मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (hsc result maharashtra) जाहीर झालेला आहे. आणि बारावी परीक्षेचा निकाल असा आहे की या परीक्षेमध्ये 93.37% एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील भविष्य साठी शुभेच्छा. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात 2.12 टक्के एवढी वाढ झालेली आहे.
हे देखील वाचा: विवाह नोंदणीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती?
HSC Result Maharashtra
कोकण विभागाने तर बाजी मारलेली आहे. कोकण विभागात उत्तीर्ण प्रमाण सर्वाधिक असून ते 97.51 टक्के एवढे आहे. त्याचप्रमाणे मुंबई विभागात उत्तीर्ण यांचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे 91.95 टक्के एवढे आहे. आणि नेहमीप्रमाणेच उत्तीर्ण मध्ये मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे.
पुणे विभागातून उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण 94.44 टक्के एवढे आहे. संभाजीनगरच्या तनिषा बोरामणी या विद्यार्थिनीने कॉमर्स शाखेतून शंभर टक्के गुण मिळवले आहे. निकाल जाहीर झाला आणि आता पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांना सुरुवात झालेली आहे.
हे देखील वाचा: मान्सूनची 12 जून पर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याचे संकेत
पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू:
महाराष्ट्र राज्यातील कॉलेजमध्ये बीए, बीकॉम, बीएससी, अशा पारंपारिक अभ्यासक्रमांसोबत पदवी अभ्यासक्रमाच्या म्हणजेच बीई, बीटेक या पदवीसाठी देखील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन पद्धतीने देखील प्रवेश प्रक्रिया घेण्यात येत आहे.