Mahabeej Biyane Price List 2023|महाबीज बियाण्यांच्या किमती जाहीर|पहा मूंग, सोयाबीन आणि संपूर्ण बियाण्यांच्या किमती: कोणती बॅग किती रुपयांना मिळेल?

Mahabeej Biyane Price List: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो, महाबीज बियाण्यांच्या किमती जाहीर झालेल्या आहेत आणि त्या किमती नेमक्या काय आहे हे आपण आजच्या लेखांमध्ये बघूया.

Mahabeej Biyane Price List

 महाबीजचे बियाणे रास्त दरानेच खरेदी करावे असे जिल्हा व्यवस्थापकांचे शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आलेले आहे. आता आपण जाणून घेऊया महाबीज अंतर्गत कोणकोणती बियाणे आहेत, जसे सोयाबीन व इतर सर्व बियाण्यास महाराष्ट्र बियाणे महामंडळ यांचे दर काय आहेत ही सर्व माहिती आपण जाणून घेऊया. वर्ष 2023 मध्ये महाबीज कडून पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Join Whatsapp Channel

Mahabeej Biyane Price List: महाबीज बियाणे दर यादी

 महाबीजचे बियाणे किंमतींची यादी नंदुरबार जिल्हा व्यवस्थापक बाळासाहेब कोटकर यांनी प्रसिद्धी पत्रकात केलेली आहे. बियाण्यांच्या किमती या बियाण्यांच्या वाणावर, त्यांच्या गुणवत्तेवर बियाण्यांच्या प्रकारावर, सोबतच वजनावर ठरवण्यात आलेले आहेत.आता आपण बघूया बियाण्याचे दर कसे असतील. बियाण्याचे नाव, बॅगची साईज आणि विक्री दर खालील प्रमाणे:

महाबीज बियाणे दर 2023:

सोयाबीन महाबीज बियाणे दर 2023

सोयाबीन महाबीज बियाणे दर 2023
सोयाबीन महाबीज बियाणे दर 2023
सोयाबीन महाबीज बियाणे दर 2023
  • जेएस-३३५, जेएस-९३०५, डीएस-२२८, एमऐयूएस-७१ या वाणाची ३० किलो बॅग चा दर २७३० रुपये असणार आहे.
  • फुले संगम, फुले किमया, MAUS-६१२, १६२ या वाणांची २० किलो ची बॅग चा दर ₹२०४० असेल.
  • एमएसीएस-११८८, AMCS 1281, maus158 या वाणांची ३० किलोची बॅग ₹३०६० ला मिळेल.

तुर बियाणे दर: Tur Seed Mahabeej Biyane Price List

तुर बियाणे दर: Tur Seed Price
तुर बियाणे दर: Tur Seed Price

बीडीएसन-७१६, फुले राजेश्वर पीकेव्ही तारा या वाणाचे २ किलो बॅग ३९० रुपये तर बीडीएन-७११, बीएसएमआर-७३६, मारुती, आयसीपीएस-८७११९ (आशा) या वाणांची २ किलो बॅग ३६० रुपयात मिळेल.

हे देखील वाचा: पहा येथे गाय म्हैस वाटप योजना mahabms शासन निर्णय

भात बियाणे दर: Rice Seed Price

भात बियाणे दर: Rice Seed Price
भात बियाणे दर: Rice Seed Price

इंद्रायणी- १० किलो बॅग साठी ६६० रुपये दर, २५ किलो बॅग साठी १६०० इतका भाव असेल. याचप्रमाणे कोईमतूर-५१ च्या २५ किलो बॅग साठी १०७५ रुपये इतका भाव असेल.

मूग बियाणे दर:

मूग बियाणे दर

उत्कर्षा, पीकेव्हीएम-४, बीएम-२००३-२ व इतर वाण- २ किलो बॅग ३६० रुपये तर ५ किलो बॅग ८७५ रुपये असा दर असेल.

उडीद बियाणे दर(Mahabeej Biyane Price List):

उडीद बियाणे दर

एकेयू १०-१ (बॅल्क गोल्ड), टीएक्यू-१ हे२ किलो बॅग ३५० रुपये दर, ५ किलो, ८५० रुपये असे असेल.

हे देखील वाचा: येथे क्लिक करा आणि पहा प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशी पहायची?

संकरित ज्वारी दर:

संकरित ज्वारी दर

सीएसएच-९, महाबीज-७, सीएसएच-१४, भाग्यलक्ष्मी-२९६ साठी ३ किलो चा दर ४२० रुपये असेल.

संकरित बाजरी दर:

संकरित बाजरी दर

महाबीज १००५- १.५ किलो- २४० रुपये तर सुधारित बाजरी- धनशक्ती- १.५ किलो, १६५ रुपये निश्चित करण्यात आला आहे.

नागली बियाणे दर:

नागली बियाणे दर

फुले नाचणी- १ किलो, ११० रुपये

संकरित सूर्यफूल दर:

संकरित सूर्यफूल दर

५०० ग्रॅम, १५० रुपये

Mahabeej Biyane Price List

याप्रमाणे बीज दर जाहीर झालेले आहे. सोयाबीन, तूर, मूग,  ज्वारी, बाजरी, उडीद या बियाण्यांचे दर महावीरच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे. त्यासोबतच या दरापेक्षा जास्त दराने विक्री करू नये असे आव्हान देखील महाबीज कडून करण्यात आलेले आहे. जर आपल्या भागात तुम्हाला आढळले की कुणी भाबीच्या दरापेक्षा जास्त दराने बियाणे विक्री करत आहे तर तुम्ही महावीर च्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकता.

हे देखील वाचा: शेतमाल तारण कर्ज योजना: असा घ्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा फायदा

त्यासोबतच आपल्या भागामध्ये काही  कृषी विभागाचे टास्क फोर्स निर्माण केले असेल तर त्या टास्क फोर्स  कडे किंवा कृषी  अधिकाऱ्याकडे याची माहिती तुम्ही देऊ शकता. चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन लेख सह. तुम्हाला खरंच आम्ही दिलेली माहिती फायदेशीर ठरत असेल तर आमच्या ब्लॉगला शेअर करत राहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा, धन्यवाद!

सोयाबीन बियाणे, Mahabeej Biyane Price List, Mahabeej soybean seeds, mahabeej seeds products, Mahabeej seeds price,  mahabeej tur seeds

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!