मागेल त्याला शेततळे योजना: नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण एक नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ती म्हणजे मागील त्याला शेततळे योजना. या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की शेततळे अनुदान योजनाचे उद्दिष्ट काय, लाभार्थ्यांची पात्रता कोणती, लागणारी कागदपत्रे, लाभार्थी कोणत्या निकष वर निवडले जातील, त्यांना कोणकोणत्या अटी लागू आहेत, अर्ज कुठे आणि कसं करायचं, अनुदान किती मिळणार इत्यादी सर्व घटकांची आपण माहिती घेणार आहोत.
शेततळे अनुदान योजनेचे उद्दिष्ट:
मित्रांनो गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे. त्याचबरोबर अवेळी पावसाची शक्यता वाढलेली आहे. त्यामुळे असे काही क्षेत्र आहे की जे कोरडवाहू आहे त्या क्षेत्रात पूर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर सोबतच उत्पादनावर विपरीत परिणाम होत असताना दिसून येत आहे. पावसात पडलेला खंड आणि पाणीटंचाईमुळे पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेततळे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. शेतीचे उत्पादन वाढण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे फार उपयुक्त ठरते. शेततळ्यामुळे राज्यातील पावसावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढते. व शा सि मान मह घटित परिस्थितीचा विचार करून हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे मागील त्याला शेततळे योजना जाहीर केली शेततळ्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात व नफ्यात वाढ होईल आणि नक्कीच शेततळे योजना ही शेतकऱ्यांना संजीवनी देखील ठरेल.
चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या मागेल त्याला शेततळे योजनेसाठी लाभार्थ्यांना पात्रता काय.
हे देखील वाचा: एक शेतकरी एक डीपी योजना 2023|ऑनलाईन अर्ज|शेतकऱ्यांची यादी जाहीर
मागेल त्याला शेततळे लाभार्थी पात्रता:
- ज्या शेतकऱ्याकडे त्याच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन उपलब्ध आहे, तो शेतकरी पात्र असेल.
- यापूर्वी इतर कोणत्याही योजनांच्या माध्यमातून शेततळे किंवा सामुदायिक शेततळे अथवा बोडी या घटकांचा लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन शेततळ्याकरिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे.
चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या मागेल त्याला शेततळे(magel tyala shettale yojana) योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड कोणत्या निकषावर केली जाईल.
मागेल त्याला शेततळे योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड कशी केली जाईल?
- लाभार्थी शेतकरी हा दारिद्र रेषेखालील( बीपीएल) असल्यास किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीची आत्महत्या झालेली असेल अशा कुटुंबाला म्हणजेच त्याच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठता यादी देऊन प्रथम प्राधान्याने त्याची निवड करण्यात येईल.
- या व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार प्रथम सादर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे सदर योजनेअंतर्गत निवड करण्यात येईल.
मित्रांनो आपण जाणून घेतलं की लाभार्थ्यांची निवड कशी केली जाईल काय पात्रता असणे आवश्यक आहे. आता आपण जाणून घेऊया की या शेततळे अनुदान योजनेअंतर्गत किती रक्कम देय असणार आहे.
मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेची देय रक्कम किती असणार?
मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या उपरोक्त नमूद आकारमानानुसार देय होणारी अनुदानाची रक्कम आयुक्त कृषी यांनी शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर त्वरित निश्चित करावी व त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना त्वरित निर्गमित कराव्यात तथापि अनुदानाची कमाल रक्कम रुपये 75 हजार इतकी राहील आणि जर पन्नास हजार रुपये पेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम संबंधित लाभार्थ्याने स्वतः खर्च करणे आवश्यक आहे. शेततळ्याच्या आकारमान खालील प्रमाणे.
हे देखील वाचा: मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना | ऑनलाइन अर्ज, आवश्यक कागदपत्रे व पात्रता, पहा संपूर्ण माहिती
मागेल त्याला शेततळे शेततळ्याचे आकारमान:
magel tyala shettale योजनेअंतर्गत खालील आकारमाना पैकी एका प्रकारची शेततळे घेण्यास उभा राहील.
आकारमान निहाय शेततळ्याचे पृष्ठभागावरील क्षेत्रफळ आणि अपेक्षित काम खालील प्रमाणे असणार आहे.
PDF डाउनलोड करा: इनलेट आऊटलेटसह शेततळे, इनलेट आऊटलेट विरवहत शेततळे व शेततळ्यास अस्तरीकरण
जास्तीत जास्त पाच शेतकऱ्यांचा गट करून एकत्रित रित्या त्यांना शेततळे घेता येईल. शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान व पाण्याचा वापर पाण्याची टक्केवारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर करा करून तो अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे. मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की शेततळे बांधण्यासाठी लाभार्थ्यांना कोण कोणत्या अटी लागू आहेत.
हे देखील वाचा: विहीर अनुदान योजनेसाठी असा करा अर्ज
मागील त्याला शेततळे योजनेअंतर्गत शेततळे बांधण्यासाठी लाभार्थ्यांना लागू असणाऱ्या अटी कोणत्या?
- कृषी विभागाने कृषी सहाय्यक यांना शेततळ्यासाठी निश्चित केलेल्या जागीच शेततळे बांधणे लाभार्थी शेतकऱ्याला बंधनकारक असणार आहे.
- कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून शेतकऱ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील.
- कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही.
- शेततळ्याची निगा राखण्याची तसेच वेळप्रसंगी दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांची असेल.
- लाभार्थ्याने स्वतःचा राष्ट्रीयकृत बँक किंवा इतर बँक मधील खाते क्रमांक संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक यांच्याकडे पासबुक झेरॉक्सहीत सादर करणे गरजेचे असणार आहे.
- लाभार्थ्याच्या सातबारा उतारावर शेततळ्याची नोंद करून घेणे बंधनकारक राहील.
- शेततळे पूर्ण झाल्यावर शेततळे योजनेचा बोर्ड लाभार्थ्याने स्वखर्चाने लावणे बंधनकारक असेल.
- शेताच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये वनस्पतीची लागवड करणे बंधनकारक असणार आहे.
- मंजूर आकारमानाचे शेततळे खोदणे बंधनकारक आहे.
- नैसर्गिक आपत्तीमुळे शेततळ्यास कोणत्याही प्रकारची हानी झाल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही. स्वखर्चाने करावा लागेल.
- इनलेट व आउटलेट विरहित शेततळी घेणाऱ्या लाभार्थ्याकडे शेततळ्यांमध्ये पाणी उचलून टाकण्याची आवश्यकता व त्या सर्व सुविधा असणे आवश्यक आहे
- तसेच अशा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी प्लास्टिक अस्तरीकरण स्वखर्चाने करावे लागेल.
मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे: (Document Required)
- जमिनीचा 7/12 उतारा
- 8 अ प्रमाणपत्र
- दारिद्र्य रेषेखालील कार्ड किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा वारसाचा दाखला
हे देखील वाचा: जमिनीचा नकाशा ऑनलाईन कशा पद्धतीने पहायचा?
शेततळे अनुदान योजना मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करावा? (How to apply)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी आपल्या जवळच्या महा- ई- सेवा केंद्र किंवा तालुका कृषी अधिकारी यांना भेट देऊन अर्ज सादर करावेत. तसेच या योजनेसाठी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
योजनेशी संबंधित महत्त्वाची संकेत स्थळे:
- magel tyala shettale yojana अधिकृत संकेतस्थळ: https://aaplesarkar.maharashtra.gov.in/
- अर्ज करण्यासाठी लॉगिन करण्यासाठी संकेतस्थळ: https://egs.mahaonline.gov.in/Site/Shetatale
मित्रांनो जर तुम्हाला या योजनेबद्दल माहितीची PDF हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान वैयक्तिक शेततळे अनुदान योजना:
केंद्र पुरस्कृत अन्नसुरक्षा अभियान वर्ष 2007-08 पासूनराबविले जात आहे. या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळे बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.
या योजनेचा लाभ देशातील अनुसूचित जाती जमातीचे लोक तसेच इतर शेतकरी देखील घेऊ शकतात.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान वैयक्तिक शेततळे अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टल ला भेट द्यावी लागेल आणि तेथे ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल.
अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क करावा.
हे देखील वाचा: किसान ट्रैक्टर अनुदान योजना PM Kisan Tractor Yojana – ऑनलाइन अर्ज कसा करावा
पोखरा अंतर्गत सामुदायिक शेततळे अनुदान योजना:
महाराष्ट्र शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत( पोखरा) सामुदायिक शेततळ्यासाठी अनुदान योजना सुरू केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात आणि नफ्यात वाढ होईल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल. दुष्काळामुळे होणाऱ्या पाणीटंचाईचा प्रश्न सुटेल. म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत जागतिक बँक अर्थ सहाय्यक संरक्षित पाण्याच्या साठवणीसाठी शेतकऱ्यांना सामुदायिक शेततळे अनुदान प्रकल्प राबविण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला सामुदायिक शेततळ्यासाठी शंभर टक्के अनुदान मिळणार आहे.
या पोखरांतर्गत सामुदायिक शेततळे अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी म्हणजेच डीबीटी महापौखरा या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल.
गट शेती अंतर्गत सामूहिक शेततळे योजना:
गट शेतीस प्रोत्साहन आणि सबलीकरण देण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये सामूहिक शेततळे योजनेचा ही समावेश आहे. सामूहिक शेततळ्यासाठी एक कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून शंभर टक्के अनुदान मिळणार आहे. तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून या घटकासाठी असलेले शंभर टक्के अनुदान मर्यादित जिल्ह्यांसाठी उपलब्ध असणार आहे.
हे देखील वाचा: प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभार्थ्यांची यादी कशी पहायची?
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेततळे अनुदान योजना:
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सिंचनाची क्षमता वाढविण्यासाठी शेततळे अनुदान योजना राज्यात राबविले जात आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेततळे योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत शेततळे अनुदानासाठी इच्छुक शेतकऱ्याला महाडीबीटी पोर्टल वर जाऊन अर्ज सादर करावा लागेल.
माहिती आवडल्यास शेअर नक्की करा. धन्यवाद!