून देतात अशा मुलींना शिक्षण, स्वास्थ्य, स्वच्छता, दैनंदिन जीवनात येणारे आव्हानांचा सामना करण्यासाठी आत्मनिर्भर आणि सशक्त बनवले जाईल.
- या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून प्रत्येक किशोर बालिकावर वर्षाचा 1 लाख रुपये खर्च करण्यात येईल.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मधून 18 किशोरी मुलींची निवड करून विभागीय पर्यवेक्षक, ए एन एम, आणि अंगणवाडी सेविकांत द्वारा प्रशिक्षण देण्यात येईल.
- महाराष्ट्राच्या महिला आणि बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी स्तरावर आयोजित होणारे किशोरी मेळावा आणि किशोरी आरोग्य शिबिर सारखे कार्यक्रमांमधून किशोरी मुलींना पौष्टिक आहार आणि वैयक्तिक स्वच्छता यावर विशेष प्रशिक्षण दिले जाईल.
- मुलींना एका वर्षात 300 दिवसासाठी 600 कॅलरी, 18 ते 20 ग्राम प्रोटीन आणि इतर पोषक घटक दिले जातील ज्यामुळे त्यांचा शारीरिक विकास होऊ शकेल.
- निवड केलेल्या मुलींना औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल.
- किशोरी मुलींना आरोग्य, पोषण, कुटुंब कल्याण, गृह व्यवस्थापन, बाल संगोपन, व्यक्तिगत आणि परिसर स्वच्छता बाबतीत प्रशिक्षण दिले जाईल.
- 16 ते 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मुलींना ज्यांनी शिक्षण सोडलेले आहे त्यांना स्वर रोजगार किंवा व्यवसाय साठी तयार केले जाईल.
हे देखील वाचा: मित्रांनो, तुम्ही जर एका मुलीचे पालक असाल तर ही माझी कन्या भाग्यश्री योजना तुमच्यासाठीच आहे
किशोरी शक्ती योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड:
- किशोरी शक्ती योजनेअंतर्गत प्रत्येक क्षेत्रातून 11 ते 18 वर्षे वयोगटातील एकूण वीस किशोरवयीन मुलींची सहा महिन्याकरता निवड करण्यात येईल
- त्यापैकी 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींची निवड दारिद्र्यरेषेखालील कुटुंब, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यामधून केली जाते.
- तसेच शाळा सोडलेल्या मुलींना प्राधान्य दिले जाते.
- या वयोगटातील तीन मुलींना अंगणवाडी केंद्राशी संलग्न ठेवण्यात येते तसेच त्यांना अंगणवाडीच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी केले जाते.
- ग्रामीण, आदिवासी आणि नागरिक प्रकल्पात सदर मुलींची निवड बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होते.
हे देखील वाचा: येथे क्लिक करून बघा लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना मिळणार 75 हजार रुपये
Kishori Shakti Yojana साठी पात्रता:
- अर्जदार किशोरी मुलगी महाराष्ट्र राज्यातील निवासी असणे आवश्यक आहे.
- 11 वर्षापासून ते 18 वर्ष वयोगटातील किशोरी मुली या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेण्यासाठी अर्ज करू शकतात.
- फक्त गरीब रेषेखालील म्हणजेच बीपीएल कार्डधारक परिवारातील मुली अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- या योजनेअंतर्गत स्वर रोजगार किंवा व्यवसाय शिक्षण मिळवण्यासाठी किशोरी मुली वय वर्ष 16 ते 18 वयोगटातील हव्या.
चला तर मित्र-मैत्रिणींनो आता आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
हे देखील वाचा: बांधकाम कामगार योजना फायदे कोणते?
महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- शाळेचे शैक्षणिक प्रमाणपत्र
- बीपीएल रेशन कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला( अनुसूचित जाती जमातीसाठी)
आता आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा त्याची पद्धत काय.
किशोरी शक्ती योजनेसाठी अर्ज कसा करावा:
या किशोरी शक्ती योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी किशोरी मुलीला कुठे जायची गरज नाही.
अंगणवाडी केंद्रातील सेविकांद्वारा पात्र किशोरी मुलींना ही योजना लागू केली जाईल. त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे:
- महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी केंद्रातील सेविका प्रत्येक घरी जाऊन महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना अंतर्गत पात्र असलेल्या किशोरी मुलींची निवड करण्यासाठी सर्वे करतील.
- सर्व निवड झालेल्या किशोरी मुलींची लिस्ट महिला आणि बालकल्याण विभागाकडे पाठवली जाईल.
- विभागाकडून निवड केलेल्या किशोरवयीन मुलींची तपासणी केली जाईल
- आणि जर विभागाकडून त्यांना योग्य समजल्या जाईल तर त्यांना या योजनेसाठी निवडण्यात येईल.
- नोंदणी झालेल्या किशोरवयीन मुलींना एक किशोरी कार्ड दिले जाईल. ज्याच्या माध्यमातून त्या या योजनेच्या मिळणारे सर्व लाभ घेऊ शकतील.
kishori shakti yojana, ksy yojana, किशोरी शक्ति योजना, kishori shakti yojana scheme