नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया एक नवीन योजना ती म्हणजे महाडीबीटी बियाणे वितरण अनुदान योजना. आपण या योजनेमध्ये समाविष्ट असलेले जिल्हे कोणते, कोणती पिके, पात्रता, आवश्यक असणारी कागदपत्रे, अर्ज कुठे आणि कसा करायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजचा ब्लॉग नक्की वाचा कारण राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पिकांसाठी औषधे बियाणे खते इत्यादीसाठी ऑनलाईन अर्ज महाडीबीटी वेबसाईट वरती सुरू आहेत.
चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या योजना अंतर्गत समाविष्ट असलेली पिके कोणती आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना लाभ होणार आहे.
केंद्र शासन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत समाविष्ट असलेली जिल्हे आणि पिके:
- राअसुअ भरड धान्य- मका: सांगली, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, नाशिक, धुळे, आणि जळगाव( एकूण सात जिल्हे)
- राअसुअ गहू: सोलापूर, बीड, नागपूर( एकूण तीन जिल्हे)
- राअसुअ तृणधान्य- ज्वारी, बाजरी, रागी: (एकूण 26 जिल्हे)
- राअसुअ कडधान्य: सर्व जिल्हे
- राअसुअ भात: सातारा, पुणे, नाशिक, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, आणि गडचिरोली (एकूण 8 जिल्हे)
- ऊस: (औरंगाबाद विभाग) औरंगाबाद, बीड, जालना
- कापूस: ( अमरावती विभाग) अमरावती, वाशिम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ
- बाजरी: नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, अहमदनगर,सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद( एकूण 11 जिल्हे)
- ज्वारी: धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, नांदेड, औरंगाबाद, बीड, जालना, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, व अमरावती( एकूण 23 जिल्हे)
- रागी: ठाणे( पालघर सह), नाशिक, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर( एकूण 7जिल्हे) आणि( लातूर विभाग) उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी, व हिंगोली
चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या योजनेसाठी आवश्यक असलेली पात्रता काय आहे.
हे देखील वाचा: कांदा चाळ अनुदान योजना, नवीन वर्षात कांदा चाळ 50 टक्के अनुदान योजना भरा घरबसल्या ऑनलाइन फॉर्म
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत बियाणे वितरण योजनेसाठी पात्रता:
- जर शेतकरी गहू, तांदूळ, डाळिंब, कापूस, व ऊस यापैकी कोणत्याही पिकासाठी अर्ज करत असेल तर वर दिलेले सर्व जिल्हे त्यासाठी अनिवार्य आहे.
- शेतकरी हा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील असणे आवश्यक आहे.
- ज्या शेतकऱ्याला या पीक योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे त्याच्या शेतात गणित धन्य ती असणे आवश्यक आहे व जर वृक्ष तेल बिया पिक यामधून लाभ घ्यायचा असेल तर त्याच्या शेतात तेलबिया पिके असणे आवश्यक आहे.
- जो शेतकरी हा अर्ज करत आहे त्याच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे.
चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊ या की या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत महाडीबीटी बियाणी वितरण योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करावा
हे देखील वाचा: प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान
महाडीबीटी बियाणी वितरण अनुदान योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करावा:
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करावा लागतो तो अर्ज कसा करायचा हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
- या वितरण अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटी च्या पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login
- या पेजवर तुम्हाला लॉगिन करायचे आहे तुम्ही आधी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- लॉगिन करण्यासाठी युजर आयडी, पासवर्ड टाका आणि लॉगिन वर क्लिक करा.
- पुढे एक पेज उघडेल, त्यात मुख्य पृष्ठ पेजवर अर्ज करा व क्लिक करा.
- या पेजवर तुम्हाला वेगवेगळी योजनेसाठी पर्याय दिसतील त्यातील “ बियाणे, औषधे व खते” या समोरील “बाबी निवडा” वर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
- पुढे एक नवीन अर्ज उघडेल. यात तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे. जसे की तालुका, जिल्हा, गाव/ शहर, सर्वे क्रमांक, क्षेत्र, आणि इतर. पुढे “जतन करा” या बटणावर क्लिक करा.
यानंतर
- यानंतर तुम्हाला सक्सेस(Success) असा मेसेज दिसेल. जर तुमचा अर्ज भरून पूर्ण झालेला आहे तर तुम्ही नाही वर क्लिक करा आणि नसेल आणि काही बदल करायचे असेल तर होय वर क्लिक करा.
- पुढे एक बॉक्स उघडेल त्यावर ok वर क्लिक करा.
- पुढे दोन पर्याय दिसतील “पहा” आणि ” मेनू वर जा”. आता आपल्याला जो अर्ज भरलेला आहे त्याला सादर करायचा आहे त्यासाठी “पहा” वर क्लिक करा.
- या पेजवर तुम्हाला तुम्ही ज्या बाबी निवडल्या आहेत त्या दिसतील. यामध्ये आपण पिकानुसार प्राधान्यक्रम लावू शकतो.
- या योजनेसाठीच्या अटी आणि शर्ती बॉक्सवर क्लिक करा आणि ” अर्ज सादर करा” क्लिक करा.
- जर तुम्ही 2021-22 मध्ये पेमेंट केलेले असेल तर तुमचा अर्ज डायरेक्ट सादर होईल आणि नसेल तर अर्ज सादर केल्यावर तुम्हाला पेमेंट साठी पर्याय दिसेल. “Make payment” वर क्लिक करा.
- तुम्हाला 23.60 पैसे इतके द्यावे लागेल, येथे तुम्हाला ज्या माध्यमातून अर्ज फी द्यायची आहे तो निवडा.
- पुढे माहिती दिसेल की आपण कशासाठी पेमेंट करत आहे. पुढे आपण निवडलेल्या माध्यमाची माहिती भरा आणि पेमेंट करा.
- एकदा पैसे भरले गेल्यानंतर तुम्हाला पैसे भरल्याची पावती मिळेल. तुम्ही तुमच्या पृष्ठवर जाऊन बघू शकतात.
आपण जाणून घेऊया या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती.
हे देखील वाचा: Sheli Palan Yojana: 20 शेळ्या 2 बोकड गट वाटप योजना शासन निर्णय
महाडीबीटीपी आणि वितरण अनुदान योजना 2023 साठी आवश्यक कागदपत्रे:
- अनुसूचित जाती-जमातीतील लाभार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- 7/12 उतारा
- 8 अ प्रमाणपत्र
- पूर्वसंमती पत्र
- हमीपत्र
Mahadbt portal login, MahaDBT Seed Applications, Mahadbt Portal Biyane Vitaran Yojana, Biyane Subsidy MahaDBT