Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजना ही योजना 1 जुलै 2024 पासून सुरुवात झालेली आहे आणि या या योजनेअंतर्गत ज्या महिलांचं वय 21 ते 60 वयोगटातील आहे त्या प्रत्येक महिला विवाहित महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते. अर्ज करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर नारीशक्ती दुत हे ॲप डाऊनलोड करायचं. आणि या ॲपवरून सुद्धा स्वतः लाभार्थी फॉर्म भरू शकतात.
हे देखील वाचा: अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणीकडून पैसे परत करण्यास सुरुवात
त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका असेल मुख्य सेविका असेल ग्रामसेवक असतील ग्रामपंचायत मध्ये ऑपरेटर असतील वार्ड मेंबर असतील त्यांच्यामार्फत सुद्धा आपण या या योजनेचा फॉर्म भरू शकता. या योजनेसाठी महत्त्वाची अट अशी आहे की त्या महीलेच वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावं आणि ती महाराष्ट्राची रहिवासी असावी. त्यासाठी त्यांना उत्पन्नाचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र ह्या दोन आवश्यक अटी आहेत. तर ते त्यांनी लवकरात लवकर तहसील कार्यालयातून काढून घेऊन या योजनेसाठी त्या ॲपद्वारे फॉर्म भरावा या योजनेसाठी शासनाने एक जुलैपासून योजना सुरू झालेली आहे.
हे देखील वाचा: प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने असा करा अर्ज
तर या योजनेसाठी शासनाने टाईम टेबल दिलेला आहे. एक जुलैपासून योजना सुरू झालेली आहे तर 15 जुलै पर्यंत जे लाभार्थी या योजनेसाठी फॉर्म भरणार आहेत त्या लाभार्थ्यांवर त्या लाभार्थ्यांना आपण लाभ देणार आहोत त्यानंतर ही प्रक्रिया सतत असणारे परंतु 15 जुलै पर्यंतचे लाभार्थी फॉर्म भरले जातील त्यांच्यावर आपण आधी प्रक्रिया करून 14 ऑगस्ट पर्यंत आपण त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा अशा प्रकारची ही योजना आहे सर्व महिलांनी योजनेचा लाभ अवश्य घ्यावा.
हे देखील वाचा: लेक लाडकी योजना महाराष्ट्र|मुलींना मिळणार 75 हजार रुपये: असा करा अर्ज
Ladki Bahin Yojana अटी कोणत्या?
- अडीच लाखापेक्षा कमी असणं अडीच लाखापेक्षा जास्ती नसावं हा त्याच्यातला अतिशय महत्त्वपूर्ण निकष आहे.
- दुसरी याला अट आहे की ते महाराष्ट्र राज्याचे नागरिक असले पाहिजेत त्याच्यामुळे ती एक महत्त्वपूर्ण अट आहे.
- त्याच्यानंतर तिसरी ते कुठलेही शासकीय कर्मचारी याच्यातून त्यांना कुठलेही मानधन किंवा नोकरी ही त्यांना नसावी.
- ज्या महिलांचं वय 21 ते 60 वयोगटातील आहे अश्या विवाहित महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते