Lumpi Virus: मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात गुडगुडीत त्वचारोग सपाट्याने पसरत चालला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये ढेकूण रोगाने 500 पेक्षा जास्त जनावरे दगावली आहेत. लम्पी रोग किंवा एलएसटी हा गाई आणि म्हशींचा संसर्गजन्य रोग आहे. मानवासाठी हा रोग संक्रमित नाहीत पण गुरांच्या मृत्यूच्या दरामध्ये गंभीर प्रमाणात वाढ होत आहे.
आतापर्यंत एकूण 571 जनावरांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
या लम्पी व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 366 पेक्षा अधिक लोकांना 413 पेक्षा अधिक पशुधन उपलब्ध करून दिले आहे. मात्र शेतकरी अद्यापही शासनाकडून नुकसान भरपाईच्या रकमेच्या प्रतीक्षेत वाट पाहत आहे.
- शेतकरी मित्रांनो अजूनही काळजी घेणे आवश्यक आहे कारण आजार झपाट्याने वाढत आहे.
- शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात मोफत उपचार आणि लस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
- लम्पी रोगाचे विषाणू पसरण्याची सुरुवात मार्च 2023 मध्ये झाली होती.
- या जनावरांना लस देण्यात आलेली आहे त्यामध्ये या रोगाची कोणतेही लक्षणे दिसली नाहीत.
- ग्रामपंचायत 1 हजार 167 गोशाळांमध्ये कीटकनाशकाची फवारणी केली गेली आहे. सरकारने काही प्रतिबंधक उपायही केले आहे.
- महाराष्ट्र राज्यात अहमदनगर, धुळे, पुणे, लातूर, अकोला, औरंगाबाद, सातारा, बीड, अमरावती, बुलढाणा, उस्मानाबाद आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील 133 गावांमध्ये हा आजार पसरला आहे.
- या आजाराचे संसर्गजन्य विषाणू आहेत ज्यामुळे गुरांच्या त्वचेवर गुठळ्या होतात.
- या आजाराच्या लक्षणांमध्ये ताप येणे, दूध कमी होणे, त्वचेवर गुठळ्या होणे, डोळे आणि नाकातून पाणी येणे अशा काही लक्षणे दिसतात.
- घाबरण्याची गरज नाही मित्रांनो या आजारावर उपचार संभव आहे.
हे देखील वाचा: नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये
Lumpi Virus: पशुपालकांची चिंता वाढली
खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना जनावरांना लम्पीची लागण होत असल्याने पशुपालकांची चिंता मात्र वाढलेली दिसत आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र सोबत देशातील अनेक भागांमध्ये जनावरांना लम्पी रोगाची मोठ्या प्रमाणावर लागण झाल्याचे समोर आले होते. या रोगामुळे हजारो जनावरांचा मृत्यू झाला होता.
लम्पी रोगाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनावरांच्या लसीकरणाची मोहीम हा त्यात घेण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा या रोगाची लक्षणे दिसण्यास सुरुवात झाल्यामुळे पशुपालकांची चिंता मात्र वाढलेली आहे.
लसीकरण न झालेल्या जनावरांमध्ये प्रादुर्भाव
- राज्यात Lumpi Virus च्या नियंत्रणासाठीजनावरांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरणात करण्यात आले होते.
- त्यानंतर रोग नियंत्रणात आल्याचा दावाही केला जात होता.
- परंतु गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध भागात जनावरांमध्ये पुन्हा या रोगाची लक्षणे आढळून येत आहेत.
- काही ठिकाणी तर या रोगामुळे जनावरांचा मृत्यू झाला आहे.
- मागच्या वर्षी आलेल्या लम्पी च्या पहिल्या लाटे दरम्यान लातूर जिल्ह्यातील अनेक भागात जनावरांच्या लसीकरणाची मोहीम ला राबवण्यात आली होती.
- यावर्षीच्या मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील काही भागांमध्ये जनावरामध्ये लम्पी चा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.
- ज्या जनावरांना लसीकरण दिलेले आहे त्यांच्यामध्ये ह्या रोगाचे लक्षण आढळत नाही आहे.
- मात्र लसीकरण न झालेला जनावरे लम्पी रोगामुळे मृत्युमुखी पडत आहे, ज्यामध्ये वासरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
हे देखील वाचा: Post Office Gram Suraksha Scheme
Lumpi Virus: शिरूर अनंतपाळमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येतोय
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ मध्ये जनावरांना लम्पी सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर पासून शिरूर अनंतपाळ मध्ये 702 जनावरांमध्ये लम्पी रोगाची लागण झालेली असून यापैकी 64 जनावरांचा मृत्यू झालेला आहे.
योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे 537 जनावरे आजारातून बरे झालेले आहेत. अद्यापही 101 जनावरांवर उपचार सुरू आहे.
मित्रांनो लंबी व्हायरस पासून तुमच्या जनावरांचा बचाव करण्यासाठी तुम्हाला वर दिलेल्या प्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांना वेळेत लस देणे सुद्धा गरजेचे आहे.
Lumpi Virus Treatment, Lumpi Virus Vaccine, LumpiLumpy Skin Disease Virus, lumpy skin disease, Lumpy virus in maharashtra treatment, Lumpy virus in maharashtra treatment guidelines