अर्ज सुरू! कुसुम सोलर पंप योजना 2024 महाराष्ट्र Online Registration ची संपूर्ण माहिती

Kusum Solar Pump Yojana Online Registration: नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी खुशखबर आहे कुसुम सोलर पंप योजना 2020 साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन पोर्टल उघडण्यात आलेले आहे. आज आपण येथे ऑनलाइन पद्धतीने कुसुम सोलर भेटण्यासाठी अर्ज कसा करायचा आणि कुठे करायचं ते पाहणार आहोत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल म्हणजेच कुसुम सोलर पंप मिळवायचा असेल तर हा लेख पूर्ण वाचा. 

Join Whatsapp Channel

कुसुम सोलर पंप योजना अपडेट(Kusum Solar Pump Yojana Online Registration Update):

Kusum Solar Pump Yojana

राज्यातील महा कृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम घटक योजनेच्या पुढील टप्प्या अंतर्गत चौक कृषी पंप करता  महाऊर्जेच्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल दिनांक 17 मे 2023 रोजी पासून सुरू करण्यात आलेला आहे.  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेती क्षेत्रानुसार आणि इतर पात्रतेच्या अटीनुसार 3, 5 आणि 7.5 एचपी डीसी क्षमतेचा कृषी पंप मिळवता येतो. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महा ऊर्जा पोर्टलवर अनेक शेतकरी बांधवांचा अर्ज करण्याच्या गर्दीमुळे हे पोर्टल हळूहळू काम करत आहे तर जर तुम्हालाही अर्ज करायचा असेल तर तुम्ही रात्रीच्या वेळी हे पोर्टल वापरा. अर्ज भरताना वेळोवेळी पोर्टल चालू आहे की नाही हे चेक करत रहा आणि फॉर्म भरून  घ्या.

हे देखील वाचा: येथे क्लिक करून कुसुम सोलर पंप योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता, अटी, लाभ आणि अर्ज फी पहा.

PM कुसुम सोलर पंप योजना 2024 महाराष्ट्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे?

सोलर पंप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल.

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

  •  या वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर गेल्यानंतर तुम्हाला तिथे सर्व डिटेल विचारली जाईल ती सर्व माहिती व्यवस्थित भरायचे आहे.
  • तुमच्याकडे डिझेल पंप आहे की नाही असेल तर हो नसेल तर नाही म्हणा.
  • त्याचबरोबर इतर माहिती जसे कीआधार कार्ड क्रमांक, गाव, जिल्हा, तालुका, मोबाईल नंबर अशी सर्व माहिती भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
  • तुम्ही उजव्या कॉर्नर मध्ये दिलेल्या “Safe Villeges List” वर क्लिक करून तुमच्या गावाचे नाव चेक करू शकतात.

Pm कुसुम योजना महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पद्धत:

कुसुम सोलर पंप योजना

मित्रांनो, कुसुम योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला महाऊर्जा अभियानाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल यानंतर तुमच्यासमोर एक नवीन होमपेज उघडेल.

येथे तुम्हाला सर्वप्रथम या योजनेअंतर्गत तुमचे  गाव पात्र आहे की नाही हे पहावे लागेल.

यासाठी तुम्ही पेजवर उजव्या साईडला असलेल्या सेफ विलेज लिस्ट या पर्यायावर क्लिक करू शकता.

या लिस्टमध्ये तुम्हाला तुमच्या गावाचे नाव पहावे लागेल.

येथे जर तुमच्या गावाचे नाव असेल, तर तुम्ही डिझेल पंप नाही हा पर्याय निवडून अर्जाची पुढील प्रक्रिया सुरू करू शकता.

 जर या लिस्टमध्ये तुमच्या गावाचं नाव नसेल तर डिझेल पंप वापरत असल्याचा पर्याय निवडून त्यासाठी या योजनेचा अंतर्गत अर्ज करू शकता.

हे देखील वाचा: अमेरिकेतील या 2 व्यक्तींनी बनविलेले मायक्रो सोलर पंप भारतातील शेतीसाठी असा ठरतोय उपयुक्त

Kusum Solar Pump Yojana अंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करण्यासाठी स्टेप्स:

जर तुम्हाला पीएम कुसुम योजना अंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून अर्ज करू शकतात.

  • सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र पीएम कुसुम योजना नोंदणी लिंक वर क्लिक करावा लागेल.
  •  पुढे उघडलेल्या पृष्ठावर दिलेली सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. नवीन किंवा बदली डिझेल पंपासाठी विनंती( जर नसेल तर)
  •  यानंतर तुम्हाला जेथे की तुमची जमीन आहे, तो तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडावा लागेल.
  • पुढे पेजवर तुमचा मोबाईल नंबर टाका, पुढे दिलेल्या रकान्यात तुम्हाला जाती संबंधित माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमचा ईमेल आयडी टाका.
  • यानंतर पुढील पेजवर तुम्हाला नोंदणीसाठी शंभर रुपये ऑनलाईन फी जमा करावी लागेल.
  • आता तुमच्या मोबाईलवर युजरनेम आणि पासवर्ड पाठवला जाईल, ज्याचा वापर करून तुम्ही पोर्टलवर लॉगिन करू शकता
  • त्यानंतर मार्गदर्शक सूचनानुसार तुम्हाला कागदपत्रे अपलोड करून पुढील प्रक्रिया करावी लागेल.

ऑनलाइन सोलर पंप रजिस्ट्रेशन maharashtra,www mahaurja com kusum registration, kusum yojana subsidy, kusum solar pump yojana 2023, kusum mahaurja solar pump registration, mahadiscom solar kusum, mahaurja kusum registration, mahaurja solar pump apply online

1 thought on “अर्ज सुरू! कुसुम सोलर पंप योजना 2024 महाराष्ट्र Online Registration ची संपूर्ण माहिती”

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!