
अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणीकडून पैसे परत करण्यास सुरुवात
अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणीकडून आता पैसे परत करण्यास आता सुरुवात झाल्याचे आता बघायला मिळत आहे… पुणे जिल्ह्यातील महिला पैसे परत करण्यास आघाडीवर आहेत. पुण्यातून 75 हजार महिलांकडून पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. महिला व बाल विभागाकडून नवीन लेखाशीर्ष तयार करण्यात आले आहे. चलनाद्वारे पैसे परत करण्याची सुविधा आता उपलब्ध झाल्याचे बघायला मिळत आहे.
पुणे जिल्ह्यातील महिला पैसे परत करण्यात आघाडीवर
ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणीकडून पैसे परत करायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये जो पुणे जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील ज्या महिला आहेत त्या महिला पैसे परत करण्यात आघाडीवर असल्याची माहिती देखील सध्या समोर येत आहे. पुण्यातून जवळपास 75 हजार महिलांकडून पैसे परत करण्याची ही प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे. अपात्र अर्जांची सध्या पडताळणी सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासून ही अर्जांची पडताळणी सुरू आहे आणि ज्याच्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्याकडून पैसे परत करण्यास सुरुवात झाल्याच बघायला मिळत आहे
या ५ लाख लाडक्या बहिणी अपात्र कश्या ठरल्या ???
लाडकी बहीण योजनेसंदर्भात दिनांक 28 जुलै आणि ३ जून रोजी आलेल्या नवीन शासन निर्णयानुसार नवीन निकष या योजनेमध्ये लागू करण्यात आले. त्यानुसार अर्जांची छाननी ही शासन पातळीवर व घरोघरी ही सुरू झालेली आहे. महिला व बालविकास कल्याण मंत्री अदिती तटकरे अशी हि माहिती दिलेली आहे कि जवळपास ५ लाख महिला ह्या योजनेत अपात्र ठरलेल्या आहेत. साधारणतः २ कोटी ६० लाख महिलांनी ह्या योजनेसाठी अर्ज केलेला होता, त्यापैकी २ कोटी ३४ लाख महिलांनी ह्या योजनेचा लाभ मिळालेला होता. आता जशी जशी पडताळणी होत आहेत तशी हळू हळू लाभार्थी देखील कमी होत आहेत.
५ निकष लागू करण्यात आलेले, त्यानुसार आता शासन पातळीवर आणि घरोघरी जाऊन आत अर्जाची पडताळणी सुरु करण्यात आलेली असून फेरविचार करून त्यांचे अर्ज बाद केले जात आहेत व त्यांना अपात्र ठरवले जात आहेत.
खालील बाबी नुसार महिला लाडकी बहीण योजनेतून होतील अपात्र
- विविध सरकारी योजना आहेत ज्यांचा लाभ महिला घेत असतील त्यांना देखील ह्या योजनेतून अपात्र ठरवले जात आहेत.
- ज्याचें उत्पन्न २.५ लाख आहेत त्यांना देखील अपात्र केले जात आहे.
- ज्यांच्या घरी ४ चाकी आहे त्यांना सुद्धा अपात्र केले जात आहे.
- ज्यांना सरकारी नोकरी असेल किंवा घरात कोणालाही सरकारी नोकरी असेल तर त्यांना सुद्धा अपात्र केले जाईल.