kisan vikas patra interest rate 2024 |  जाणून घ्या पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्रावर किती टक्के व्याज मिळते?

मित्रांनो, किसान विकास पत्र ही भारत सरकारची एक योजना आहे ज्या योजनेअंतर्गत पैसे एकत्र गुंतवावे लागतात. आणि एका निश्चित कालावधीमध्ये तुमचे गुंतवलेले पैसे दुप्पट होतात. Kisan vikas patra  योजनेअंतर्गत kisan vikas patra interest rate 2024 काय आहे ते आपण येथे जाणून घेणार आहोत.

हे देखील वाचा: kisan vikas patra double in how many months?

किसान विकास पत्र

पोस्ट ऑफिस तर्फे विविध योजना चालविल्या जात असतात. या योजना काही पेन्शन योजना, गुंतवणूक योजना, फिक्स रिटर्न योजना अशा योजनांचा समावेश असतो. पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित असते. असेच एक योजना आहे किसान विकास पत्र योजना. किसान विकास पत्र योजनेतील पैसे 115 महिन्यात म्हणजे दहा वर्ष तीन महिन्यांमध्ये दुप्पट होत असतात.

 या योजनेअंतर्गत जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुमचे किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक. तो व्यक्ती भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. तुम्ही जॉईंट खातं आणि एकल खातं असं दोन्ही खात्यासाठी ही योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत तुम्ही 1000 रुपये, 5000 रुपये, तसेच 50 हजार रुपयांची प्रमाणपत्र घेऊ शकतात.

हे देखील वाचा: बघा पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम संपूर्ण माहिती

kisan vikas patra interest rate 2024

किसान विकास पत्र या योजनेअंतर्गत सध्या 7.5% एवढे वार्षिक व्यास मिळत आहे.  हा दर पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षाच्या मुदत ठेव योजनेच्या बरोबरीचा आहे. सध्याच्या दरानुसार kisan vikas patra  या योजनेतील पैसे 115 महिन्यांमध्ये म्हणजे दहा वर्ष तीन महिन्यांमध्ये दुप्पट होत आहेत.

 केंद्र सरकारने किसान विकास पत्रावरील व्याज एक एप्रिल 2023 पासून वार्षिक 7.2 टक्क्यांवरून 7.5 टक्के एवढे केले आहे. म्हणजे सध्या या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज 7.5 टक्के एवढे आहे.

 जर तुम्ही या योजनेअंतर्गत गुंतवणूक केली तर मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला कर भरावा लागेल. आयकर कायद्याच्या कलम 80C नुसार तुम्हाला या योजनेत जमा केलेल्या पैशावर कोणताही कर लाभ मिळत नाही.

हे देखील वाचा: Post Office mis interest rate 2024 | पोस्ट ऑफिस योजनेअंतर्गत किती रुपये कमवू शकता?

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!