Mahadbt Farmer Portal Login: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन आलो आहोत. शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची योजना केंद्र सरकार व राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. जवळजवळ 45 पेक्षा जास्त योजना शेतकऱ्यांसाठी या 2023 वर्षात उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. योजनेअंत तुम्हाला जवळजवळ 40 % ते 100 % अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे.
या लेखामध्ये आपण सविस्तरपणे या योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या योजना राबविण्यात येत आहे आणि या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसे आणि कुठे करायचे. आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी अर्ज एक अनेक योजना, महाडीबीटी पोर्टल शासनाने सुरू केले आहे. गेल्या काही वर्षात या पोर्टलवर शेतकरी मित्रांना एकाच अर्जावर अनेक योजनांचा अर्ज करता येतो. चला तर मित्रांनो बघूया या योजना कोणत्या.
हे देखील वाचा: प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना|घरकुल योजना संपूर्ण माहिती
Mahadbt Farmer Portal Login
महाडीबीटी फार्मर पोर्टल ला लॉगिन करण्यासाठी काही सूचना दिलेल्या असतात. त्यामध्ये काही सूचना पुढील प्रमाणे आहेत.
- महाडीबीटी फार्मर पोर्टलला लॉगिन करण्यासाठी वर्तमान म्हणजे चालू असलेला मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डशी जोडलेला आहे की नाही याची आधीच खात्री करून घ्यावी.
- आपण रजिस्ट्रेशन करताना जो यूजर आयडी नोंद केलेला आहे तो लॉगिन करताना एंटर करावा. पुढे रजिस्टर करताना बनवलेला पासवर्ड पासवर्ड रकाण्यात मध्ये टाकावा. पुढे तुमच्यासमोर एक फोटो दिसेल त्याचे शब्द आहे ते शब्द त्या खालच्या रकान्यात भरा. हे सेक्युरिटी साठी राहतं. नंतर लॉगिन आयडी आणि पासवर्ड बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर लॉगिन बटन वर क्लिक करा.
- जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत असतानाचा पासवर्ड विसरला असल्यास तुम्ही “पासवर्ड विसरला” या बटनवर क्लिक करू शकता.
- आणि जर रजिस्ट्रेशन करतानाचा रजिस्ट्रेशन आयडी म्हणजेच युजर नेम विसरला असल्यास “ वापर करताना विसरला” यावर क्लिक करावे.
फळबाग लागवड अनुदान योजना 2024:
शेतकरी मित्रांनो आता फलोत्पादन यामध्ये तुम्हाला एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना- रफ्तार या अंतर्गत फळबाग लागवड तसेच फळ पिके लागवड त्यानंतर फुल, मसाले तिचे यासाठी ज्या काही योजना आहेत त्याचा लाभ तुम्हाला होणार आहे. फलोत्पादन अंतर्गत कांदा चाळ, फळबाग लागवड, शेडनेट, पॉलिहाऊस अशा विविध योजनांचा तुम्हाला लाभ मिळणार आहे.
हे देखील वाचा: विवाह नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती?
मधुमक्षिका पालन योजना 2024:
- आपल्या राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
- मधुमक्षिकेचे पालन व्यवस्थित केले आणि त्यापासून मिळणारा मध विकला तर
- 1 एकर शेतात ठेवलेल्या मधमाशांच्या पेट्यातून वार्षिक उत्पन्न 50 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत होऊ शकते.
- मधुमक्षिका पालन या योजनेअंतर्गत मधमाशी पालनासाठी सरकारकडून 2 ते 5 लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते.
- जर तुम्हाला मधुमक्षिका पालन योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
हे देखील वाचा: मधुमक्षिका पालन योजना फॉर्म, कागदपत्रे, पात्रता, माहिती वाचा
Mahadbt Farmer Portal: कृषी यांत्रिकीकरण योजना 2024:
या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विविध गोष्टींसाठी तुम्हाला अनुदान देण्यात येते जसे की ट्रॅक्टर, पॉवर टिलर, आणि इतर अवजारे किंवा यंत्रे. तसेच प्रक्रिया संच, बैलचलित अवजारे, मनुष्यचलित अवजारे, स्वयंचलित अवजारे, कापणी यंत्र व पेरणी यंत्र, रोटावेटर नांगर इत्यादी गोष्टींसाठी तुम्हाला या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत अनुदान मिळते. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि या योजनेबद्दल सविस्तर माहिती जसे की अर्ज कसा करायचा, लागणारी कागदपत्रे, पात्रता, लाभ, इत्यादी जाणून घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा(Mahadbt Farmer Portal Login).
हे देखील वाचा: कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरा
शेतकरी अनुदान योजना महाराष्ट्र:
- या कृषी अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध पर्याय देण्यात आलेले आहे.
- या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे, औषधे व खते, फलोत्पादन उत्पादन यासाठी अनुदान मिळते.
- जर तुम्ही ST,SC प्रवर्गातील शेतकरी असाल तर नवीन सिंचन विहीर, जुनी विहीर, बोरवेल,
- वीज जोडणी, ठिबक सिंचन, यासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येते.
- जर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
हे देखील वाचा: नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, बोरवेल साठी ऑनलाईन फॉर्म भरा
mahadbt farmer portal login, mahadbt farmer, अनुदान योजना, शेततळे अनुदान योजना 2023, शेतकरी अनुदान योजना 2022, नवीन विहीर अनुदान योजना, ठिबक सिंचन योजना, फळबाग अनुदान योजना, mahadbt farmer portal, mahadbt farmer portal login, maha dbt shetkari yojana