(पोकराअंतर्गत) मधुमक्षिका पालन अनुदान योजना  2023 फॉर्म PDF | असा करा ऑनलाईन अर्ज

मधुमक्षिका पालन अनुदान योजना: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या लेखामध्ये मधुमक्षिका पालन योजना महाराष्ट्र 2023 ची माहिती बघणार आहोत.  तसेच या योजनेचे उद्दिष्ट काय, पात्रतेच्या अटी आणि शर्ती कोणत्या, फॉर्म कुठे आणि कसा भरायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज येथे जाणून घेणार आहोत.  जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर  हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. नक्की वाचा.

मधुमक्षिका पालन अनुदान योजना

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प( पोखरा)

हवामान मधला चा शेतीवर विपरीत परिणाम होत असतो आणि याच परिणामामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षापासून दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.  भूगर्भातील पाण्याचा साठा नष्ट होत आहे. परिणामी शेतीतील पिकांची उत्पादकता घटत आहे. पूर्णा नदीच्या खोऱ्यातील भूभाग हा निसर्गतः असल्याने शेतीसाठी सिंचनाची मर्यादा येत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्या उत्पादनावर याचा वाईट परिणाम होत असल्याचे दिसून येते. या वाईट परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

Join Whatsapp Channel

 जर शेतकऱ्यांनी मधमाशांचे पालन व्यवस्थित रित्या केले आणि त्यातून मिळणारा मध विकला तर एक एकर शेतात ठेवलेल्या मधमाशांच्या पेट्यातून वार्षिक उत्पन्न 50 ते 60 हजार रुपयांचे होऊ शकते. मध हे अतिशय पौष्टिक शक्तीदायक तसेच औषध म्हणून वापरले जाते. मधा व्यतिरिक्त पोळ्यातून निघणारे मेन हे सौंदर्यप्रसाधने आणि औद्योगिक  उत्पादनासाठी एक घटक म्हणून देखील वापरले जाते. मधमाशांच्या होणाऱ्या परागीकरण मुळे उत्पादनात चांगल्या प्रमाणात वाढ होते.  तर मित्रांनो आपण जाणून घेतलं की मधुमक्षिका पालनाचे काय फायदे आहेत आता आपण जाणून घेऊया मधुमक्षिका पालन योजनेचे उद्दिष्ट कोणते.

हे देखील वाचा: कुक्कुटपालन अनुदान योजना 2023 महाराष्ट्र | कोंबडी फार्म सुरू करण्यासाठी मिळणार 25 लाख रुपये पर्यंतचे अनुदान|अर्ज सुरू

मधुमक्षिका पालन योजना उद्दिष्ट कोणते?

  •  या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या गाव समूहात मधुमक्षिका पालन भूमिहीन व्यक्ती किंवा शेतकऱ्यांना पूरक उत्पादन मिळवून देणे हा या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  •  ग्रामीण भागात मधुमक्षिका पालन व्यवसायासाठी चालना मिळणे.
  •  मधुमक्षिका पालनाद्वारे शेतकऱ्यांना एक पूरक व्यवसाय उपलब्ध करून देऊन उत्पन्न मिळवून देण्यासाठी तसेच रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी मधुमक्षिका पालन या योजनेचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत समावेश करण्यात आला आहे.

 मित्रांनो आपण जाणून घेतली की या योजनेचे उद्दिष्ट कोणते.

आता आपण जाणून घेऊया मधुमक्षिका पालन योजनेसाठी लाभार्थी निवडीचे निकष व पात्रता कोणती.

हे देखील वाचा: पोकरा लाभार्थी यादी कशी तपासायची?

मधुमक्षिका पालन योजना लाभार्थी निवडीची अट व पात्रता  काय?

या प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या  गावांसाठी कृषी संजीवनी समितीने लाभार्थ्यांची निवड करताना भूमिहीन व्यक्ती, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यामधील अनुसूचित जाती-जमातीतील, दिव्यांग, महिला तसेच सर्वसाधारण शेतकरी  या प्राधान्यांना लाभार्थी म्हणून निवडण्यात येणार आहे.

मधुमक्षिका पालन लाभार्थ्यांना अर्थसाहाय्य किती मिळेल?

मधुमक्षिका पालन करणाऱ्या शेतकऱ्याला खालील प्रमाणे आर्थिक सहाय्य मिळेल.

तपशीलदरएकूण खर्च (कमाल 50 संचासाठी) रुपये
मधुमक्षिका वसाहत2000/- रुपये प्रती मधुमक्षिका वसाहत (4 खणांची चौकट, राणीमाशीसह मधमाशांचे पोळे)1,00,000/-
मधुमक्षिका पेटी ( स्टॅडर्ड मधुमक्षिका पेटी)2000/- रुपये स्टॅडर्ड मधुमक्षिका पेटीकरिता1,00,000/-
मध काढणी यंत्र व फूड ग्रेड मध कंटेनर20,000/- रुपये प्रती युनिट प्रमाणे20,000/-
मधमाशांसह मध पेटी स्तलांतरण (एक वर्षामध्ये दोनवेळा)प्रती वसाहत स्थलांतर खर्च रक्कम रुपयांमध्ये, A) जिल्ह्यांतर्गत: 150 /-रुपये (50 x 150 x 2) संचासाठी, B) राज्यांतर्गत: 150/- रुपये (50 x 200 x 2) संचासाठी, C) राज्याबाहेर: 250/-रुपये (50 x 250 x 2) संचासाठीA)15,000/- B) 20,000/- C ) 25,000/-
जिल्ह्यांतर्गत वसाहत स्थलांतर खर्चासह2,35,000/- रुपये
राज्यांतर्गत वसाहत स्थलांतर खर्चासह2,40,000/- रुपये
एकूणराज्याबाहेर वसाहत स्थलांतर खर्चासह2,45,000/- रुपये

तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा.

हे देखील वाचा: कांदा चाळ अनुदान योजना, नवीन वर्षात कांदा चाळ 50 टक्के अनुदान योजना भरा घरबसल्या ऑनलाइन फॉर्म

 मधुमक्षिका पालन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा आणि कुठे करायचा?

  • ज्यांना मधुमक्षिका पालन योजनेचा लाभ घ्यायचा असेल अशा लाभार्थ्याने प्रकल्पाच्या महा पोखरा अधिकृत वेबसाईटवर जा.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन मागणी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे करावी.
  • सोबत खरेदी डेकांच्या मूळ प्रति तसेच खरेदी समितीचे प्रमाणपत्र लाभार्थ्याने ताच्या सही सोबत ऑनलाईन अपलोड करावे.
  • निवडलेल्या लाभार्थ्यांनी खरेदी समितीच्या उपस्थितीत मधुमक्षिका वसाहत संच व मध काढणी यंत्र इत्यादींची खरेदी करणे अनिवार्य आहे.
  • पूर्वसंमती मिळाल्यापासून मधुमक्षिका संशोधन व इतर आवश्यक बाबींची खरेदी एक महिन्याच्या आत करून ऑनलाईन अनुदान मागणी करावी.
  • मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा: दोन दुधाळ गाय/म्हैस वाटप योजनेचा शासन निर्णय

मधुमक्षिका संच योजनेच्या अटी व शर्ती कोणत्या?

  •  एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  •  मधुमक्षिका पालनासाठी आवश्यक व इतर व्यवस्था लाभार्थ्याला स्वतः करावी लागेल.
  •  मधुमक्षिका पालन घटकांतर्गत मधुमक्षिका पालनाची आवश्यकते प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
  •  लाभार्थ्यांनी किमान मधुमक्षिका पालन हा व्यवसाय तीन वर्षे करणे आवश्यक आहे.
  •  या घटकास नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा च्या वेबसाईटवर ग्रामसभा कार्यालयातील नोटीस बोर्ड इत्यादी द्वारे व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी.

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!