MahaDBT  अंतर्गत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजनांसाठी अर्ज सुरू MahaDBT Farmer Schemes

MahaDBT Farmer Schemes

MAHADBT शेतकरी योजनेसाठी पात्रता(MAHADBT farmer schemes)

  • अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकर पेक्षा कमी शेत जमीन आहे त्यांनाच महाडीबीटी शेतकरी योजनेचा लाभ घेता येणार.
  • महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत जर शेतकऱ्याने अगोदरच कोणत्या अनुदानाचा लाभ घेतला असेल तर त्याला परत दुसऱ्या योजनेसाठी लाभ मिळणार नाही.
  • समजा एखाद्या शेतकऱ्याला फवारा योजनेमध्ये लाभ मिळालेला असेल तर त्याला परत दुसऱ्या योजनेसाठी लाभ घेता येऊ शकत नाही.
  • महाडीबीटी शेतकरी योजनांमध्ये फक्त शेतकरी च अर्ज करू शकतात, दुसऱ्या कोणाचाही अर्ज चालणार नाही.

महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार बियाणे अनुदान

या अनुदानामध्ये उन्हाळी हंगाम 2024 ते 2025 अंतर्गत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान मध्ये भुईमूग व तीळ पिकांसाठी शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वाटप शेतकऱ्यांना प्रशिक्षण व शेती शाळा हे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

महाडीबीटी पोर्टल वर ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केलेले असतील त्यांच्यापैकीच लाभार्थ्यांची निवड ही होणार.

भुईमूग पिकासाठी खालीलपैकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठीचे कृषी विभागाने आवाहन केलेले आहेत.

नाशिक, धुळे, पुणे, अहिल्यानगर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर

तसेच कृषी विभाामार्फत तीळ पिकासाठी खालीलपैकी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठीचे सरकारने आवाहन केलेले आहे.

जळगाव, बुलढाणा, बीड आणि लातूर

हे देखील वाचा: या योजनेत मिळू शकते शेतकरी पत्नीला २ लाख रुपयांची मदत

MAHADBT PORTAL वर अर्ज कसा करावा..?(Application for MAHADBT farmer schemes)

सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टलवर व्हिजिट करा त्यानंतर त्यामध्ये बियाणे औषधे खते या घटकांमध्ये “प्रमाणित बियाणे वितरण” या ऑप्शनवर क्लिक करून तेथून अर्ज करायचा आहे.

MAHADBT PORTAL –> बियाणे, औषधे, खते –> प्रमाणित बियाणे वितरण

लिंक: https://mahadbt.maharashtra.gov.in/Login/Login

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!