जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा? | जमीन मोजणीसाठीचा अर्ज, लागणारी कागदपत्रे आणि आकारले जाणारे शुल्क काय? Jamin Mojani Maharashtra

नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत. Jamin Mojani Maharashtra कशी करायची? त्यासाठी किती शुल्क आकारले जाते? जमीन मोजण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती? असं सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या लेखांमध्ये घेणार आहोत. चला तर मित्रांनो डिटेल मध्ये जाणून घेऊया काय आहे जमीन मोजणी अर्ज पद्धती.  जमीन महसूल आणि जमीन मालकी या दोन्ही गोष्टींशी सामान्य जनतेचा संबंध पूर्वी काळापासून आलेला आहे. वेळोवेळी राज्यसत्ता आणि समाज धारणा बदलत गेल्या, त्याप्रमाणे जमीन महसूल बाबतच्या पद्धती आणि नियम देखील बदलत केले. भूमी अभिलेख विभागाशी  आपली चांगलीच ओळख झालेली आहे आता. चला तर भूमी अभिलेख विभागाबद्दल  थोडेसे जाणून घेऊया.

Jamin Mojani Maharashtra

भूमी अभिलेख (mahabhumi.gov)

 भूमी अभिलेख विभागाची सुरुवात ब्रिटिश काळात झाली होती. 1929- 30 मध्येझालेल्या मोजणीनंतर जमिनीचे असंख्य तुकडे पडले गेले. जुन्या हद्दी आणि निशाणही नाही झाल्या. बऱ्याच गावांमध्ये तर शेताच्या हद्दीबद्दल वाद देखील निर्माण झाले. काही काळानंतर सर्वे नंबर मध्ये भाऊ वाटप, खरेदी-विक्री, पोट आदेश यांसारख्या कारणामुळे हिस्से पडले गेले. त्यावेळी राज्यामध्ये जमिनीचे अभिलेख संधारण करणे व ते अध्यायावत ठेवणे यासाठी महसूल विभागाची निर्मिती केली गेली. कालांतराने महसूल विभाग,  भूमी अभिलेख, आणि नोंदणी विभाग असे तीन भाग जन्माला आले. भूमी अभिलेख विभागाकडून प्रत्यक्ष जागेवरील वहिवाटीनुसार पडलेले त्यांचे फाळणी नकाशे तयार केले गेले. सध्या भूमी अभिलेख विभाग जमाबंदी आयुक्ता आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या नियंत्रणाखाली कार्य करत आहे.  चला तर मित्रांनो आता आपण जमीन मोजणी बद्दल माहिती घेऊया

हे देखील वाचा: या 7 कागदपत्रांच्या आधारावर तुम्ही जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करू शकता

Jamin Mojani Maharashtra

मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपल्या सातबारा उताऱ्यावर जितकी शेत जमीन दाखवलेले असते, इतकी प्रत्यक्षात  त्या शेतकऱ्याला करायला समोर दिसत नाही. अशा वेळेस त्या शेतकऱ्याला कुणी आपल्या जमिनीवर अतिक्रमण केला आहे की काय अशी शंका वाटते. ही शंका तुम्ही शेत जमिनीची शासकीय पद्धतीने मोजणी करून दूर करू शकता. यासाठी तुम्हाला शेत जमिनीची मोजणी  करण्यासाठी अर्ज कसा करायचा, लागणारी कागदपत्र, आणि लागणारे शुल्क यांबद्दल सविस्तर माहिती घ्यायला हवी. चला तर मित्रांनो आता आपण bhumi abhilekh mojani सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया.

जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे कोणती?

  • शेत जमिनीची मोजणी करण्यासाठी मोजणीचा  अर्ज
  •  मोजणी  शुल्क चलन किंवा पावती
  •  तीन महिन्यांच्या आतील 7 12 उतारा

हे देखील वाचा: जमिनीचा नकाशा ऑनलाईन कशा पद्धतीने पहायचा?

शेतजमीन मोजणी साठी अर्ज कसा करायचा?

  • amin Mojani Maharashtra मध्ये करण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. या अर्जाचा नमुना महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेखच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला भेटेल. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून भूमी अभिलेखच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
  • https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/

 आता अर्ज कसा भरायचा ते आपण पाहूया.

  • सुरुवातीला तुम्हाला ज्या तालुक्यातील कार्यालयात अर्ज सादर करायचा आहे, त्या तालुक्याचा आणि जिल्ह्याचे नाव तेथे टाका.
  •  नंतर पहिल्या पर्यायापुढे अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता याविषयी माहिती भरा. यामध्ये अर्जदाराचे नाव, गाव, तालुका, आणि जिल्हा अशी माहिती भरायचे आहे.
  •  पुढे मोजणी करण्यासंबंधीची माहिती आणि मोजणीचा प्रकार तपशील हा पर्याय दिसेल. यामध्ये मोजणीच्या प्रकारासमोर मोजणीचा कालावधी आणि उद्देश लिहायचा आहे.
  •  पुढे तालुक्याचे नाव, गाव, आणि शेत जमीन ज्या गट क्रमांक येते त्या गटाचा क्रमांक टाकायचा आहे.
  •  तिसऱ्या पर्यायांमध्ये सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फी ची रक्कमयासमोर ती रक्कम लिहा. आणि त्यासाठीच चलन किंवा पावती क्रमांक आणि तारीख लिहायची आहे.
  •  किती क्षेत्रावर मोजणी करायचे आहे आणि किती कालावधीत करून घ्यायचे आहे यानुसार ठरत असते.

जमीन मोजणीचे तीन प्रकार पडत असतात:

  • साधी मोजणी:  जी 6 महिन्यांच्या कालावधीत केली जाते.
  • तातडीची मोजणी: जी 3 महिन्यांमध्ये केली जाते.
  • अति तातडीची मोजणी: जी 2 महिन्यांच्या आत केली जाते.

हे देखील वाचा: शेतमाल तारण कर्ज योजना: असा घ्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा फायदा

जमीन मोजण्यासाठी किती शुल्क आकारले जाते? (Jamin Mojani fees in Maharashtra)

Bhumi Abhilekh Mojani: एक हेक्टर क्षेत्रावर जर साधी मोजणी करायची असेल तर 1000 रुपये एवढे शुल्क आकारले जाते. जर तातडीची मोजणी करायची असेल तर एक हेक्टर क्षेत्रासाठी दोन हजार रुपये मोजावे लागतात. आणि अति तातडीच्या मोजणीसाठी 3000 रुपये शुल्क एक हेक्टर क्षेत्रासाठी आकारले जात असते.

  • यानुसार किती कालावधीत मोजणी करून हवी आहे, यानुसार शेतकरी तशी माहिती कालावधी या कॉलम मध्ये लिहू शकतो.
  •  उद्देश या पर्यायासमोर शेतकऱ्यांना मोजणी करण्यामागचा उद्देश लिहायचा आहे. म्हणजे जसं की शेत जमिनीची हद्द जाणून घ्यायची आहे, कोणी बांधावर अतिक्रमण केले आहे का हे पाहायचं आहे etc.
  •  त्यानंतर पुढे चौथ्या पर्यायांमध्ये सातबारा उताऱ्याप्रमाणे जमिनीचे सहधारक म्हणजे ज्या गट क्रमांक त्याची मोजणी करायची आहे, त्या क्रमांकाचा सातबारा उतारा एकापेक्षा अधिक जणांच्या नावावर असेल तर त्यांची नावे,पत्ता आणि मोजणीसाठी त्या सर्वांची संमती आहे असं संमतीदर्शक सह्या आवश्यक असतात.
  •  पुढे पाचव्या पर्यायात लगतचे कब्जेदार यांची नाव आणि पत्ता लिहायचा आहे. यात तुमच्या शेतीच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, आणि दक्षिण या चारही दिशांना ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे त्या शेतकऱ्यांचं नाव आणि पत्ता त्या त्या दिशा समोर लिहावं.
  •  शेवटचा सहावा पर्याय अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचे वर्णन हा आहे. यामध्ये वर दिल्याप्रमाणे कागदपत्र प्रामुख्याने लागतात. जर तुम्हाला शेती व्यतिरिक्त इतर कोणती जमीन असेल जसं की घर, उद्योगाची जमीन यांची मोजणी करायची असेल तर तीन महिन्यांची मिळकत पत्रिका आवश्यक असते.

शेतजमीन मोजणी साठी अर्ज

ही सर्व माहिती भरून झाली की विचारलेल्या कागदपत्रांसह हा अर्ज कार्यालयात जमा करायचा आहे. एकदा का तुम्ही हा अर्ज कार्यालयात जमा केला की तो ही मोजणी या प्रणालीत दाखल केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. त्यानुसार लागणाऱ्या शुल्काची चलन तयार केलं जातं. या चलनाची रक्कम शेतकऱ्यानं बँकेत जाऊन भरायचे असते. त्यानंतर मोजणीचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे स नोंदणी क्रमांक तयार होतो. मग शेतकऱ्याला मोजणी अर्जाची पोच पावती दिली जाते. त्यामध्ये मोजणीची दिनांक, मोजणीला येणारा कर्मचारी, त्याचा मोबाईल नंबर, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल नंबर असे सर्व माहिती दिली जाते.

हे देखील वाचा: पहा येथे गाय म्हैस वाटप योजना mahabms शासन निर्णय

ई मोजणी प्रणाली काय आहे?

 मित्रांनो, वर दिलेली प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने केली जाते. पण यामध्ये शेतकऱ्याचा बराच वेळ जातो. म्हणून महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभाग ऑनलाईन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. या पद्धतीलाच ई मोजणी प्रणाली असं म्हटलं जातं.  अजून तरी या संबंधित सॉफ्टवेअर विकसित करण्यावर काम चालू आहे. आता जमीन मोजणीचा अर्ज करण्यापासून ते मोजणीची प्रत डाउनलोड करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया शेतकरी स्वतः घरी बसून ऑनलाइन पद्धतीने करू शकतो. यामुळे शेतकऱ्याचा वेळची देखील बचत होईल. अगदी सोप्या पद्धतीने ही प्रक्रिया करता येणार आहे. 

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!