कांदा चाळ अनुदान योजना|कांदा चाळ साठी 50% अनुदान|असा भरा ऑनलाइन फॉर्म घरबसल्या

कांदा चाळ अनुदान योजना: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका नवीन  योजनेबद्दल जाणून घेणार आहोत ती म्हणजे कांदा चाळ अनुदान योजना 2023.  आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेऊया की या योजनेचे उद्दिष्ट काय आहे,  या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो,  त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती,  किती अनुदान मिळते, लाभार्थी निवडण्याची पात्रता काय, अर्ज कुठे आणि कसा करायचा.  चला तर आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

Join Whatsapp Channel

 कांदा चाळ अनुदान योजना 2023:

आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.  सर्वसाधारणपणे शेतकरी कांदा जमिनीवर पसरवून किंवा स्थानीरित्या तयार केलेल्या  चाळी मध्ये कांदा पिकाची साठवणूक करतात.  या  या पद्धतीमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते जसे की कांद्याची प्रत आणि टिकाऊ पणा यावर देखील विपरीत परिणाम होतो. 

कांदा चाळीच्या उभारणीमुळे कांद्याची क्वालिटी राखल्या जाते आणि तो कांदा दीर्घकाळ टिकण्याची शक्यता असते.  याचा डायरेक्ट परिणाम शेतकऱ्याच्या नफ्यावरती होतो,  त्याला आधीच्या पद्धतीपेक्षा या कांदा चाळीच्या पद्धतीमुळे अधिक नफा मिळू लागतो.  म्हणूनच कांदा चाळ उभारणीकडे शेतकऱ्याचा कल हा जास्त प्रमाणात दिसून येत आहे.

kanda chal anudan online application

 kanda chal anudan yojana 2023 अनुदान किती?

 या योजनेअंतर्गत कांदा चाळीसाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य म्हणून 5, 10, 15, 20  आणि 25  मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या 50% व कमाल 3500 रुपये  प्रति मॅट्रिक टन या  क्षमतेनुसार अर्थसहाय्य दिले जाते.

 चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया या कांदा चाळ अनुदान योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे.

हे देखील वाचा: सिलेंडरवर मिळतोय 50 लाख रुपयांचा लाभ|कोणाला आणि कसा

 कांदा चाळ अनुदान योजना 2020 उद्दिष्टे कोणती?

  • कांदा चाळ उभारल्याने शेतकऱ्याला कांद्याच्या  साठवणुकीत होणारे नुकसान कमी होईल आणि अधिक नफा मिळवता येईल.
  • हंगामानुसार कांद्याची आवक वाढून कांद्याचे भाव कोसळतात तसेच हंगामाव्यतिरिक्त कांद्याचा तुटवडा कडून कांद्याचे भाव अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढतात अशा समस्येवर नियंत्रण मिळवणे  हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  •  कांद्याचे साठवणूक करून अधिक नफा मिळवणे.

 चला तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कांदा चाळ अनुदान योजनेसाठी काय पात्रता आहे.

हे देखील वाचा: किसान ट्रैक्टर अनुदान योजना 2023 | PM Kisan Tractor Yojana – ऑनलाइन अर्ज कसा करावा

 कांदा चाळ अनुदान योजना 2020 साठी पात्रता:

  • या योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जदार शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे बंधनकारक आहे.
  •  7/12 उतारा वर नोंद असणे आवश्यक आहे.
  •  अर्जदार शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे गरजेचे आहे.

 आता आपण जाणून घेऊया या योजनेचे लाभ कोण घेऊ शकतो.

हे देखील वाचा: शेळी मेंढी पालन योजनेला नवीन मंजुरी | पहा काय आहे या योजनेचे स्वरूप अटी आणि शर्ती

 kanda chal anudan yojana 2023  योजनेचे लाभ कोण घेऊ शकतो?

  • वैयक्तिक कांदा उत्पादन शेतकरी
  •  शेतकरी महिला गट
  •  शेतकऱ्यांची उत्पादक संघ
  •  शेतकऱ्यांचा गट स्वयंसहायता गट
  •  शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था
  •  सहकारी पणन संघ
  •  नोंदणीकृत शेती संबंधित संस्था

 या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती ते आपण जाणून घेऊया.

 कांदा चाळ अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • 7/12  उतारा
  •  आधार कार्ड
  •  बँक खाते क्रमांक( पासबुक प्रत)
  •  अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र  हमीपत्र( विहित नमुन्यातील  प्रपत्र 2)

चला तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेतले की लागणारी कागदपत्रे कोणती कोण कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो तसेच या योजनेचे उद्दिष्ट काय आहे आणि या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळणार आहेत.  तर आता आपण जाणून घेऊया ऑनलाइन पद्धतीने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा.

हे देखील वाचा: मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना | ऑनलाइन अर्ज, आवश्यक कागदपत्रे व पात्रता, पहा संपूर्ण माहिती

कांदा चाळ अनुदान योजना

 कांदा चाळ अनुदान योजना 2023 ऑनलाइन अर्ज कुठे आणि कसा करायचा?

kanda chal anudan online application:

  •  या योजनेचा लाभ घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याला हॉटनेट  या ऑनलाइन संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा: http://www.hortnet.gov.in
  • रजिस्ट्रेशन करताना आवश्यक ती कागदपत्रे अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावे.
  • पूर्वसंमती पत्र असणाऱ्या शेतकऱ्याला सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र 4  बंध-पत्र तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सादर करावे लागेल.  पूर्वसंमती पत्रासोबत आराखड्यात दिलेल्या तांत्रिक निकषानुसार कांदा चाळीची उभारणी करणे.
  • तुम्हाला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अनुदान मिळवण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करावा लागेल.
  •  कांदा चाळ उभारणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांना लेखी स्वरुपात कळवावे लागेल.

 अशा प्रकारे तुम्ही कांदा चाळ अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मित्रांनो माहिती आवडल्यास शेअर नक्की करा धन्यवाद!

हे देखील वाचा: काळजी घ्या शेतकऱ्यांनो, लातूरमध्ये लम्पी रोगामुळे 571जनावरांचा मृत्यू आणि 133 गावात अजून लांबीची लागण

kanda chal anudan online application, kanda chal anudan yojana 2023, kanda chal, कांदा चाळ ऑनलाईन अर्ज 2023, Kanda Chal Subsidy Scheme

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!